मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

कविता

मराठी अनुवादः सबसे खतरनाक होता है - कवी 'पाश'

तर्राट जोकर ·
अवतार सिंह संधू बर्‍याच कारणांनी गाजलेले कवी. वयाच्या फक्त अडतिसाव्या वर्षी खलिस्तानी अतिरेक्यांनी ह्या माणसाला उडवलं. ह्याचा गुन्हाही साधा सुधा नाही. हा माणूस डाव्या विचारधारेतला. धारदार कविता करणारा. नक्षलवादी चळवळीतला, राजकारणात पुढे आलेला, नक्षलवाद्यांचा कवी म्हणवला जाणारा पण शिख उग्रवाद्यांच्या हिंसाचाराचा विरोध करणारा. त्याच्या कवितांमधून त्याचे डावे विचार स्पष्ट दिसतात. पण आहेत विचार करायला लावणार्‍या. अशीच एक कविता मला खूप आवडलेली. माझ्या अल्पबुद्धीने केलेला अनुवाद सादर करतो.

मार्ग मुक्तिचा

विवेकपटाईत ·
लेखनविषय:
तहानलेली नदी पाण्याच्या शोधात भटकत होती भयाण वाळवंटात. उडणार्या गिधाडास विचारले तिने भाऊ मिळेल का कुठे जीवनदायी पाणी. पाण्याचे विचारू नको सापडेल तुला पुढे ताई मार्ग मुक्तिचा. एका वळणावर नदीने पहिले शुष्क वडाच्या फांदीवर लटकलेले होते एक प्रेत. झाडाखाली साचलेला होता एक ढीग मोठा कवट्यांचा खेळत होती त्यांच्या सवे गिधाडांची गोंडस पोरे फुटबॉल फुटबॉल. टीप: कवितेचा अर्थ शोधण्यास वाचक स्वतंत्र आहे.

इवल्या त्या डोळ्यांमध्ये

अभिषेक पांचाळ ·
लेखनविषय:
काव्यरस
इवल्या इवल्या डोळ्यांना , आस किती मोठी आहे निडर होऊन लढते वेडे , काळ त्याच्या पाठी आहे वादळाची फिकीर मनी , थोडीसुद्धा उरली नाही स्वप्न अधुरे राही , अशी रात कधी सरली नाही जिद्द तरी येते कशी , विचार करी दाही दिशा शंका करती फितूर सारे , केली याने दारू नशा पहाडही ते धस्की घेऊन , जागेवरती टिकून राहते अंगावरती बागडताना , लाटही त्याला दुरून पहाते दिली जरी हि कठोर शिक्षा , जमीन कशी याचा पायाखाली त्रास देऊन तऱ्हेतऱ्हेचा , नियातीही मग बेजार झाली उरले सुरले बळ लावूनि , सारे येती अंगावरती प्रहार करता पूर्ण शक्तीने , नाईलाजाने मागे फिरती गूढ जणू ते लपून बसले , हरेकाच्या कोड्यांमध्ये आसमंतही शांत नि

मराठी अनुवाद: शहर का व्याकरण - कवी धूमिल

तर्राट जोकर ·
नमस्कार, कवी धूमिल ह्यांची शहर का व्याकरण ही कविता वाचली, फार दुर्बोध वाटते. तरी अनुवाद करावीशी वाटली. काही चुकलं असेल तर दुरुस्ती सुचवावी.

माहेर वारी

त्रिपुरा ·
लेखनविषय:
काव्यरस
पोचता पोचता उंबऱ्याशी माहेरच्या, मनाच्या अंगणात पडतो आठवणींचा सडा नव्याने अनुभवताना सवयीची माया नकळत जातात भिजून, पापण्यांच्या कडा परत परत लागतात शोधावे, 'माझ्या' कपाटात सजलेले अनोळखी खण जुनाट फोटोत डोकावणारे सवंगडी आठवतात नुसतेच बनून 'काही' जण मायेच्या ऊन ऊन घासांत, न शोधताच सापडते अमृताची चव कौतुकानं लावलेल्या वेलीवर जुईच्या, हवं तेव्हा चमकतं, लबाड दवं गप्पांच्या फडात लावतात हजेरी, हव्या - नकोशा नात्यांचे बेमालूम पाश पायाखालच्या रस्त्यात खुणेला मिळतं, चिमुकल्या डोळ्यांनी साठवलेलं हक्काचं आकाश दरवेळी घेणं माहेराचा निरोप, नव्यानं भासतो, नावराईच्या पाठवणीइतकाच कठीण बांधून आसवं, निघायचं हसत

