शहरी माणूस.

लेखनविषय:
काव्यरस
सुरुवातीला गांगरलो, भोवळलो, घुसमटलो पण... आता रुळू लागलोय या वस्तीत. किती दिवसात नाही पाहिलं चांदणं काजव्यांच लुकलुकणं चंद्राच्या अस्तित्वाचीच आता येऊ लागलेय शंका सूर्याचं उगवणं, मावळणं देखील किती दिवसात अनुभवलेलं नाही. इथे व्यवहार चालतो घड्याळाच्या काट्यावर त्याच्या काट्यानुसार आमचं आयुष्य सरकत असतं पुढं पुढं माणसांच्या गर्दीत राहून सुद्धा असतो एकटा एकटा आसपासच्या माणसाचं अस्तित्वसुद्धा कळत नाही आतासं. किंवा... तशी गरजच भासत नाही कुणाला.

काळजाच्या या तळाशी राहशी तू.

लेखनविषय:
काव्यरस
काळजाच्या या तळाशी राहशी तू सारखी स्वप्नात माझ्या नांदशी तू. मागणे ते,"विसरुनी जावे मला तू!" काय सांगू? प्राण माझा मागशी तू. प्रेम ना माझे तुझ्यावर सांगताना का गं आता? या टिपाना ढाळशी तू? एवढी आता कशी ही बदलली तू वेचुनी काटे, फुलांशी भांडशी तू. आठवू मी का तुला? म्हणतेस आणिक चांदण्या मोजीत का या जागशी तू.

कळतं रे पण..

लेखनविषय:
कळतं मला पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलंय, पहिलं पाऊल टाकायचं, दोघांकडून राहून गेलंय. कळतं आता तुझंमाझं उरलं नाही वेडं वय. येताजाता उचकी लागेल अशी आता कुठली सय? कळतं की भरतीनंतर ओहोटी ही येणारच, किती कुणी जवळ येवो दूर तर जाणारच.. तरीही, उठता उठताच आधी पहिला फोनकडे जातो हात, तुझ्या मेसेजशिवाय होते दिवसाची सुरुवात. स्टेटस, डीपी, पोस्ट, फोटो कुठंतरी तर भेटशील खरं? पण डिलिटलेल्या नंबरवर कसं कुणी दिसणार बरं? कधीतरी तर वाजेल रिंग समजावतं एक मन चोवीस तास उगाचंच हाताजवळ असतो फोन! ... सोडायचं म्हटलं तरी सवयी सुटता सुटत नाहीत; जीर्ण शीर्ण झाल्या तरी काही गाठी तुटत नाहीत..

अव्यक्त

लेखनविषय:
काव्यरस
मोकलाया मन बोझील माझे, विश्वास शोधत राहीलो मी अनाकलनीय,अविश्वसनीय सारे चूपचाप बघत राहीलो मी अष्टावधानी होतो तरिही,अनभिज्ञ राहीलो मी ती(संधी) समोर होती,तरिही निशब्द राहीलो मी अविरत,उद्रेक भावनांचा,सावरत राहीलो मी बांध व्यर्थ आत्मविश्वासाचा, बांधत राहीलो मी बाळगून उगा तमा जगाची,निरंतर अव्यक्तच राहीलो मी भेटेल कुणी मनकवडा,निरंतर वाट पहात राहीलो मी भ्रमनिरास झालो अंती,मग माझाच न राहीलो मी दिव्यांग नव्हतो तरीही अव्यक्तच राहीलो मी २७-१-२०२३

काहीतरी सलत असतं...

लेखनविषय:
काव्यरस
काहीतरी सलत असतं आपणास मात्र कळत नसतं कुणाच्यातरी आठवणीने मन आतल्याआत जळत असतं होवून कधी बेभान झुलत असतो फुलासारखं आपण सुध्दा फुलत असतो कुठल्याश्या भासापाठी मन सारखं पळत असतं. असं कसं कुणावरही आपण प्रेम करुन बसतो पण त्याचं आपल्याकडे लक्ष नसतं अन् आपण आयुष्यावर रुसतो ती आपल्याला झिडकारते किंवा तो आपल्याला झिडकारतो कळत असून मन आपलं त्याच्याकडेच वळतं. दीपक पवार. https://youtu.be/vsStJxhSSDU

अशीच एक धुंद, सोनेरी सायंकाळ - (आणि अंतिम वगैरे सत्य)

