Skip to main content

कथा

विषारी सरोवर : युधिष्ठिराची अखेर

लेखक विवेकपटाईत यांनी बुधवार, 21/01/2026 13:22 या दिवशी प्रकाशित केले.
बराच वेळ वाट पाहून अखेर युधिष्ठिर आपल्या भावंडांना शोधायला निघाला. दूर-दूर पसरलेल्या वाळवंटात एकही वृक्ष दिसत नव्हता. सूर्य आग ओकत होता. तहानेने त्याचा गळा कोरडा पडला होता. अखेर त्याला वाळवंटात दूर एक सरोवर दिसले. "आता पाणी मिळेल, तहान भागेल," या आशेने तो त्वरित सरोवराजवळ पोहोचला. पाहतो काय, भीम, अर्जुन, नकुल आणि सहदेव सरोवराच्या काठावर निष्प्राण पडलेले! हे दृश्य पाहून युधिष्ठिर व्यथित झाला. त्रिलोक विजयी भीम आणि अर्जुनाची अशी अवस्था कुणी केली असावी? बहुतेक सरोवराचा रक्षक यक्ष असावा.

सैरभैर डायरी - २.४

लेखक कपिलमुनी यांनी शुक्रवार, 16/01/2026 15:05 या दिवशी प्रकाशित केले.
२.१ २.२ २.३ ज्याचा पगार ७००० आहे.त्याला एकरकमी २ लाख म्हणजे मोठी रक्कम होती. बुलेटची डुग डुग कानात ऐकू यायला लागली होती. २.४ विचार करून सांगतो म्हणून बाहेर सटकलो. बिल्डरला प्रत्यक्ष बघणारा मी एकमेव साक्षीदार होतो , माझ्या साक्षीवर केस बरीच पुढे जाणार होती . पोलिसांना मोठा रीमांड मिळाला असता म्हणून ही गुळपट्टी लावणे चालले होते. उगाच माझ्या मागे झा*उपट ! असला रोज रोज थोडी आपल्या आयुष्यात घडते ?

सैरभैर डायरी - २.३

लेखक कपिलमुनी यांनी सोमवार, 12/01/2026 19:27 या दिवशी प्रकाशित केले.
२.१ २.२ "मामू गाडी बाहेरवाली साईटला घे, देखते है ,क्या बताया भाईंने पोलिस को "उस्मानने थंड आवाजात सांगितले. २.३ उस्मान माझ्याकडे आणि मी त्याच्याकडे बघत अंदाज घेत होतो. पलीकडे डोकावून मामूला बोललो, "जातीवर आलास भाडखाऊ ! याला सोड तुलाच पहिला धरणार मी !" मामूला एकदम जिवाला लागले. "२ मिनिट बोलायचा भाउ , बाकी काही नाही, दीदीचा रीश्तेदार लागतो " पण मामूने गाडी साईटऐवजी कट्ट्याकडे घेतली.त्यालापण माहिती होते, कट्ट्यासोबत पंगा घेतला तर नंतर गावात पळवून मारतील..

दहा मिनिटांत घरपोच.

लेखक chetanasvaidya यांनी रविवार, 11/01/2026 10:02 या दिवशी प्रकाशित केले.
ब्लिंकिट, इन्स्टामार्ट, झेप्टो आणि असे अन्यही खूप क्विक कॉमर्स प्लॅटफॉर्म्स आता एकमेकांशी स्पर्धा करत दहा मिनिटांच्या डिलिव्हरी शर्यतीत उतरले आहेत. हे डिलिव्हरी करणारे लोक प्रचंड ताणाखाली वेगाने वाहने चालवतात हे आपल्याला रस्त्यात दिसतंच.

सैरभैर डायरी - २.२

लेखक कपिलमुनी यांनी गुरुवार, 08/01/2026 00:26 या दिवशी प्रकाशित केले.
२.१ मॅडम, त्या पोरींना घेऊन या. पोरी लंगडत आल्या.. थोड्या जखमा दिसत होत्या.. "हाच होता का तो?" पोरींनी मान डोलावली आणि माझ्या पायाखालची जमीन सरकली. आई, बाप ,नोकरी ते जेलमधला संडास सगळ गरगर फिरायला लागले २.२ "जा मॅडम पोरींना घेऊन, मेडिकल झाली असाल तर वॉश करून येऊ दे." मॅडम पोरींना घेऊन गेल्या. "पोरींना ओळखता का या?" साहेबांचा प्रश्न . "हो साहेब .

सैरभैर डायरी - २.१

लेखक कपिलमुनी यांनी सोमवार, 05/01/2026 15:20 या दिवशी प्रकाशित केले.
आयुष्यात काय काय गंमती जमती झाल्यात चाळीशी नंतर याच्या आठवणी लिहाव्यात आता असा विचार केला. यात सलगता काही नाही. सामान्य माणसाच्या आयुष्यातील सामान्य घटना ! पहिल्या भागाला प्रतिसाद देणार्यांचे आभार .

