कधी वाटते पुन्हा एकदा मागे जावे
निसटल्या क्षणांना पुन्हा धरावे
पारंब्या वरती झुलता झुलता
पदराखाली पुन्हा लपावे
कधी वाटते पुन्हा एकदा मागे जावे
भोगल्या क्षणांना पुन्हा जगावे
आठवणीतले विस्मृत चेहरे पुन्हा एकदा तरी दिसावे
डोळ्या मधले दवबिंदू अन् चेहर्यावरले धुके पुसावे
हुरहुरत्या त्या कातरवेळी ,कधी कुणाची वाट बघावी
दुरून बघता ओंजळीतली, प्राजक्ताची फुले दिसावी
किती मिळाली किती गळाली, मनात आता खंत नसावी
मात्र मागणे एकच ,मावळतीची दिशा पूर्व असावी!!
कधी वाटते पुन्हा एकदा मागे जावे
भोगल्या क्षणांना पुन्हा जगावे
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
7254
प्रतिक्रिया
21
मिसळपाव
प्रतिक्रिया
कविता आवडली, अर्थ स्पष्ट होत नाहीये.
ह्म्म....
आता सुधारणे कठीण वाटते....
In reply to ह्म्म.... by कर्नलतपस्वी
आता सुधारणे कठीण वाटते....
In reply to ह्म्म.... by कर्नलतपस्वी
मोबैलैवजी ल्यापटोपावरि टंकावे म्हणिजे बरे.
कर्नल सर
सहज काही सुचले म्हणून
In reply to कर्नल सर by चांदणे संदीप
हुरहुरत्या कातरवेळी कधी
सुरेख आहे!
छान.
खूप छान कविता
कविता आवडली!!
सर्व वाचकांचे मनापासून आभार..
मावळतीची दिशा पूर्व असावी
माझ्या दोन ओळी
भक्ती धन्यवाद.
In reply to माझ्या दोन ओळी by Bhakti
छान कविता!
स्नेहाताई, प्रतिसादाबद्दल
In reply to छान कविता! by सस्नेह
स्नेहाताई, प्रतिसादाबद्दल
In reply to छान कविता! by सस्नेह
आठवणी दाटत आहेत.
कंजूस भौ....
In reply to आठवणी दाटत आहेत. by कंजूस