Skip to main content

कविता

अभिशाप जीवनाचा

लेखक मूकवाचक यांनी शुक्रवार, 02/11/2012 18:33 या दिवशी प्रकाशित केले.
(गुलाम अली यांनी गायलेल्या 'जिंदगी को उदास कर भी गया' या गझलचा स्वैर भावानुवाद) आला ॠतू अनामिक, अवचित निघून गेला जगणे उदासवाणे, माझे करून गेला नशिबी वियोग आला, सार्‍या सवंगड्यांचा अश्रू उरात झरले, जडशीळ देह झाला हुलकावूनीच गेले, दुष्प्राप्य ध्येय होते चुकता दिशा जराशी, साथी विभक्त झाला मृत्यू समोर अंती, सपशेल हार झाली निर्जीव चेहरा ही, पुरता विदीर्ण झाला दुवा: www.youtube.com/watch?v=uEai_rz4s84
काव्यरस

वाधल्या दाढी-मिश्या

लेखक खान यांनी गुरुवार, 01/11/2012 23:35 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कर मन्दलि, मी तसा मिसल्पवव्र नविनच अहे, पन बरेच वर्षान्पसोन मिसल्पव वाच्तोय. इथ्ले निर्निरल्य विश्यन्वर्चे सम्रुद्ध लिखन वचुन आपनहि काहि लिहाव या विचारने सदस्य झलो. कय लिहव, कह्शवर लिहव, यच विचर कर्तकर्त आततच मुखप्रुश्तआवर हई कवित वाच्ली, आनि ति वचून मलाहि काहि ओळी स्फुरल्या त्या इथे देत आहे.
काव्यरस

दु:ख झाले पाखरू

लेखक जयवी यांनी बुधवार, 31/10/2012 19:11 या दिवशी प्रकाशित केले.
आज माझ्या वेदनेला पंख हसरे लाभले दु:ख झाले पाखरू अन नाचू गाऊ लागले भिरभिरीची पाखराच्या सवय होऊ लागली वेदनेच्या जाणिवेची गरज भासू लागली दूर झाले मग सुखाच्या पाश सारे तोडले जीव जडला वेदनेवर दु:ख मिरवू लागले. भेटते जेव्हा नव्याने वेदनेला त्या जुन्या जाग येते जीवनाच्या मैफिलीला मग सुन्या जयश्री

मनास वाटे -

लेखक विदेश यांनी बुधवार, 31/10/2012 13:16 या दिवशी प्रकाशित केले.
. . मनास वाटे उगाच वाटे उदास वाटे भकास वाटे मनात वारे उगाच सारे भलते सारे गोळा सारे मनात काय उगाच काय भलते काय वाटते काय मनास नाही उमगत काही भलते प्रवाही वहातच राही ! .
काव्यरस

रख्स-ए-बिस्मिल (DANCE OF A WOUNDED)

लेखक हरवलेल्या जहाजाचा कप्तान यांनी बुधवार, 31/10/2012 07:44 या दिवशी प्रकाशित केले.
या शहरात, इंद्रियांची भूमिका विस्तारते क्षणोक्षणी. देह शिणत नाही. पण, जीव शिणतो नेमाने. इथेही आहेत वारुळांचे चक्रव्युह, सनातन वेदनांचे अमानुष पर्याय, गिधाडं-प्रेतांच्या बेगुमान वस्त्या, सावलीला दिवस आणि करुणेला रात्र. इथे काळोखाच्या ओठांतून, बर्फाळ प्रार्थनाही वाहत जातात, अवरोधाच्या उगमाकडे. भळाभळा अस्तित्व सांडत गर्दी जगत रहाते, होकार नकारांमध्ये अडकलेल्या ऐतिहासिक आवृत्त्या... इथल्या किंकाळीतच, नग्न आत्म्याचा देह वस्रांसकट जन्म घेतो. भयमग्न आवेगात देह नग्न होतो. आत्मा वस्र घेतो... या गर्दीतच माझाही चेहरा असतो हुबेहूब. सुरा घेतलेले तरुण आणि फुलं माळलेल्या बायकांमध्ये. आणि मी असतो, काळोख ज
काव्यरस

