अनुभव

सुधीर वैद्य जे न देखे रवी...
अनुभव अनुभव हा अनुभव असतो. प्रत्येकाचा वेगळा असतो. अनुभव सुखद असतो किवा दु:खद असतो. दु:खद अनुभव आयुष्यावर काळी छाया पसरवतो सुखद अनुभव आयुष्याला सोनेरी किनार देतो. सुखद अनुभव थकल्या जीवाला आसरा देतो, मनावर फुंकर घालतो. मलाच दु:खद अनुभव का म्हणून विचारू नये. दु:खद अनुभव दुसऱ्याला का नाही म्हणून खंतावू नये. कोणता अनुभव मिळेल हे आपल्या नशिबावर अवलंबून असते. मित्रानो, प्रत्येक अनुभव घेत जावे. प्रत्येक अनुभवातून शिकत जावे. दु:खद अनुभव तुम्हाला शिकवतो. सुखद अनुभव विकार वाढवतो. दु:खद अनुभवाने खचू नका. सुख - दु:ख हे निसर्गाचे चक्र आहे. देवही एव्हडा निष्टुर नाहीये. त्याच्याकडे सोसायला बळ मागा. आणि अनुभवाचाच अनुभव होऊन जा. सुधीर वैद्य
वर्गीकरण
लेखनविषय:
काव्यरस

0 टिप्पण्या 1,040 दृश्ये
शेअर करा: 📱 WhatsApp