Skip to main content

कविता

जिंदगी जम चुकी है अब

लेखक मिसळलेला काव्यप्रेमी यांनी बुधवार, 10/07/2013 या दिवशी प्रकाशित केले.
थोडी प्रस्तावना: बर्‍याच वर्षांनी हिंदी मध्ये काहीतरी सुचले (असं फार क्वचितचं होतं). म्हटलं इथे प्रकाशित करावे पण मग विचार केला हे बरोबर नाही. मिपा हे मराठी भाषेला वाहिलेले जास्वंदी फुल आहे. मग याच रचनेचा मराठीत अनुवाद केला. मला स्वतःला फारसा भावला नाही पण पहिला प्रयत्न म्हणून चालु शकेल असे वाटले. खरंतर अनुवाद किंवा भावानुवाद हा माझा प्रांतच नाही. त्यातल्या त्यात इतर कोणाही कवीची रचना असेल तर काही खरं नाही. हिंदीतली रचनाही माझीच असल्याने हिंमत करतोय.

शब्दबेवडा

लेखक गंगाधर मुटे यांनी मंगळवार, 09/07/2013 या दिवशी प्रकाशित केले.
               शब्दबेवडा

आयुष्याच्या वळणावरती जेव्हा पुरता दमून गेलो
पोट बांधले पायाशी अन् हात हवेचा धरून गेलो

हळवे अंतर खुणवत होते, "संपव जगणे" सांगत होते
मग्रुरीच्या पोटासंगे दडून गेलो; जगून गेलो!

ऐश्वर्याला दिपून इथल्या बघता बघता 'बटीक' झालो
सीता शोधणे भुलुन गेलो! अशोकवनात रमून गेलो!!

अनुभूतीचा सुसाट वारू शब्दामधुनी उधळत गेलो
व्यवस्थेशी 'भिडणे' सोडून शब्दबेवडा बनून गेलो

आधीन

लेखक अज्ञातकुल यांनी सोमवार, 08/07/2013 या दिवशी प्रकाशित केले.
ओठात माणसांच्या पोटातले उखाणे मेघात चांदण्यांचे संकेत आड गाणे आधीन ओघळांच्या वाहे उदंड पाणी एकांत सागराची पागोळते विराणी थेंबास थेंब भेटे वाटेत पथिक गोटे ओसांड अंतराचे पथ सोडुनी समेटे कधि कुंपणे तळ्याची प्रतिबिंब अंबराचे साकेत भ्रामकांचे अंदाज थेट खोटे सारे खरे परंतू हृदयी उलाल कोणी मातीत सांडलेले उगवे फिरून अवनी संजीवनी जणू ही गत सुप्त भावनांना आशा अजून वेडी संदेश हा पळांना ........................अज्ञात
काव्यरस

सरकारी नोकर

लेखक Bhagwanta Wayal यांनी रविवार, 07/07/2013 या दिवशी प्रकाशित केले.
वेळेवर येईना कधी कामाला कधी मधी पगाराला सर्वात आधी तो सरकारी नोकर॥१॥ फाईल्स टाकी ऐसपैस काम करी सावकास टेबलाखालुन घेई पैस तो सरकारी नोकर॥२॥ पैसे घेऊन काम न करी पार्टीला बोलवी घरी नेहमीच अपेक्षा धरी तो सरकारी नोकर॥३॥ जेवण करून झाकी डोळे कधी चार वाजताच पळे घरी जाऊन नुसता लोळे तो सरकारी नोकर॥४॥ वाटेल तेंव्हा घेई रजा खाऊनपिऊन करी मजा म्हणे साहेब आहे माझा तो सरकारी नोकर॥५॥ काम चुकार एक नंबर काम थोडे बोले फार टाकी दुसर्‍यावरी भार तो सरकारी नोकरी६॥ साहेबांची हाजी हाजी सह-कार्‍यांची नाराजी रोज बातमी सांगे ताजी तो सरकारी नोकर॥७॥ युनियनचा पदाअधिकारी काम कधीच नाही करी वाटेल तेंव्हा जाई घरी तो सरका

प्रतिबिंब

लेखक निनाव यांनी बुधवार, 03/07/2013 या दिवशी प्रकाशित केले.
तळ्यात डोकावतांना दिसत होते प्रतिबिंब । काही होते माझे , अन काही माझे पण तुला समजावून सांगण्याचे वेडे हट्ट अन तुला गमाविल्याचे कारण…. सर्वकाही … का मिटावे तू पान असे अलगद पुसावी झोप पडताच थेंब मग खेळ उथळ तरंगांचे मन मात्र ओले शोधण्यात प्रतिबिम्ब.…. कधी माझे , अन कधी माझे पण …!

