मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

पोर्ट्रेट

हर_हुन्नरी · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
पोर्ट्रेट म्हणजे रूढार्थाने चेहरा चितारणे पेन्सिल, चारकोल , शाई , रंग असं काहीही वापरून पोर्ट्रेट म्हणजे सर्वसाधारणपणे एक कपाळ , भव्य ( भव्य कपाळ वाले लोक भाग्यवान किंवा श्रीमंत असतात असं म्हणतात) किंवा अरुंद , आठ्यांनी भरलेलं किंवा अगदी सपाट जी ए कुलकर्णींच्या कथेतली कपाळावरची तटाटलेली शीर दाखवणारं कपाळावर आलेली केसांची बट किंवा चक्क टक्कल दोन भुवया पांढऱ्या किंवा काळ्या कुळकुळीत सुबक कापलेल्या किंवा शरीरावरील सर्वात दुर्लक्षित भागांपैकी एक एकमेकींना न जोडलेल्या एकमेकींना जोडलेल्या ( असे लोक भाग्यवान किंवा श्रीमंत असतात असं म्हणतात) दोन नाकपुड्या असलेलं एक नाक बसकं,फेंदाडं, चाफेकळी, इत्यादी नाकाचं काम आहे श्वास घेणं , संपूर्ण शरीरयंत्र जिवंत ठेवणं नाकाखाली दोन ओठ मग ते कसेही असोत पातळ , जाड , फाटलेले , लिपस्टिक लावलेले , खरं बोलणारे , खोटं बोलणारे ओठांवर मिशी किंवा लव किंवा काहीच नाही ओठांखाली हनुवटी दोन बाजूला दोन गाल , मऊ , भरड , देवीचे वन असलेले , सुरकुतलेले , पावडर चोपडलेले, कल्ले असलेले , बिनकल्ली, एककल्ली बिन दाढीचे , दाढी वाले , नुकतीच दाढी केलेले दोन बाजूला दोन कान कानाची रचना कॉम्प्लीकेटेड च कानाच्या पाळ्या लांब , ओघळलेल्या, घट्ट , टोचलेल्या , बिन टोचलेल्या वगैरे तिखट कान , बहिरे कान , बिरबलाच्या गोष्टीतले कान कान ऐकत राहतात जे कानावर पडते ते , बंद पडेपर्यंत कायम ऐकत राहतात दोन डोळे , खोबणीत बसवलेले पापण्यांखाली सुरक्षित झोपाळू , संशयी , आसुसलेले , विरहानं व्याकूळ झालेले चतुर , लोभस , अनुरक्त , क्रोधाग्नि नं लाल झालेले भावविभोर , चिंताग्रस्त , दूरवर पाहणारे , वाट पाहून थकलेले निराश , आशा-निराशेच्या गोंधळात अडकलेले , धसमुसळे विचारी , स्वार्थसंपृक्त, अर्धोन्मीलित मनासारखा स्वर लागल्यावर आपोआप बंद होणारे , किंवा आभाळाकडे पाहणारे अश्रू लपवणारे , अश्रूंना झटकन वाट करून देणारे स्मरणरंजनात रमलेले, करारी व्यवहारी , काळे, तपकिरी , हिरवे , करडे , कोरडे , निळे अगदी कुठल्याही रंगाचे पोर्ट्रेट करत असताना उतरतो मी चेहऱ्याच्या तंतुंमध्ये त्वचेचे अणुरेणु , पोट , रंग , प्रकाश, सावल्या , वास हे सगळं जवळून पाहतो , अगदी एकरूप होऊन कधी अंतर ठेवून चेहऱ्याच्या मागे खोल कुठेतरी बुडी मारतो , दृश्य चेहरा बनवणाऱ्या अदृश्य चेहऱ्यात in short मी पोर्ट्रेट बनवतो

वाचने 1033 वाचनखूण प्रतिक्रिया 3