Skip to main content

कविता

पाऊस आलाय...

लेखक माधुरी विनायक यांनी गुरुवार, 03/07/2014 17:09 या दिवशी प्रकाशित केले.
पाऊस आलाय सालाबादप्रमाणे वेड्या आठवणी जागवायला पुन्हा-पुन्हा मला लावतोय माझ्याच मनावर रागवायला वेडा पाऊस, वेडा... वेडावणारा पाऊस वेडा वेड लावतोय, वेडावतोय कृष्णमेघांच्या सावलीमागून आतुर होऊन बोलावतोय भिजायला... हो...भिजायचंय मलाही... पण थोडं थांबावं लागेल... हल्ली असंच करावं लागतं मनात आलं, तसं वागलं, मोकळं झालं, असं होतंच नाही... थांबावंच लागतं आणि मनालाही थांबवावं लागतं पण येणार मी, नक्की... मलाही भिजायचंय ना...

"माझी गझल निराळी" दुसरी आवृत्ती प्रकाशन सोहळा

लेखक गंगाधर मुटे यांनी मंगळवार, 01/07/2014 21:25 या दिवशी प्रकाशित केले.
दिनांक : ०१-०७-२०१४

"माझी गझल निराळी" : दुसरी आवृत्ती प्रकाशन सोहळा

सौंदर्यवती तू ......

लेखक psajid यांनी मंगळवार, 01/07/2014 11:15 या दिवशी प्रकाशित केले.
असं गं रक्तिम मुख तुझं जसं मिटल्या लाजाळूचं पान , त्यावर टेचात चालणं गं वळवी वैराग्याची मान !! मीच थिटा वर्णू कसा सृष्टीत तूच महान, सुरमयी कटी सखे तुझा कुमुदिनीचा वाण !! एक पाचोळाच मी सखे ज्याला कुठून देहभान ? मन आलं दबकत चाखण्या तुझे ओठ रंगले पान !! बेहोष गंध तुझा तो त्यात रेखीव कमान, बेसावध तुझ्यात तू मात्र भुंग्यांना त्याची जाण !! कधी जाण हृदय हेही खुपसे तुझ्यावर कुर्बान, मला लाभावं माळण्या वेणी गजरयाचा मान !! नजरे नको प्रतारणा आता तुला मनाचीच आण, काय आहे गं सृष्टीत ? समोर लावण्याची खाण !! श्री. साजीद यासीन पठाण दह्यारी, (पलूस, सांगली)
काव्यरस

इमारत..

लेखक vaibhav deshmukh यांनी शनिवार, 28/06/2014 08:49 या दिवशी प्रकाशित केले.
इमारत.. मी टकमक पाहतो त्या उच्चभ्रु अलिशान इमारतीकडॆ जीला गर्व जाणवतो स्वत:च्या उच्च्भ्रु अस्मितेचा आणि तिच्या प्रस्थापित संस्कॄतीचा म्हणुनच; ती हसते माझ्य़ा खुज्या अस्तित्वाकडॆ बघुन.. रंगबेरंगी प्रकाशात ती सजते पिवळ्य़ा कांतीची नववधु भासते आता तीलाही जाणवते स्वत:मधील एक हुकमी अस्तित्व मग; ती स्वत:च्या साहेबांचे अनुकरण करते आणि काही फ़ुटाच्या अंतरावर असलेल्या माझ्य़ाकडॆ व माझ्य़ासारख्या असंख्य लहान खुराड्य़ांकडॆ बघुन ती स्वत:ताला पुन्हा एकदा प्रस्थापित करते....! वैभव देशमुख २३८
काव्यरस

घर कसं बाळमुठीत कोंदणात सजणार -----------------

लेखक डॉ. दत्ता फाटक यांनी गुरुवार, 26/06/2014 19:17 या दिवशी प्रकाशित केले.
घर शेणाच, घर मेणाच, माती दगड वीटानचे घर कसं ही पण घर हवं ------------------- माउलीच्या साउलीच, अश्रुभरल्या ओलाव्याच, घर हसतं, घर रांगत , घर बाळमुठीत कोंदणात सजतं , घर कसही पण घर हवं ---------------------- लडिवाळ , घर हवं गाउलीच्या सायी सारखं , घर मधु मक्षिकेच, मधभरल्या ओलाव्याच, मधभरल्या माधुर्याच---------------------------- घर कसं सजतं ---------------------------- घर कणाकणानी सजलेलं , घामाच्या रेघांच घर घराचे घरपण टिकविणारे , ---------- सांजवाऱ्यासवे घराकडे ओढावणार ------ घर कसं असंच --------------

एकलव्य..

लेखक vaibhav deshmukh यांनी गुरुवार, 26/06/2014 10:35 या दिवशी प्रकाशित केले.
एकलव्य.... कित्येक शतके उलटली युगांतरे झाली सत्तांतर घडले मी माञ स्थिर आहे त्याच सहानुभूतींच्या बंदिस्त नजरेत.. कोणी नाकारले म्हणूनच शांत निश्चिल मूर्तीच्या साक्षीनेच मी लक्ष्यावर असंख्य बाण सोडले मी धर्नुधर झालो रक्ताळलेल्या चार बोटांचा श्रेष्ठ शिष्यही झालो तेव्हाच; त्या हाताकडे पाहताना दु: खाचा लवलेशही नव्हता मुद्रेवर पण; मी डगमगलो ढासळलो तुमच्या अनुत्तरीत प्रश्नात? तुमच्या सहानुभूतीच्या नजरात? तुमच्या पाणावलेल्या इतिहासात? तुमच्या या पराजित युगात...!

