कविता
स्वैर त्याची ही कहाणी...
आला आला हा पाऊस
नको एकटी जाऊस,
सखे, उनाड हा द्वाड
तुज पाडेल भरीस...
जरी सखा हा लाडका
पण नाठाळ गं भारी,
सांभाळून वाट चाल
आहे लबाड रंगारी..
स्वैर रूप तो धारिता
राधा तूही रंगशील,
रंग त्याचा तुझा एक
कशी विलग होशील?
बरसेल आसुसून
तुज करील बेधुंद,
परि सावर स्वतःला
नको होऊस बेबंद..
क्षणी भान तू हरता
त्याचे आयते फावेल,
चिंब तुजला करून
मनाजोगते साधेल...
वारा मदतीस त्याच्या,
तुझा पदर ढाळाया..
धाव- धावशील कोठे?
चराचरी त्याची माया
तुझे वेड त्याला आहे,
जशी त्याची तू दिवाणी
परि जप तुज सखे,
लाज राखूनिया मनी...
आज इथे उद्या नाही,
स्वैर त्याची ही कहाणी
मग झुरशील पुन्हा
गात विरहाची गाणी...!!
-ब्लॉगवर पूर्
पाणावलेल्या डोळ्यांना
पाणावलेल्या डोळ्यांना वाराही जुमानत नाही !
कितीही गर्दीत सापडले तरी त्यांना काहीच फरक नाही !!
रडायला खांदा, बोलायला तोंड मिळाली पण माझे अश्रू मीच पुसले !
मनातला तो कोपरा कायमचा बुजवला, आठवणी मात्र बाहेरच राहून गेल्या !!
मनरुपी वृक्षाला मग नवी पालवी फुटली !
तुझ्या मैत्रीची मज ओढ वाटू लागली !!
मायामृग यांच्या हिंदी कवितेचा अनुवाद
आई...!
तुला काही छोट्या छोट्या गोष्टी सांगायच्या होत्या
तुला खूप हसू आलं असतं ऐकून
तुझ्याशिवाय दुसर्या कुणाला यात रस नाही
आणि असला तरी कुणी तुझ्यासारखे समजून घेणार नाही आई
समजून घेतले तरी त्यात काही मजा नाही वाटणार त्यांना...
तुला सांगायचं होतं की आज सकाळी चहा करताना
साखरेऐवजी मीठ घातलं मी
पण कुणीच म्हटलं नाही, तू असा ढ च राहशील
तुला नाही जमणार चहा, बाजूला हो, मी करते...!
आई, तुला सांगायचं होतं की आज बाबांना
मी पाणीपुरी खाऊ घातली, जे ती कधीच खात नाहीत
आणि किती मजा... सगळे पाणी तर
बशीतच सांडले...
फौजिया अबू खालिद यांच्या कवितांचा अनुवाद
१.पाणी
तिनं वाळवंटात आपली बोटं बुडवून
एक कविता लिहिली मृगजळानं... जी टपकतेय
टप
टप
टप
एक लय. इंद्रियातीत...
२.
माणुसकी....
न मानला धर्म
न मानली जात
धरली फक्त माणुसकीची कास
कारण हीच आहे माझी वाट ...
बेभान उधळणाऱ्या पावसाच्या सरींनी
नभी आकाशाच्या इंद्रधनुष्य उमटते
माय-माउली मातीतून, मादक सुगंध दरवळतो
जणू घेऊनी रूप परिसाचे, सृष्टीचे चराचर उजळिते
इथे नसे कधी दुजाभाव,
न कधी नरपशुंचा भेदभावाचा घाट,
बरसावे आपणही कधीतरी यासवे, हाच मनी ध्यास
कारण हीच आहे माझी वाट ...
करुनी पैशाला श्वास, लाविली संवेदनांची वाट
मारुनी ताव फुशारकीचे, समेटले सोंग सज्जनांचे
घेऊनी शिक्षण इयत्तांचे, कातडे पांघरले माणुसकीचे,
कातड्यालाच या लावावी आग, हाच मनी ठाव,
कारण हीच आहे माझी वाट ...
घनघन
घन मंदावले मन धुंदावले
जळ वाकून वाकून ओघळले
झाकलेल्या कळा आत ओढाळल्या
रंग हिरव्यात दाटल्या ऊन सावल्या
झाडपानात सण पळ श्रावण श्रावण
अंग अंगणात चाहुली पागोळल्या
लवे भरून डोळा कणकण हळवेला
एक एकटाच जीव होई खुळा बावळा
पापणीची स्थिती आळवावी किती
ओठ शब्दांसवे चहु ओर नाचती
नागमोडलेली वाट चिंब ओला घळघाट
नव्या नवरीचा थाट जणू हीच पावती
.........................अज्ञात
काव्यरस
कायच्या काय
बोलु नको काय, तुझे ऐकणार नाय
बोलु नको काय, तुझे ऐकणार नाय
दादा आज आम्ही बसणार हाय
काळ्या काळ्या ओल्डमाँकची आणली आहे बाटली
चौकोनाची बाटली पाहुन पोर सारी पेटली
पेटलेल्या पोरांना चकणा पुरणार नाय
दादा आज आम्ही बसणार हाय
दोन पेग पोटी जाता डॉन होती सारे
झोपी जाती काही काही मोजतात तारे
वकार युनुसचा काही भरवसा नाय
दादा आज आम्ही बसणार हाय
सकाळी डोके दुखता हवा एक उतारा
जमले नाही त्याने तर लिंबुपाणी मारा
ऑफीस मात्र उगाच चुकवायचे नाय
दादा आज आम्ही बसणार हाय
बाटलीधर,
साय
साय
ताजी ताजी हाय दूधावरची साय,
ताजी ताजी हाय दूधावरची साय !
दादा माझी होणारी वहिनी रे कुठाय ?
गोर्या गोर्या वाहिनीची साईसारखी काया,
साईसारखी काया तीची वडरुपी छाया,
वडरुपी छायेत करील मातृरुपी माया !
सांग कधी आणतोस अशी वहिनी भाऊराया !!
गोर्या गोर्या वहिनीची वाजत गाजत काढेन वरात,
कधी घेउन येशील सांग वहिनीला घरात!
वहिनी येता घरी मिळेल ताजी ताजी साय,
दादा माझी होणारी वहिनी रे कुठाय ?
ताजी ताजी हाय दूधावरची साय,
ताजी ताजी हाय दूधावरची साय !
दादा माझी होणारी वहिनी रे कुठाय ?
देवळाबाहेरचा गाभारा
एकदा वाटल की देवळात जावं
आणि देवाच दर्शन घ्यावं
भर दुपारी तशी शांतताच होती,
बहुतेक देवाचीसुद्धा आरामाची वेळ होती,
मनात म्हंटलं नको द्यायला त्याला त्रास
घटकाभर बघावी वाट, आणि पहावी आरास
गाभारा तसा दिसत होता बराच प्रशस्त
त्याची भग्नता देत होती गतवैभवाची साक्ष
प्रांगणही देवळाच तसं जाणवत होतं मोठं
पडक्या तटबंदीत सावरत होतं कस बसं
एका कोनाड्यात काही लोक दिसत होते,
दगडातून काहीतरी घडवत बसले होते,
त्यातली काही वयस्कर, प्रौढ तर काही तरणी होती,
जी छन्नी हातोड्याने नवनिर्मितेचे गीत गात होती,
आजूबाजूला काही लहान मुलं ही खेळत होती,
पण उडणार्या दगडांची त्यांना मुळीच चिंता नव्हती
एक वेगळीच जादू त
काव्यरस
मिसळपाव