अशाच एका धुंद, सोनेरी संध्याकाळी सहज फिरायला निघालो होतो सहज मंजे मुद्दामच … – मला स्वतःशीच मोठ्याने बोलण्याची खोड आहे – घरात उगाच तमाशा नको म्हणून बाहेर पडलो. नकळत पाय तळ्याकाठच्या शांत रस्त्यावर वळले – मनात तात्त्विक वगैरे विचार घोळत होते. कोs हं ? … मी कोण आहे ? मै कौन हूँ ? व्हू आयाम ? सोs हं ! … मी तो आहे. तो मी आहे. या साडेचार फुटी कुडीत अडकलेला - अविनाशी,अमर, स्वयंप्रकाशी आत्मा आहे मी निर्विकार चेतना आहे मी ब्रम्ह, मी सत्य, मी कैवल्य आहे मी कर्ता, मी भोक्ता, मी ज्ञाता आहे मी साक्षी, मी सर्वसाक्षी, मी निर्लिप्त- निखळ जाणीव आहे.

विसरु नकोस नाते

लेखनविषय:
काव्यरस
नात्यास नाव आपल्या देवू नकोस काही स्वप्नातले गाव इतके व्यापू नकोस बाई. सुगंध वाऱ्यावरती पोचला कधीचा श्वासास दोष इतका देवू नकोस बाई. वाटेल जगावेगळे वागणे जेव्हा माझे विचारात खोड तेव्हा काढू नकोस बाई. मिसळून रंग तुझा मी रंगलो कधीचा विसरुन स्वप्न कोवळे जावू नकोस बाई. ---- अभय बापट

हा उन्हाचा गाव आहे.

लेखनविषय:
काव्यरस
हा उन्हाचा गाव आहे, रापलेली माणसे का अशी ही श्रावणाने शापलेली माणसे? पाहतो तो हर घडीला चेहरा वाटे नवा चेहऱ्याला रंग फसवे फासलेली माणसे. शेत कसवी तोच येथे, का उपाशी राहतो? का इथे ही भाकरीने ग्रासलेली माणसे? जात धर्माच्या इथेही पेटता या दंगली पाहिली मी माणसाने छाटलेली माणसे. लाच घेऊनी अता विकती इमान आपुले जी कधी मज सभ्य तेव्हा वाटलेली माणसे. हो भले अथवा बुरे, ना काळजी येथे कुणा का मनाने येथली ही गोठलेली माणसे?

मावळतीची दिशा....

लेखनविषय:
कधी वाटते पुन्हा एकदा मागे जावे निसटल्या क्षणांना पुन्हा धरावे पारंब्या वरती झुलता झुलता पदराखाली पुन्हा लपावे कधी वाटते पुन्हा एकदा मागे जावे भोगल्या क्षणांना पुन्हा जगावे आठवणीतले विस्मृत चेहरे पुन्हा एकदा तरी दिसावे डोळ्या मधले दवबिंदू अन् चेहर्‍यावरले धुके पुसावे हुरहुरत्या त्या कातरवेळी ,कधी कुणाची वाट बघावी दुरून बघता ओंजळीतली, प्राजक्ताची फुले दिसावी किती मिळाली किती गळाली, मनात आता खंत नसावी मात्र मागणे एकच ,मावळतीची दिशा पूर्व असावी!! कधी वाटते पुन्हा एकदा मागे जावे भोगल्या क्षणांना पुन्हा जगावे

मनात माझ्या

तुझ्या बटांतून अवखळ वारा छेदित जातो सळसळ पाने मनात माझ्या तुझ्या ओठीचे अल्लड आणिक अचपळ गाणे नदी वळावी कटी पाहूनी ओठांवरती लाली नभाची मनात माझ्या कवेत घ्यावी मोहक मूर्ती तुझ्या तनाची फिकेच पडती सागर येथे इतुके चंचल नयनी पाणी मनात माझ्या खोल आतवर तुझ्या प्रीतीची अबोल वाणी सुरेख बांधा घट्ट कंचुकी पदर जरीचा त्यावर तारे मनात माझ्या चुंबून घ्यावे पाठीवरचे कोंदण प्यारे लाखेचे ते चढवूनी कांकण साद कशाला नुपूर पदांना मनात माझ्या इथे टिपावे तुझ्या खोडकर खेच अदांना घरा घरातून दर्प सुटावा देह तुझा की आहे अत्तर मनात माझ्या प्रश्न कितीसे तूच त्यावरी होशी उत्तर गाभाऱ्यातील देव मनाचे
Subscribe to कविता