Skip to main content

पाणावलेल्या डोळ्यांना

लेखक सौरभ उप्स यांनी सोमवार, 24/09/2012 12:45 या दिवशी प्रकाशित केले.
पाणावलेल्या डोळ्यांना वाराही जुमानत नाही ! कितीही गर्दीत सापडले तरी त्यांना काहीच फरक नाही !! रडायला खांदा, बोलायला तोंड मिळाली पण माझे अश्रू मीच पुसले ! मनातला तो कोपरा कायमचा बुजवला, आठवणी मात्र बाहेरच राहून गेल्या !! मनरुपी वृक्षाला मग नवी पालवी फुटली ! तुझ्या मैत्रीची मज ओढ वाटू लागली !!
लेखनविषय:

वाचने 1832
प्रतिक्रिया 8

प्रतिक्रिया

कविता करावी अस वाटल म्हणून असच एक प्रयत्न केला, ज्या काही ओळी सुचल्या त्या मांडण्याचा प्रयत्न केलाय...

उपासनी काका तुमची ही कविता वाचून आमचेही डोळे पाणावलेत राव

सरावलेली नजर आता पोलीसाला देखील जुमानत नाही ! गर्दीने कितीही बडवले तरी मला काही देखील फरक पडत नाही !! बेसावध गिर्‍हाईक, हातामधे ब्लेड, तीची पर्स माझी मीच कापली ! टॉयलेटचा कोपरा पकडला आणि मिळाली ती रक्कम खिशात घातली !! तेव्हढ्यात तु दिसलास आणि, माझ्या नजरेत एक नविनच चमक दिसु लागली ! माझी नजर तुझ्या पाकिटा कडे परत परत वळु लागली !! मॅगी सुप्स,

सकाळी सकाळी पोटात कळ आली म्हणुन असाच एक प्रयत्न केला, जे काही पडले ते तसेच तुमच्या समोर मांडले आहे, आतातरी चुप्स,

@ ज्ञानोबाचे पैजार - सकाळी पोटात कळ आली कि तुम्ही अस काहीतरी पाडता, चांगल आहे ... आणि जे बाकी काही असत नॉर्मली सकाळच्या वेळेला पोटात कळ आल्यावर बाहेर पडणार ते कुठे जात हो मग ???