Skip to main content

॥ पगाराचा दिवस॥

लेखक Bhagwanta Wayal यांनी रविवार, 07/04/2013 10:29 या दिवशी प्रकाशित केले.
पहिल अगदी बर होत हातात पगार मिळत होता किती मिळाला पगार तिथल्या तिथ कळत होता पगाराचा दिवस तो सर्वांनाच प्यारा होता हातात पगार घेण्याचा आनंदच न्यारा होता पगाराच्या दिवशी दांडीबहाद्दर पण यायचे पगाराच्या रांगेमध्ये पुढे ऊभे रहायचे बायको पण विचारायची झाला का हो पगार? आणला आहे घरी की खेळलात सर्व जुगार मुलांना खाऊ आणायची हौस तुमची फिटली स्वतःसाठी मात्र आणली असेल बाटली आता मात्र तसे नाही ईसीएसने पगार जातो आपापल्या बँकेत खात्यावरती जमा होतो कधी जातो कधी घेतो ते पण कळत नाही हातात पगार घेण्याचे समाधान मिळत नाही
लेखनविषय:

वाचने 1934
प्रतिक्रिया 5

प्रतिक्रिया

कधी जातो कधी घेतो ते पण कळत नाही हातात पगार घेण्याचे समाधान मिळत नाही
सहमत.

पगार हातात घ्यायचा, आनंद मिळवता येतो, ब्यांकेत जमा झाला की, तो काढून घेता येतो...