Skip to main content

कविता

उत्तर सापडेना आज?

लेखक विवेकपटाईत यांनी शनिवार, 21/06/2014 08:51 या दिवशी प्रकाशित केले.
(अल्पवयीन मुलींवर बलात्कार आणि त्यांची निर्घुण हत्या होते. अश्या घटना देशात घटत आहेत. मग दिल्ली असो किंवा बदायूँ. प्रश्न अनेक आहेत पण उत्तर सापडत नाही. कुठे चूक झाली आमच्या पिढीच्या हातून कि आजची तरुण पिढी वासनेच्या आहारी जात आहे) कुणी पायदळी तुटवली एक नाजूक कळी आज? मध्यान्हन उन्हाळी पसरली का स्मशान शांतता आज? ममतेचा कोखात निपजली का रक्त पिशाचे आज? माय बहिण भार्या नाती का निरर्थक झाली आज? वासनेच्या डोहात तरंगती का नव तरुणाई आज? काय जाहली चूक आमची उत्तर सापडेना आज?
काव्यरस

पुन्हा पाऊस, पुन्हा तू...

लेखक माधुरी विनायक यांनी मंगळवार, 17/06/2014 17:35 या दिवशी प्रकाशित केले.
पावसाने साद दिली नाद त्यास तुझा होता भिजलेली सर ओली चिंब स्पर्श तुझा होता... दाटलेले नभ वेडे भाराने ओथंबले थेंब आले सर सर सर मृद्गंध तुझा होता... मत्त गार गार वारा देहावरती शहारा लख्ख वीज लकाकली भास त्यात तुझा होता... मंद धुंद पावसात भिजलेल्या तन-मनात हुंकारला, आसुसला श्वास, तो ही तुझा होता...

माझ्या वेदनेला लाभो जोड तुझ्या वेदनेची...!

लेखक वटवट यांनी मंगळवार, 17/06/2014 12:42 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या वेदनेला लाभो जोड तुझ्या वेदनेची... तुझ्या वेदनेला लागो ओढ माझ्या वेदनेची.... वेदनेला जात नाही, वेदनेला धर्म नाही.. सारे विसरून जाती , वेदना ते वर्म वाही.. डोळ्यांतले अश्रू हाच, वेदनेचा पंथ आहे.. वेदनेला जिंकणारा, हाच खरा संत आहे... साधू नाही, संत नाही, पाइक मी वेदनेचा... अधू नाही, अंध नाही, सोशिक मी वेदनेचा... तुझी वेदना नं काढो, खोड माझ्या वेदनेची... १ तुझं.. माझं..

तुम्हाला कोणत्या (प्रमाणेतर) मराठी बोलीभाषा येतात अथवा परिचय आहे? सोबत बोलीभाषांमधील शब्दार्थ चर्चा

लेखक माहितगार यांनी रविवार, 15/06/2014 18:01 या दिवशी प्रकाशित केले.
मोकळेपणाने सांगावयाचे झाल्यास मला स्वतःला एकही बोलीभाषा येत नाही.
काव्यरस

संवेदना वगैरे

लेखक चाणक्य यांनी शनिवार, 14/06/2014 22:13 या दिवशी प्रकाशित केले.
तसं तर रोज असते तिथे ती पण आज दिसली मला डोळ्यांना अंधाराची सवय झाली असताना अनपेक्षितपणे प्रकाशाचा झोत शिरावा थेट डोळ्यात असं काहीसं झालं मला सा-या जगाने टाकलेल्या कच-यात तिचं जगणं वेचत असते ती रोज आणि बहुतेक वेळेला जवळच असलेल्या झाडाच्या सावलीत तिचं कळकटलेलं पोर खेळत असतं पण आज जरा लांब ठेवलं होतं तिने त्याला अरे हो, काल ते झाड तोडत होते नाही का.... तिने संगितलं असेल का, त्या झाड तोडणा-यांना तिला ते झाड हवय म्हणून? पण संगितलं असेल तरी तिचं कोण ऐकणार म्हणा अगदी एकविसाव्या शतकातली स्त्री झाली म्हणून काय झालं खरं तर नसेलच सांगितलं तिने कोणाला काही कारण त्या झाडापेक्षाही तिथली कचराकुंडी न हालणं जा

यमराजाचे मनोगत....!

