मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

पाऊस आलाय...

माधुरी विनायक · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
पाऊस आलाय सालाबादप्रमाणे वेड्या आठवणी जागवायला पुन्हा-पुन्हा मला लावतोय माझ्याच मनावर रागवायला वेडा पाऊस, वेडा... वेडावणारा पाऊस वेडा वेड लावतोय, वेडावतोय कृष्णमेघांच्या सावलीमागून आतुर होऊन बोलावतोय भिजायला... हो...भिजायचंय मलाही... पण थोडं थांबावं लागेल... हल्ली असंच करावं लागतं मनात आलं, तसं वागलं, मोकळं झालं, असं होतंच नाही... थांबावंच लागतं आणि मनालाही थांबवावं लागतं पण येणार मी, नक्की... मलाही भिजायचंय ना...

वाचने 1597 वाचनखूण प्रतिक्रिया 3

एस गुरुवार, 07/03/2014 - 17:14
क्या बात है! पाऊस आला हे मिपावर कविता येऊ लागल्या की कळतं. :-) बाकी कविता मस्त.

निखळानंद गुरुवार, 07/03/2014 - 17:37
फक्त त्याला जास्त वेळ थांबवून ठेवू नका.. कंटाळून निघून गेला तर पंचाईत व्हायची ! आधीच त्याने फार वेळ तिष्ठत ठेवलं होतं.. तेंव्हाच तुमची तयारी करून घ्यायची होतीत ना ! असो. आता प्रत्यक्ष भिजाल त्या वेड्या संगे तेंव्हा तुम्हाला लागलेल्या वेडा बद्दलही लिहा..