लेखकश्रियायांनी मंगळवार, 22/01/2013 11:10 या दिवशी प्रकाशित केले.
आपला परमात्म्याशी नित्य आणि शाश्वत संबंध आहे.तो धूसर होऊन ह्या जगातील जीवनास प्रारंभ ती "सुरूवात" आणि परमात्म्याशी पुन्हा नित्य,आनंददायी संबंध प्रस्थापित होणे हा "शेवट" किंवा "मोक्ष".ह्या संकल्पनेवर आधारीत ही रचना आहे. कशी वाटली जरूर सांगा!
लेखकअनिल तापकीरयांनी सोमवार, 21/01/2013 11:50 या दिवशी प्रकाशित केले.
घे उत्तुंग भरारी,दाही दिशा मोकळ्या आहेत
भिऊ नकोस डगमगू नकोस,अनंत वाट खुल्या आहेत
रस्ते बंद आहेत म्हणून, चालायचे तू थांबू नकोस
नवीन रस्ता शोधण्याचा, प्रयन्त मात्र सोडू नकोस
एका जागी थांबून, तुला कोणी काही देणार नाही
हात हलवल्याशिवाय, घास तोंडात जात नाही
सुरुवातीच्या अपयशानंतर हि, पुढे उज्वल यश आहे
दाट अंधारानंतरही, पुढे तेजस्वी प्रकाश आहे
चढ उतार,सुख दुख: तर जीवनात येतच असतात
इथे समर्थपणे लढनारेच, यशस्वी होत असतात
लेखकआर्णवयांनी सोमवार, 21/01/2013 11:31 या दिवशी प्रकाशित केले.
अद्रुश्य भावनांचे,
अस्तित्व जाणवावे.
विसरुनी या जगाला,
तुजला मिठीत घ्यावे.
स्पंदनांनी ही मग,
वेगळे नसावे.
असल्या एका क्षणाचे,
मी काय मोल द्यावे.
असता जवळ तूची,
इतरत्र क्षुद्र आहे.
बिन तू चातक हा मी,
तव-वृष्टी वाट पाहे.
आठवणी तुझ्याच,
एकेक गोड आहे.
या कोरड्या निशांना,
तुझीच ओढ आहे.
लेखकमोदकयांनी शनिवार, 19/01/2013 09:45 या दिवशी प्रकाशित केले.
*******************************************************
धनाजीरावांनी कुठूनतरी "धनाजीराव आणि पार्टी" चा उल्लेख करून सखूची आठवण काढली. सखूचा धागा वर आला नाही पण त्या गीताच्या (?) तालावर आम्हाला बरेच काही सुचत गेले..
लेखकअज्ञातकुलयांनी शुक्रवार, 18/01/2013 10:47 या दिवशी प्रकाशित केले.
ती :-
दिवसभराचा उजेड उतरत जातो
झाडांच्या तळकोषी आरामाला
झिरपत जातो हळू हळू अंधार
व्यापतो आभाळाला........
तो :-
नकोस हिणवू नको ओणवू
सावर ग स्वतःला
नभी चांदणे येइल अलगद
सजविल तव मेण्याला
धुके भ्रमाचे विरघळेल
उदयेल नवी स्वरमाला
हरवुन जाशिल तिथे
सोडशिल ना या जन्माला
संध्या- छाया ऊन-सावल्या
खेळविती हृदयाला
उमलविती रोमांकित वलये
जागविती मधुशाला
रंग नभाचे तसेच आपले
अंत नसे क्षितिजाला
शब्द कुंचले घेउन हाती
हो सुसज्ज लढ्ण्याला
......................अज्ञात
लेखकसांजसंध्यायांनी बुधवार, 16/01/2013 23:18 या दिवशी प्रकाशित केले.
डिसेंबर मधे बलात्कार झालेल्या एका आठ वर्षाच्या मुलीचं टाकून दिलेलं प्रेत मिळाल्याची बातमी नुकतीच वाचनात आली, पाठोपाठ लखनौजवळच्या गावात ट्रेनमधे सामूहिक बलात्कार करून विवाहितेला झाडाला फाशी दिल्याची बातमीही ! अशा दोन चार ओळीच्या अनेक बातम्या दिसू लागल्या..
लेखकधन्यायांनी सोमवार, 14/01/2013 23:31 या दिवशी प्रकाशित केले.
मिपावरील जुन्या आणि नव्या अशा सर्व आदरणीय जिलेबी सम्राटांस वंदन करुन हे जिलेबीचे ताट आपल्यासमोर ठेवत आहे. या काव्याची प्रेरणा काय आहे हे जाणकार कवितेतील काही शब्दांवरुन ओळखतीलच.
लेखकतळेकरयांनी सोमवार, 14/01/2013 19:23 या दिवशी प्रकाशित केले.
एक होता "महामानव"
आयुष्यभर त्याने संत साहित्याचा अभ्यास केला. प्रचार केला.
खास करून व्यभिचार आणि भ्रष्ट आचाराला वीरोध केला.
व्यभिचारींची "मदत" घेण्यास नकार दिला.
त्यांच्या आचरणाने शिकवणीने आम्ही सारे भारुन गेलो.
लेखकविदेशयांनी सोमवार, 14/01/2013 17:02 या दिवशी प्रकाशित केले.
तुला भेटल्यावर मी
एकही शब्द बोललो नाही !अगदी स्वाभाविक आहे
तुझा नंतरचा रुसवा फुगवा ;सांगू का खरेच सखे ,
तुला पाहताक्षणीच -
नुसतेच पहावेसे
वाटत राहिले...शब्दांनाही !
. . .
उद्या साहित्य संमेलनाला निघायचं आहे, तयार राहा आम्ही सकाळी पाच वाजेला तुझ्याकडे पोहचतो असा माझ्या लहरी प्राध्यापक मित्रांचा फोन आला आणि ठरल्याप्रमाणे प्रा.डॉ.सर्जेराव जिगे-पाटील, प्रतिष्ठाण महाविद्यालय, पैठण. प्रा.डॉ. महेश खरात, देवगिरी महाविद्यालय, औरंगाबाद, माझ्याकडे पोहचले. सकाळच्या गुलाबी थंडीत आम्ही पुण्याकडे प्रयाण केले. सकाळचा सूर्य झकास दिसत होता.