सावलीत माझ्या
सावलीत माझ्या , सुर्यही विसावला,
अमावस्येला आज , चंद्र कसा डोकावला ,
तु नसता समीप , पाऊसही सोकावला
विजेचे येता भान , मागे मग सरसावला
भिजवूनी चिंब धरतीला, , तोही मग सुखावला
ओटी भरुन हिरवी तिची , तो , क्षणभरी विसावला.
काव्यरस
मिसळपाव