विश्वासाचे तर्क आणि तर्काचा विचार

लेखक देवू यांनी सोमवार, 05/01/2026 01:27 या दिवशी प्रकाशित केले.
चित्रपटांत दाखवतात तसे, आई-वडील मुलांना कवेत घेऊन नीतिमूल्यांचे बाळकडू पाजतात तसा प्रसंग माझ्या वाट्याला कधीच आला नाही. “हे चूक आहे” किंवा “ते करू नकोस” असे बोट दाखवत शिकवण देण्याचा सोहळा आमच्या घरात कधी घडला नाही. वाईट गोष्टी करू नयेत, हे मला घरातून नव्हे तर शाळेत गेल्यावर गांधीजींच्या " तीन माकडांनी " शिकवले. मात्र उपदेशांचा अभाव असला तरी वाचनाचा संस्कार आमच्या घरात नि:शब्दपणे रुजवला गेला होता. घरात येणारी मराठी आणि इंग्लिश वर्तमानपत्रे दररोज वाचलीच पाहिजेत, असा बाबांचा न बोलता आलेला पण ठाम आदेश होता. सुरुवातीला मी मराठी ‘मटा’ वाचून दिवसाची सुरुवात करत असे.

"चित्रगुप्ताचा न्याय: सेल्फी घेणारा माकड झाला"

लेखक विवेकपटाईत यांनी मंगळवार, 30/12/2025 08:15 या दिवशी प्रकाशित केले.
त्याचा मृत्यू झाला. त्याचा आत्मा एका प्रकाशमार्गाने चित्रगुप्ताच्या दरबारात पोहोचला. त्याला समोर एक विशाल न्यायासन दिसले , त्यावर चित्रगुप्त विराजमान होते . ते धवल वस्त्रात, तेजस्वी आणि शांत दिसत होते. त्यांच्या पुढ्यात असंख्य ग्रंथ होते. त्यात पृथ्वीवरील प्रत्येक माणसाने केलेल्या पाप आणि पुण्याचा हिशोब होता. चित्रगुप्ताने विचारले, “कुठे जाण्याची इच्छा आहे?” तो आत्मा म्हणाला, “माझ्या जीवनात अनेक चुका झाल्या, पण शेवटी मी भगवंताच्या दर्शनाला गेलो. त्यांच्या चरणी क्षमा मागितली. माझे पाप नष्ट झाले. मला स्वर्ग मिळाला पाहिजे.” चित्रगुप्ताने एक जड ग्रंथ उघडला.

५- तेरी नजरो से आज नजर मिलाना चाहती हु

लेखक विजुभाऊ यांनी शनिवार, 27/12/2025 23:51 या दिवशी प्रकाशित केले.
माईदेखील पोटुशी होती. त्यामुळे तीला यायला जमले नव्हते. मी घरी आले.काही दिवस शरीराला आराम मिळाला.माई अवघडलेली होती. तीला बिचारीला त्रास होतोय ते मला कळत होते. पण मलाही थोडा आराम मिळाला. घरातल्या कामाचे काही वाटत नाही.पण वैकुंठरावांच्या त्रासापासून काही दिवसतरी सुटका झाली. क्रमशः मागील दुवा https://www.misalpav.com/node/53387 मला डोहाळ्यांचा त्रास व्हायला लागला. काहीही खाल्ले की पोटात टिकत नाही. कसली कसली स्वप्ने पडायला लागली.

४- तेरी नजरो से आज नजर मिलाना चाहती हु

लेखक विजुभाऊ यांनी शुक्रवार, 26/12/2025 20:23 या दिवशी प्रकाशित केले.
वैकुंठराव अगोदरच कुठेतरी निघून गेले होते. सासुबाईंनी ओठावर लावायला सायीची वाटी दिली. म्हणल्या हे लाव.तोंडावर. आणि सगळं आवरून मगच ये बाहेर. भरल्या घरात असलं रडव्या तोंडाने नांदायचे नसते. लक्ष्मी बाहेर निघून जाते अशाने. क्रमशः मागील दुवा : https://www.misalpav.com/node/53386 खूप गदगदून रडायचे होते पण गळ्यातले त्राणच संपून गेले होते. त्या दिवशी तशीच पडून राहिले. खाण्यापिण्याचीही वासना हरवली होती. संध्याकाळी सासूबाई नी जवळ घेतले. माझ्या पाठीवरून तोंडावरून हात फिरवला. मला माई आठवली. मला कुठे दुखले खुपले की ती ही असेच करायचे.