<"ऊभारू का पण डु आय्डी">

नाखु ·
मूळ कलाकृती

संदर्भ फक्त चालीसाठी आणि गाभा हेतु: मिपावर पुन्हा पुन्हा प्रवेश करणार्या आणि मिपावर दंग्यासाठी ठरावीक आयडीने येणार्या महाभागांना हा भाग समर्पीत आहे

( हल्ली मिपावर वावर आहे ‘एक्स्पर्ट(?) टॉकर’चा! अशीच एक टॉकर येतो ‘डु आय्डी बनून’. जुन्या आय्डीने बदल्यासाठी नवी कोरी डु आयडी सलामत! मग काय? जुन्या आय्डीची 'फुकाची घालमेल'. नव्या डु आय्डीची 'उत्साही सुरर्सुरी. पण, त्या जुन्या आयडीला काय बरे सांगायचे असावे?

“उभारू आपण गुढी!”

उल्का ·
लेखनविषय:
( हल्ली जमाना आहे ‘एक्स्चेंज ऑफर’चा! अशीच एक ऑफर येते ‘रिडेवलपमेंट’ची. जुन्या इमारतीच्या बदल्यात नवी कोरी दणकट इमारत! मग काय? जुन्या पिढीची 'जिवाची घालमेल'. नव्या पिढीची 'उत्साही लगबग'. पण, त्या जुन्या इमारतीला काय बरे सांगायचे असावे?

कुंजविहारी हसे का मनी -

विदेश ·
लेखनविषय:
काव्यरस
कुंजविहारी हसे का मनी - निद्राधीन ती राधा बघुनी नयनी उतरे शाममुरारी हळूच नकळत स्वप्न होऊनी स्वप्नामधली राधा बावरी गेली सगळे सत्य समजुनी हसे खुदुखुदू झोपेमधुनी खट्याळ कृष्णाची मोहिनी देशी रे किती त्रास तू मजला वदते राधा जात मोहुनी मोरपीस मग अलगद गाली कान्हा हसतो लबाड फिरवुनी खोड्या वाढता म्हणते राधा जा तू आता निघून येथुनी स्वर राधेला गोड ऐकवी मुरलीधर हळु पावा काढुनी नयने उघडी राधा अपुली मधुर सूर ते पडता कानी आत्ता होता कुठे कन्हैया शोधत हसते घरभर फिरुनी लबाड आणि खट्याळ लीला आठवे राधा स्वप्नी रंगुनी .. . http://mee-videsh.blogspot.in/

असा कसा काळ आला

gsjendra ·
लेखनविषय:
काव्यरस
असा कसा काळ आला बापाआधी बाळ गेला असा कसा काळ आला पोहर्‍यात नुसता गाळ आला असा कसा काळ आला हिरवा मळा माळ झाला असा कसा काळ आला धर्माच्या नावाखाली घोळ साला असा कसा काळ आला खरंबोलणारा वाळ झाला असा कसा काळ आला काळा कावळा शहाळं प्याला असा कसा काळ आला गाढवाच्या गळ्यात माळ घाला असा कसा काळ आला पैसा जगण्याचं मूळ झाला असा कसा काळ आला पोराने बापाचा छळ केला असा कसा काळ आला माणूसंच कूठे गहाळ झाला गजेंद्र भोसले आत्मशोध (काव्यसंग्रह)

मामाच्या पोरींना शिमग्याची भेट!

गंगाधर मुटे ·
लेखनविषय:
मामाच्या पोरींना शिमग्याची भेट!

माझ्या मामाला साडेचार पोरी
चार डोमड्या पण एक छोरी गोरी
या छोर्‍यांचं कौतूकं सांगू मी काय
ये माझे शिमगेमाय!

एक नुसताच लंबा बांबू
जणू हाडाचा उभारला तंबू
रक्ता-मासाचा बिल्कूल पत्ताच नाय
ये माझे शिमगेमाय!

एक भलतीच ऐसपैस
जणू पंजाबी मुऱ्हा म्हैस
डोलतडोलत रस्त्यानं चालत जाय
ये माझे शिमगेमाय!

एका छोरीचे फ़ुगलेले गाल
हवा भरलेले जणू फ़ूटबॉल
रोज वेणीला लावते हेअरडाय