'ती' एक बातमी!!

लेखक निनाव यांनी मंगळवार, 02/07/2013 या दिवशी प्रकाशित केले.
सांज होता वाट आंधळी जनावरांची काया भयाण करणारी मात्र , जंगल म्हण्जे जनावरेच नि शहर असायला माणसेच असा काही नियम नाही रक्त वाहिले का कुणी पाहिले का खोल किती जखमा चौकशी चा चष्मा घातले लोखंडी सळे वय होते खुळे सगळे मात्र कळे तरी निरपराध मी रोज रोज तेच रस्ते वेगळे नावे वेगळी भुकेल्यांची ताटे भरली उद्वेगांची गर्दी निराशेत सरली वेशी वर लखतरे मोकाट जनावरे लपलेली 'समोर' मात्र 'न' दिसणारी रडणारी ओरडणारी सोसून छळ प्राण सोडणारी निष्पाप… निरागस लक्ष वेधणारी निर्लज्जांचे , बाधिरांचे, पुन्हा एक बातमी उद्या च्या अंकात सांडलेल्या स्याहीनं ओरबाडलेल्या कागदावर लिहिणारी… सांज होता वाट आंधळी जनावरांच
काव्यरस

हे विहगांनो

लेखक अज्ञातकुल यांनी सोमवार, 01/07/2013 या दिवशी प्रकाशित केले.
हे विहगांनो चला घेउनी मेघांपलिकडल्या द्वारी खेळ मनस्वी शतरंगांचे फेर धराया गाभारी उणे पुराणे जग वाटे हे कल्प नवा रुजवू देही फुलवू या स्वप्नांचा चोळा दूर करू विवरे सारी रंग बघू प्रमदेचे आणि तृप्त फिरू रत माघारी पुन्हा एकदा तोच शहारा उमलवुनी मन दरबारी ........................अज्ञात
काव्यरस

आडदांड पाऊस

लेखक गंगाधर मुटे यांनी रविवार, 30/06/2013 या दिवशी प्रकाशित केले.
आडदांड पाऊस

अडदांड बेत ओला शिजवून पावसाने
केला शिवार खच्ची भिजवून पावसाने

गाळून घाम विणले मी वस्त्र स्वावलंबी
केल्यात पार चिंध्या खिजवून पावसाने

आले मनात जेव्हा तेव्हाच निग्रहाने
केले सपाट डोंगर झिजवून पावसाने

खाण्या-पिण्यात झाला पाऊसही अधाशी
हंगाम फस्त केला निजवून पावसाने

नाही दिले कुणाला थोडे 'अभय' परंतू
खरडून दैव नेले थिजवून पावसाने

सुप्त

लेखक अज्ञातकुल यांनी बुधवार, 26/06/2013 या दिवशी प्रकाशित केले.
सात स्वरांतिल सूर वाहिले दूर राहिले काही सुप्त काहिली झाले त्यातिल उलगडले नच काही गुच्छ बांधले जपले मार्दव अंगिकारले देही विस्कटलेले तळी झाकले वर्ज्य न केले तेही श्वासांची स्पंदने गोमटी कधी विकल अवरोही आरोहात कथा वचनांच्या व्यथा गूढ संदेही विरघळल्या न जळाल्या समिधा दिशा पेटल्या दाही दाह जाहले प्रतिमा अंकित प्रियकर त्यात विदेही खेळ क्षणांचे दीर्घ वेदना कंड सुखावह तरिही तलम ओंजळी एकांताच्या जळ करतळ निर्मोही मेघ पापणीआड बिंब प्रतिबिंब स्वप्नवत पाही जीवन लयमय ऋतू आगळा चिन्मय पवन सदाही ..............................अज्ञात
काव्यरस