Skip to main content

कविता

लाखाच्या या मता आला शंभराचा भाव.

लेखक Deepak Pawar यांनी रविवार, 06/11/2022 20:30 या दिवशी प्रकाशित केले.
लाखाच्या या मता आला शंभराचा भाव भूलथापा... हव्यासानं लुटला हा गाव. कुणी म्हणे देतो वोट द्यावी एक नोट कुणी इथं दारूसाठी फिरे पाठी पाठी इमान हे होई थिटे जिथे वसे हाव भूलथापा हव्यासानं लुटला हा गाव. आपलीच भरी झोळी खुंटला विकास अंधाराचं राज आलं लोपला प्रकाश हपापल्या वादळाने गिळली हि नाव. भूलथापा हव्यासानं लुटला हा गाव. सत्तेची ही चढे नशा उफाळला माज गावच्या या डोईवर विनाशाचा ताज विकासाच्या मुळावर घालुनिया घाव भूलथापा हव्यासानं लुटला हा गाव.
काव्यरस

यत्र नार्यस्तु पूज्यन्ते

लेखक चाणक्य यांनी शुक्रवार, 04/11/2022 10:31 या दिवशी प्रकाशित केले.
टिकली मंगळसूत्र जोडवी बाईचं बाईपण घराला घरपण रूढी परंपरा संस्कृतीचा हाकारा पोरीची जात सातच्या आत घरात दिवसाउजेडी बलात्कार तुझ्याच छातीचे उभार हसलीस, तर दुर्योधन चिडेल फसलीस, तर रावण पळवेल रेषेच्या आत सगळं काही चालेल रेषेच्या पलीकडे अग्निपरिक्षा लागेल तुझ्या नावानंच सगळे देतील शिव्या तुझ्या अंगी मात्र सोशिकपणा हवा आपले आदर्श महान आपली संस्कृती महान तुला दिलंय की आम्ही त्यात महत्वाचे स्थान तू देवीचे स्वरूप शिवाय भारतमातेचं रूप . . . वगैरे वगैरे चं बोचकं एकदा तुला दिलं की आम्ही मोकळे 'यत्र नार्यस्तु पूज्यन्ते' चा ढोल बडवायला

योगी आदित्यनाथांची सापशिडी,पोलीस डिएसपी स केला शिपाई

लेखक बाजीगर यांनी बुधवार, 02/11/2022 12:43 या दिवशी प्रकाशित केले.
https://www.lokmat.com/crime/yogi-adityanaths-snake-ladder-ups-corrupt-… वजीर केला प्यादा योगी आदित्यनाथांची सापशिडी डिएसपी उतरला काॅर्पोरेट शिडी पैसे खाल्ले रु. 5 लाख, भ्रष्टाचारापाई पोलीस डिएसपी स केला शिपाई सीएम आदित्यनाथांचा झिरो टाॅलरन्स चुकीला माफी नाही, नो सेकंड चान्स महाराष्ट्रालाही पाहीजे एक योगी जागा दर्शवण्या ,जे नाही उपयोगी हवालदारपरमजीतसिंह रिपोर्टींग सर बक्कल नंबर-007 पावतीबूक सादर कर.
काव्यरस

सांजावता दाटते का तुझी आठवण?

लेखक Deepak Pawar यांनी बुधवार, 02/11/2022 10:46 या दिवशी प्रकाशित केले.
सांजावता दाटते का तुझी आठवण? जीवास या जाळते का तुझी आठवण? होते तुझे गोड ते लाजणे ही होते तुझे गोड ते हासणे ही गेल्या सुखा माळते का तुझी आठवण? वाऱ्यासवे शब्द येती तुझे हे पर्णातुनी वाटते नांदती हे गंधापरी वाहते का तुझी आठवण? येती जशी पाऊले चांदण्याची होते कशी काहिली ही मनाची रातीस या भाळते का तुझी आठवण? दीपक पवार.
काव्यरस

