Skip to main content

अरे समस्त गुणी जनांनो...

लेखक निश यांनी सोमवार, 01/10/2012 12:22 या दिवशी प्रकाशित केले.
अरे समस्त गुणी जनांनो, आता तरी जागे व्हा देश विकायची वेळ देशद्रोह्यांनी आणली आहे. लुळ्या पांगळ्या झालेल्या देशावर भिक मागायची वेळ आणली आहे. आता नाही तर कधीच नाही अस म्हणत देश वाचायची वेळ आली आहे. फुटीरपणाच्या निराशेचा विषप्याला रिचवत रिचवत मरणासन्न झालेल्या देशाला, एकसंध आशेचा जीवनप्याला पाजुन नवसंजीवनी द्यायची वेळ आली आहे. लाचलुचपत, सत्तांद्यपणा, जातियवाद, गरीबी, ह्यामुळे पोखरलेल्या देशाला, प्रामाणिकपणा, बंधुभाव, ईश्वरवाद, उदारपणा, ह्यांचा चव्यन प्राश द्यायची वेळ आली आहे. देशबुडव्या, दांभिक देशद्रोह्यांना हाकलुन लावत देशप्रेमाची हाक द्यायची वेळ आली आहे. अरे समस्त गुणी जनांनो, आता तरी जागे व्हा देश विकायची वेळ देशद्रोह्यांनी आणली आहे. अरे समस्त गुणी जनांनो......
लेखनविषय:

वाचने 1398
प्रतिक्रिया 4

प्रतिक्रिया

मुक्त छंदातील कवितेने भावना पोचविल्यात पण शुद्ध लेखन केल्याक की काय ते? भिक,अस ,पाजुन,सत्तांद्यपण,जातियवाद,चव्यन,हाकलुन या शब्दांबद्द्ल शंका वाटतेय ब्वॉ ! पु क शु

चौकटराजा साहेब, पुढील वेळी नक्की काळजी घेण्यात येईल चुका न करण्याबद्दल. कविता वाचल्याबद्दल व चुका दाखवल्याबद्दल मी आपला आभारी आहे व धन्यवाद.

हीच कविता त्रस्त संमंधा शांत रहा किंवा" घर देता का घर" या स्टाईलने म्हणून पहा तुम्हाला निशुमाग्रज नावाच्या नव्या कवीचे दर्शन होईल. ते उडविण्याचा घाट कयापायी ?