मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

कथा

काकडेच्या खुन्याची कथा.

भागो ·
काकडेच्या खुन्याची कथा. तो एक धंदेवाईक खुनी होता. माफक फी आकारून खून करण्यात तो माहीर होता. खून करायचे तंत्र त्याने अभ्यास करून विकसित केले होते. बळीच्या सामाजिक प्रतिष्ठे प्रमाणे तो फी आकारत असे. राजकारणातील प्रसिद्ध व्यक्ति असेल तर जास्त धोका कारण पोलीस मग गुन्हेगाराला पकडण्याचे काम कसोशीने करतात. मग फी पण तशीच. बिल्डर घेतलेले कर्ज परत करायला काच कूच करू लागला की मग फायनान्सरने तरी काय करावे. कर्ज माफ करायला लागले तर धंदा कसा होणार. छातीवर दगड ठेऊन त्याला बोलावणे पाठवावे लागते.

चूक

अमरेंद्र बाहुबली ·
तिची ती संतापी नजर मला सतत विचारत असते, “माझी काय चूक होती? माझ्या येण्याने तिच्या आयुष्यात एवढा मोठा बदल होईल, याचा मला कधीच अंदाज नव्हता. आम्ही दोघे एकाच कॉलेजात होतो. कॉलेजातील ती रग माझ्या अंगातही होती. ती आणि मी एकाच वर्गात होतो. साधी काळीसावळी, पण नीटनेटकी ती. रोज सायकलवरून कॉलेजला यायची, एक दिवसही गैरहजर राहायची नाही. कँटीनचा नाश्ता परवडणार नाही, म्हणून तिच्यासारख्याच चार मुलींसोबत घरून आणलेला डबा खायची. जेव्हा वर्गात विचारलं गेलं, “ग्रॅज्युएट होऊन काय करायचंय?” तेव्हा तिने आत्मविश्वासाने सांगितलं, “मला बँकेत नोकरी करायची आहे.” तिची घरची गरीबी माहीत असल्यानेच मी हे धाडस केलं होत.

आभास हा....

नूतन ·
[ इंग्रजी लेखक विल्यम एस गिल्बर्ट यांच्या अँजेला- ॲन इन्व्हर्टेड लव स्टोरी ‌या कथेचा भावानुवाद ] मी एक चित्रकार आहे. गेली अनेक वर्षे पक्षाघातामुळे मी अंथरुणाला खिळलेला एक रुग्ण आहे. मी खुर्चीत बसू शकतो, पण कुणाच्या तरी मदतीनेच. . तसा मी मूळचा इंग्लिश पण आज गेली सहा वर्षं, व्हेनिस कालव्या जवळच्या एका इमारतीमधील एका लहानशा खोलीत मी वास्तव्य करतो आहे, एकटाच ! नाही नाही.... कानानं अधू असलेली एक वृद्धा माझ्यासोबत इथे राहते. ती मला जेऊ घालते .माझं अंथरुण घालते . थोडक्यात माझी सेवा करते. आणि माझ्या भरण पोषणाचं काय? सांगतो ,सांगतो. मी आधी म्हटलंच आहे की मी एक चित्रकार आहे.

आंतरजालीय थरार.! भाग १

भागो ·
The Internet can be a dangerous place! काही दिवसांपूर्वी माझा संगणक दारू प्यालेल्या माणसासारखा वागायला लागला. यावर खरा इलाज असा होता कि माझ्या एका तज्ज्ञ मित्राकडे जाऊन त्याच्याकडे संगणक पटकून द्यायचा. त्याऐवजी मी माझे डोके चालवायचा प्रयत्न केला. माझ्या मनाने असे ठरवले कि माझ्या RAM मध्ये काही तरी लोच्या झालेला आहे. RAM कमी पडतो आहे. त्यामुळे साधी .docx फाईल लोड करायलाही संगणकाची दमछाक होतेय. मग शोध सुरु झाला अशा चाळणीचा कि ज्याच्या साठी अत्यंत कमी RAMची आवश्यकता लागेल. ह्या शोधात माझ्या हाती काय काय रत्ने घावली हा स्वतंत्र धाग्याचा विषय आहे.

पुष्पा २: द रूल् - संक्षिप्त ओळख वगैरे

वामन देशमुख ·
एकाच आठवड्यात हा सिनेमा मी दोनदा पाहीला. पहिल्यांदा कुटुंबीयांसमवेत हिंदीत एका थेटरात; चार दिवसांनी मित्रांसमवेत तेलुगूत दुसऱ्या एका थेटरात. पुष्पा १: द राइज् आवडलेला होताच. पुष्पा २: द रूल् अधिकच आवडला. इतर कोणत्याही लोकप्रिय तेलुगु सिनेमातल्यासारखाच या सिनेमातही प्रचंड मसाला आहे.