जगणे

लेखक सागरसाथी यांनी मंगळवार, 01/11/2022 21:33 या दिवशी प्रकाशित केले.
आला दिवस पुढे ढकलणे, जगणे नाही मरणा आधी जगत राहणे, जगणे नाही. जीवन म्हणजे ऊन सावल्यांचा खेळ सारा सावलीसाठी उन्हात पोळणे, जगणे नाही. करार मदार सजावट कागदावरची जूने शब्द उगाळत बसणे, जगणे नाही. होते ताटातूट किनारा आणि लाटांची इथे पुळणीवरची नक्षी जपणे, जगणे नाही हातावच्या रेघांना अर्थ नसतो प्रत्येक वेळी नेहमी नशीबाला बोल लावणे, जगणे नाही. ----- अभय बापट ३१/१०/२०२२
काव्यरस

शहरातले गाव

लेखक पाषाणभेद यांनी शुक्रवार, 21/10/2022 14:22 या दिवशी प्रकाशित केले.
रस्त्याने जातांना अचानक उंच इमारती डोंगर होतात त्यावरील काचेची तावदाने डोंगरावरील हिरवळ होते रस्त्यांच्या नद्या होतात त्यातून रहदारीचे पाणी वाहते जाणारी वाहने होड्या होतात बाजूची घरे शेतातली झाडे होतात त्यावेळी मात्र मी शहरातल्या गर्दीपासून दूर गावात पोहोचतो - पाभे २१/१०/२०२२

दुपार

लेखक कर्नलतपस्वी यांनी शुक्रवार, 21/10/2022 08:13 या दिवशी प्रकाशित केले.
झोपली होती दुपार घेऊन कोवळ्या उन्हाला आवाज शांत स्पंदनांचा ऐकू येई मनाला तिरीप कोवळ्या उन्हाची जणू दुपारची एकदाणी झोपण्या आधी दुपारं गात होती बडबड गाणी पहुडली सुखाने अलवार पांघरून पदर थंडगार विसरून मध्यान्हीचा ताप निष्पाप सवे जीवाच्या झोपली दुपार....

कुणा न कळता.

लेखक Deepak Pawar यांनी मंगळवार, 18/10/2022 09:11 या दिवशी प्रकाशित केले.
कुणा न कळता भेटत होतो तेव्हा आपण शब्दा वाचुनी जाणत होतो तेव्हा आपण. नुकता वसंत आला झाड झाड मोहरले नुकते हृदयी आपुल्या प्रीत झरे पाझरले नवे फुलोरे झेलत होतो तेव्हा आपण. भिडता डोळ्यास डोळे हृदयी अनामिक सूर पळभर दूर होता का उठते मनी काहूर मनो मनी का झुरत होतो तेव्हा आपण. तुझ्या आसपास माझे उगाच घुटमळने नजरेच्या कोनातून हळूच तुझे बघणे जरा आगळे वागत होतो तेव्हा आपण. दीपक पवार.

कुण्या देशिचा असेल वारा??

लेखक प्राची अश्विनी यांनी रविवार, 02/10/2022 14:36 या दिवशी प्रकाशित केले.
दूरदेशिचा दरवळ घेऊन, झुळझुळणारा येतो वारा, धडधडणारे काळिज आणिक फडफडणा-या नयनी तारा. विशाल गो-या कपोलावरी घर्मबिंदु का सरसर जमती? वरवर सारे शांत तरीही खळखळणा-या मनात धारा.. सळसळणा-या उत्तरियाचा पोत रेशमी नकोनकोसा, थरथरणा-या कायी स्मरतो स्पर्श कोणता हवाहवासा? किणकिणणा-या कंकणास का कुणकुण कोणा अगंतुकाची? रुणझुण रुणझुण नाचति नुपुरे, पावलांस मग कुठला थारा? घेऊन घागर, घाबरघाबर, घरून निघते पाणवठ्यावर; कुणी यौवना झरझर भरभर, तमाचीच वर ओढुन चादर. कुंडल, कंकण, बिंदी, पैंजण..