ओकांची ठकी - एका काव्य कट्ट्याचा अहवाल

लेखक शशिकांत ओक यांनी मंगळवार, 24/06/2014 17:24 या दिवशी प्रकाशित केले.
मित्र हो, एका रविवारी काव्यकट्टा साजरा झाला. चार दिशांहून काव्यप्रेमी आले. सायंकाळी पाचला सारसबागेतील एका झाडाच्या सावलीत कार्पेट टाकून त्यावर स्थानापन्न झाल्यावर जालावर शब्दरुपाने भेटणाऱ्या व्यक्ती प्रत्यक्षात कशा दिसतात, बोलतात याचा ओळखी झाल्यावर प्रत्यय आला. राज जैन व प्रसन्नकुमार केसकर सिंहगडरस्त्याने बाईकवरून, बावधनवरून डॉ अशोक कुलकर्णी व मी विमाननगरहून आलो. जुजबी गप्पा नंतर राजने आयोजित काव्यस्पर्धेबाबत आणि आगामी काळात मराठी व अन्य भाषेतील साहित्य प्रकाशनाच्या साकार होऊ घातलेल्या त्यांच्या कल्पना सांगितल्या.

कैफ़ियत..

लेखक vaibhav deshmukh यांनी मंगळवार, 24/06/2014 13:31 या दिवशी प्रकाशित केले.
कैफ़ियत.. प्रिये तु विचारतेस.. तु आज अस्वस्थ कसा? तुझ्य़ा चेहरय़ावरचा भाव अस्थिर कसा? भिजलेल्या ओल्या पापण्य़ा मुद्रेवर विखुरलेल्या रेषा काळाच्या चक्रात कैद नजर आणि मनस्तापाने सोडलेला प्रचंड तप्त सुस्कारा या तुझ्य़ा सार्;य़ा मलुल जिंदगीचा या उन्मादाचा हा अर्थ कसा? प्रिये.. मी मान्य करतो माझा अस्वस्थपणा आणि स्वीकारतोही तुझ्य़ा तगमगत्या मनाची चिंतातुरता तुला हवे आहे माझ्य़ा मुद्रेवरच्या भल्यामोठ्या प्रश्नचिन्हाचे एक वस्तुनिष्ठ स्पष्टीकरण म्ह्णुनच; काहीश्य़ा हाताशतेने तुझ्य़ासमोर मांडतो त्या प्रश्नचिन्हाची एक वस्तुनिष्ठ कैफ़ियत... "तुलाही कबुल असेल या जिंदगिवरची माझी अपेक्षा या अपेक्षेच्या पुर्तीसाठी पाय

मेल्याशिवाय जात नाही : नागपुरी तडका

लेखक गंगाधर मुटे यांनी रविवार, 22/06/2014 14:09 या दिवशी प्रकाशित केले.
मेल्याशिवाय जात नाही : नागपुरी तडका

माझा बाप...
रामप्रहरी उठायचा
शेणपुंजा करायचा
नांगर घेऊन खांद्यावर
दम टाकीत चालायचा
गार गार थंडीतही
घामामध्ये भिजायचा

माझा बाप....
गायी-म्हशी चारायचा
दूधदुभते करायचा
भूमातेच्या कुशीमध्ये
मरेस्तोवर राबायचा
कांदा-मिरची-भाकर खाऊन
आला दिवस ढकलायचा....

माझा बाप....
आजारी पडला तरी
घरामध्येच कण्हायचा
औषधाला पैसा-अधला
कुठून आणू म्हणायचा
देव तरी पावेल म्हणून

श्रद्धा म्हणजे...

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी शनिवार, 21/06/2014 19:23 या दिवशी प्रकाशित केले.
श्रद्धा म्हणजे आधी असतो कल्पनांचा भास श्रद्धा म्हणजे नंतर होतो त्यां'चाच पहिला श्वास श्रद्धा म्हणजे आधी असतो जाणिवांचा खेळ श्रद्धा म्हणजे नंतर होतो फुकट जाणारा वेळ श्रद्धा म्हणजे कुणा तोंडी दो वक्ताची रोटी श्रद्धा म्हणजे काही तोंडी सहज पडलेली बोटी! श्रद्धा म्हणजे काहिंसाठी pre plan जुगारी अड्डा श्रद्धा म्हणजे कुणासाठी स्वत:च पडायचा खड्डा श्रद्धा म्हणजे कुणी करतात ठरवून मोठ्ठी होळी श्रद्धा म्हणजे कुणी मारतात ठरवून छुपी अरोळी श्रद्धा म्हणजे भोळं भाबडं बिन रंगाचं कापड श्रद्धा म्हणजे उघड्या डोळ्यांना बंन्द करणारी झापड श्रद्धा म्हणजे मी(ही) म्हणतो क्रुतीवरचा विश्वास क्रुतीच करणे हा श्रद्धेच
काव्यरस