लेखक आयुर्हित यांनी शुक्रवार, 13/06/2014 02:34 या दिवशी प्रकाशित केले.
आमची प्रेरणा: १) (रेडा म्हणे वडाला) २) सेकंड होम... ३) नरेंद्र मोदिंचे विकास मंत्र गेला रेडा एकदाचा, मोठा भार होता, चारा खाउन माजलेला तो लालु प्रसाद होता. घोटाळ्यात अडकला कोळसा,महाग झाला गॅस. झटपट काम करण्यासाठी विन्टेज कारची आस!
काव्यरस

मराठी कविता : नया दिन !

लेखक निमिष सोनार यांनी गुरुवार, 12/06/2014 12:53 या दिवशी प्रकाशित केले.
।। नया दिन ।। नवा दिवस उगवलाय! घेवून नवी पहाट! आलाय नवा प्रहर! टाकून जुनी कात! कालचाच मावळलेला तो सूर्य, आला आहे! नव्या आशेचा नवा सोनेरी किरणांचा शर्ट घालून! प्रत्येकाला जगण्याची नवी उमेद द्यायला! प्रत्येकाच्या जीवनात अंधार दूर करुन प्रकाश वाटायला! चला रोज स्वागत करुया त्या सूर्याचे ! जो घेवून येतो आपल्या जीवनात, रोज एक नवी पहाट! नवे चैतन्य! नवा दिवस! नया दिन !! # लेखक - निमिष सोनार

अस्थी कृषीवलांच्या

लेखक गंगाधर मुटे यांनी गुरुवार, 12/06/2014 03:56 या दिवशी प्रकाशित केले.
अस्थी कृषीवलांच्या

पाया रचून गेले कर्तव्य जागणारे
होते तसेच आहे नुसतेच बोलणारे

होऊ नकोस कष्टी चिंतातुराप्रमाणे
जालिम इलाज कर तू विध्वंस रोखणारे

माजून तर्र काही दिसतात कर्मचारी
प्रत्येक कागदाला पैशात घोळणारे

देणार साथ काया नाही मनाप्रमाणे
उडत्या मनास छळते हे शल्य बोचणारे

रस्ता नवीन नवखा दुर्गम-दरी-पहाडी
संगे हवे कशाला वाटेत धापणारे?

धर्मांध शोषकांच्या झुंडी तयार झाल्या
जातीत पांगलेले अन्याय सोसणारे

दाखला

लेखक बेसनलाडू यांनी मंगळवार, 10/06/2014 02:08 या दिवशी प्रकाशित केले.
मागितलाच कोणी कधी माझ्या जिवंतपणाचा पुरावा, की शोधाशोध चालू होते असंख्य कवितांची, वह्या-कागदांची, ई-मेल्स् ची, अश्रू पडून फुटलेल्या शाईची, (त्यातलं काही नाहीच मिळालं,तर) आपल्या दिवसरात्रींची, उन्हापावसाची, हसण्यारडण्याची (पण हे सगळं कधीच संपून गेलंय!) फोटो, मिस्ड् कॉल्स्, मेसेजेस्, फॉरवर्ड्स् ची (आता तर तुझा नंबरही माहीत नाही) ... न गवसणाऱ्या, न उरलेल्या, निरुपयोगी निरर्थक, निर्जीव, निर्माल्य सगळ्यात सतत, केवळ तुलाच धुंडाळत राहणं, इतकाच माझ्या सजीवतेचा दाखला पुरेसा नाहीये का तुला? (का पुरेसा नाहीये तुला?)

पडद्या मागची व्यथा

लेखक विवेकपटाईत यांनी सोमवार, 09/06/2014 20:02 या दिवशी प्रकाशित केले.
रंगविले मुखवटे अनेक स्वत:चा चेहरा मात्र रंगविला न कधी. तालावर नाचविल्या मंचावर कठपुतळ्या नाचायला मला मिळालच नाही. मान नटसम्राटाचा मिळतो बाहुल्यांना दंश पराजयाचा मलाच का मिळावा. पडद्या मागची व्यथा कळेल का कुणाला रंगमंचावर मिळेल का कधी मान सूत्रधाराला.
काव्यरस