खरंच, आम्हा बायकांना काही म्हणजे काहीच कळत नाही

लेखक अनघा आपटे यांनी शनिवार, 27/10/2012 13:32 या दिवशी प्रकाशित केले.
खरंच, आम्हा बायकांना काही म्हणजे काहीच कळत नाही आऊचा काऊ तो ह्याचा मावसभाऊ असतो पण त्याच्याबद्दल याला काहीच माहित नसतं सांगायला जावे तर ह्याचे लक्षच नाही आणि तरी म्हणे आम्हा बायकांनाच काही कळत नाही सकाळी तास न तास वाची पेपर एवढे काय वाचतो तेच मला कळत नाही गहू तेलाचे भाव मात्र याला कधी माहित नाहीत आणि म्हणे आम्हा बायकांना काहीच कळत नाही पाठवावे याला कधी भाजीबाजारात घेऊन यावा ह्याने ढीगभर शेपू अन कांद्याची पात घरातल्यांच्या आवडी निवडी याला ठाऊक नाहीत आणि म्हणे आम्हा बायकांना काहीच कळत नाही रात्र रात्र जागून पाहतो टी.व्ही. axn स्टार स्पोर्ट्स आणि स्टार मुव्ही सारखी तीच हाणामारी बघून कंटाळा क

सांग सखया.........

लेखक अनघा आपटे यांनी शुक्रवार, 26/10/2012 12:02 या दिवशी प्रकाशित केले.
चालताना तू थोडा थबकलास नुसताच थबकलास का दूरवर सोबत करण्याचा विचार तुझा बदललास? हाक मारताना तू अडखळलास नुसताच अडखळलास की ओठात माझेच नाव असण्याचा तुझा रिवाज तू बदललास? बोलताना तू जरासा थांबलास नुसताच थांबलास की माझ्यापाशीच मन मोकळे करण्याचा तुझा हक्कच तू विसरलास? निरोपाच्या क्षणी तू आवंढा गिळलास नुसताच आवंढा गिळलास की आयुष्यातून मला वजा करताना स्वत:लाच भागून मोकळा झालास? खरं सांग, सारे काही विसरलास? सारे काही संपले? खरच संपलय कि आजही प्रीतीचे नाव घेता तुझे जग सारे माझ्याशीच येऊन थांबलंय

नेता की अभिनेता ?

लेखक विश्वजीत दीपक गुडधे यांनी गुरुवार, 25/10/2012 11:15 या दिवशी प्रकाशित केले.
नेता की अभिनेता ? लई नाटकी नाटकी या देशामधला नेता मतलबापायी होतो घडीघडी अभिनेता झोपडीतल्या दीनाची त्याला येई ना कदर पण खुर्चीसाठी खातो गरीबासंगे भाकर तसे तर खुर्चीदास सदा एसीतच राहे पण मतासाठी मात्र डोईवर भार वाहे पैशांशीच देणे-घेणे विकासाला मारी लाता परि भाषणात त्यांच्या करी विकासाच्या बाता आपल्या छाताडावर उड्या मारती हे मस्त डोळ्यावरले झापड काढा, राहू नका सुस्त • विश्वजीत दीपक गुडधे, अमरावती. ==================================

’तिच्यामुळे’

लेखक ह्रषिकेश चुरी यांनी मंगळवार, 23/10/2012 20:11 या दिवशी प्रकाशित केले.
पेन होतं, कागद होता त्या रात्री तो जागत होता रात्र चढू लागली त्याला आशा वाटली चंद्र गोजिरा झाला गार वारा झाला मन कोरं होतं, कागदही कोरा होता तरी पेन कागदाला भिडला पाच मिनीटं तसाच राहीला, एक ठिपका करून वर आला रात्रभर हेच चालू राहीले श्वास चालू राहीले, आयुष्य चालू राहीले की नाही हे कळत नव्हते घड्याळाचे काटे सरकू लागले आज कविता होणार नाही हे कळू लागले रात्र संपू लागली पेनातली शाई सुकू लागली झोप येऊ लागली त्याने अखेर पेन उचलला आणि ’तिच्यामुळे’ एवढंच लिहून झोपी गेला ह्रषिकेश चुरी
काव्यरस

टेंन्शन...

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी सोमवार, 22/10/2012 20:15 या दिवशी प्रकाशित केले.
वेळेवर झोपलं तरी,नीट झोप लागत नाय...! देवाधिदेवा यालाच , टेंन्शन म्हणावं काय??? ॥धृ॥ दिवसभराच्या थकव्यात, असं वाटत असतं... की कधी येकदा रातच्याला,आपलं घर दिसतं... पोटभर जेवून,एकदाचे पसरावे पाय...॥१॥ देवाधिदेवा यालाच , टेंन्शन म्हणावं काय??? ॥धृ॥ पोटासाठी कामाची वाट,तशिही चुकत नाही... समजा...आयतं मिळालं,तर मग सुखाची काय ग्वाही? सालं...असल्याच विचारानी टेंन्शनला,वेगवेगळे फुटतात पाय...॥२॥ देवाधिदेवा यालाच , टेंन्शन म्हणावं काय???