Skip to main content

असा कसा काळ आला

लेखक gsjendra यांनी गुरुवार, 24/03/2016 13:22 या दिवशी प्रकाशित केले.

असा कसा काळ आला
बापाआधी बाळ गेला

असा कसा काळ आला
पोहर्‍यात नुसता गाळ आला

असा कसा काळ आला
हिरवा मळा माळ झाला

असा कसा काळ आला
धर्माच्या नावाखाली घोळ साला

असा कसा काळ आला
खरंबोलणारा वाळ झाला

असा कसा काळ आला
काळा कावळा शहाळं प्याला

असा कसा काळ आला
गाढवाच्या गळ्यात माळ घाला

असा कसा काळ आला
पैसा जगण्याचं मूळ झाला

असा कसा काळ आला
पोराने बापाचा छळ केला

असा कसा काळ आला
माणूसंच कूठे गहाळ झाला

गजेंद्र भोसले
आत्मशोध (काव्यसंग्रह)

काव्यरस
लेखनविषय:

वाचने 808
प्रतिक्रिया 1

प्रतिक्रिया