वावटळ

सुजित जाधव ·
पुस्तक_परिचय: वावटळ लेखक: व्यंकटेश माडगूळकर जानेवारी २०२४ मध्ये मिपावर व्यंकटेश माडगूळकर यांच्या करुणाष्टक कादंबरीबद्दल लिहले त्यावेळी @मिसळपाव यांनी मला माडगूळकरांची वावटळ कादंबरी वाचण्यासाठी सुचवले होते. त्यानंतर ३-४ महिन्यांनी मी वावटळ वाचून काढली. कादंबरी वाचली त्याच रात्री या लेखातील काही भाग टंकून ठेवला होता आज जवळजवळ सहा महिन्यानंतर तो संपादित करण्याचा योग जुळून आला. ______________________________________________ ३१ जानेवारी १९४८ चा दिवस. नथुराम गोडसे नावाच्या व्यक्तीने पिस्तुलाने गोळ्या झाडून महात्मा गांधीजींची हत्या केली.

मराठवाड्यातील एक लग्न आणि इतर निरीक्षणे

वामन देशमुख ·
मराठवाड्यातील एक लग्न आणि इतर निरीक्षणे परभणी जिल्ह्यातल्या एका लहानशा गावी, माझ्या आजोळच्या एका लग्नाला यायचं होतं. काल रात्री सिकंदराबादहून १७६६३ या रेल्वेने बसलो. आज सकाळी परभणीला आलो. तिथून आधी १७६६८ या गाडीने, नंतर एका जीपने लग्नाच्या गावी आलो. फ्रेश होऊन नाश्ता झाल्यानंतर दाढी ट्रिम् करायला बाहेर पडलो. या गावात दोन सलुन आहेत. आधी एका ठिकाणी गेलो तर तिथे दोनजण आधीच बसून होते. दुसरा दुकानात तीनजण बसून होते. परत पहिल्या दुकानात आलो. वाट पाहण्याशिवाय गत्यंतर नव्हते.

पळ….

अमरेंद्र बाहुबली ·
. मी रेल्वेत चढलो. पुण्यासारख्या ठिकाणी एकच प्लॅटफॉर्म कसा असेल? पण इथे तर एकच प्लॅटफॉर्म दिसतोय. असो. जनरलच्या डब्यात एक चांगलं असतं, कमी पैशात जाता येतं, बुकिंग वगैरेची झंझट नाही. जवळपासच्या गावात उतरणारेच जनरलच्या डब्यात चढतात. जनरलच्या डब्यात असते तशी भरपूर गर्दी ह्या डब्यातही होती. रेल्वे हडपसरला थांबली. हडपसरला रेल्वे स्टेशन आहे? हे माहित नव्हतं. बरेच लोक चढले, काही उतरले, डबा गच्च भरला होता. एक मुलगा दिसला, माझा भाचा शिवम सारखा, तेवढंच वय असावं १९-२०. त्याने लाल फुल टी-शर्ट आणि जीन्स घातली होती.

लाडका नातू..

आजी ·
मी आज तुम्हाला माझ्या आईने मला माझ्या लहानपणी सांगितलेली एक गोष्ट सांगणार आहे. म्हणजे मला ती अचानक आठवली. ती का आठवली यावर अजून माझा विचार आणि मौन चालू आहे. ही कथा म्हणजे काहीशी प्रचलित बोधकथाच आहे. त्यामुळे नवीन कथा म्हणून त्यात किती मूल्य आहे कोण जाणे. पण "मूल्य" या गोष्टीबद्दल मात्र ही कथा नक्की बोलते. एका गावात एक म्हातारे गृहस्थ राहत होते. त्यांचं वय असेल सत्तरच्या आसपास. त्यांना सगळे आबा म्हणून हाक मारायचे. आबा सत्तर वर्षांचे असले तरी काटक होते. व्यायाम करायचे. दिवसभर काबाडकष्ट करायचे. त्यांना बायको मुलं नव्हती. बायको पूर्वीच मरण पावली होती.

सूर्य पाहिलेला माणूस

प्रसाद गोडबोले ·
सकाळचे साधारण सात वाजले असावेत. श्रावण संपून गेला होता नुकताच तरी अजून आकाशामध्ये ढगांची दाटीवाटी होती. पश्चिमेकडे दूरवर दिसणाऱ्या यवतेश्वरचा डोंगर मात्र अजूनही ढगांच्या दाट धुक्याआड होता, दक्षिणेकडे मात्र अजिंक्यतार्‍याने हिरवीगार दुलई पांघरली होती, पांढरेशुभ्र धबधबे फिसाळत वहात त्या हिरवाईतुन वाट काढत होते. पुर्वेकडे सुर्योदय होऊन गेला होता मात्र सुर्याचा अजुनही ढगांआड लपंडाव चालु होता. हवेत एक आल्हाददायक गारवा होता.