कथा
सुंदरी आणि जत्रा ...... खलील जिब्रान
एका मोठ्या शहरात जत्रा भरली होती. एक अवखळ सुंदरी शेजारच्या खेड्यातून त्या जत्रेस आली.
खळाळणाऱ्या निर्झराप्रमाणे तिचे हसू होते. गालांवर गुलाबाच्या कळ्यांची लाली विलसत होती.
सूर्यास्ताची सोनेरी हुरहूर तिच्या रेशमी, भुरभुरणाऱ्या केसांत रेंगाळत होती.
उषेप्रमाणे तिचे मुखमंडल अगदी प्रसन्न होते.
सूर्याने पृथ्वीचे चुंबन घेताच, क्षितिजाचे ओठ विलग व्हावेत, त्यातून केशरी हसू निसटावे, तसे तिचे हसरे ओठ!
आठवणींच्या वहीतून
स्थळ : दहावी अ चा वर्ग
वेळ: मधल्या सुट्टीनंतरची
त्या दिवशी शेवटचे चार पिरिअडर्स सायन्स-1 च्या प्रक्टिकल्सचे होते. दहावीला सायन्स-1 हां विषय विश्वासराव मेडम घ्यायच्या. वर्गात बेंचच्या पाच रांगा होत्या. प्रत्येक रांगेत जवळपास पंधराएक मुले बसायची. वर्गाबाहेर कधीही कुठेही जाताना मुले नेहमी ह्या बेंचच्या रांगाच्या हिशोबानेच निघायची. सगळ्यात पहिली दाराजवळची पहिली रांग, मग त्याच्या बाजूची ,मग त्याच्या बाजूची.
प्रक्टिकल्स म्हटले की आमच्यासाठी पर्वणीच असायची. मेडम तिकडे प्रयोगशाळेत बिझी असताना सगळा वर्ग 2 तासासाठी निवांत असायचा.
माणूस ..... खलील जिब्रान
माझ्या भटकंतीत मी एका बेटावर पोहचलो.
तिथे मला एक राक्षस दिसला. त्याचे शरीर अवाढव्य होते. पायाला लोखंडी खूर होते.
परंतु, त्याचे डोके मात्र माणसाचेच होते.
तो, पृथ्वीवरील घनदाट जंगले, उंच उंच पर्वतं, विस्तीर्ण पठारे, समृद्ध खाणी अधाशीपणे खायचा.
त्याचा तो अधाशीपणा मी बराचवेळ पहात राहिलो. शेवटी त्याला विचारले,
‘ इतके सारे खाऊन पिऊनही , तुझी तहानभूक शमतच नाही का?’
त्यावर राक्षस म्हणाला, ‘मित्रा, तसे तर माझे पोट कधीच भरले आहे!
एवढेच नव्हे, तर मला या खाण्यापिण्याचाही अतोनात कंटाळा आलाय .
पण, माझ्या मनात सारखी एकच भीती असते – उद्या खाण्यासाठी पृथ्वी राहणार नाही, आणि पिण्यासाठी समुद्र राहणार नाही.
युद्ध आणि छोटेसे देश...... [ खलील जिब्रान ]
एका कुरणात एक कोकरू आपल्या आईबरोबर चरत होते.
त्याचवेळी एक गरुड, उंच आकाशातून वखवखलेल्या नजरेने त्या कोकराभोवती घिरट्या घालू लागला.
गरुड खाली झेपावून कोकरावर झडप घालणार, इतक्यात आकाशात दुसरा एक गरुड हावरट पणे गिरक्या घेऊ लागला.
त्याचीही नजर त्या कोकरावर अन त्याच्या आईवर!
ते पाहून पहिला गरुड खवळला.
त्या दोन पक्षीराजांमध्ये जमिनीवरील कोकरासाठी आकाशातच युद्ध सुरु झाले.
त्यांच्या कर्कश आवाजाने आसमंत भरून गेला.
कोकराच्या आईने वर पाहिले.
एका जत्रेची सत्यकथा ! (ज्यांच्या धार्मिक भावना वगैरे पटकन दुखावल्या जातात त्यांनी हा लेख वाचू नये . )
ही एका देवळा मागची गोष्ट . एका छोट्या गावातले हे देऊळ. दरवर्षी इथे जत्रा भरते. तिथे लाखो लोक येतात. सरकारतर्फे त्यासाठी ज्यादा गाड्या सोडल्या जातात, लोकप्रतिनिधी प्रचंड निधी देतात. दरवर्षी भाविकांची संख्या फुगतच चालली आहे .त्यात आजकाल अनेक वीवीआयपी भाविक असतात . त्या देवळाची तुलना आता थेट पंढरपूराशी केली जाते . तर या देवळाची किंवा जत्रेची ही सत्यकथा .
सुमारे १८५० नंतरचा काळ. (नक्की साल माहित नाही ). ब्रिटीश राजवटीत अनेक छोटेमोठे संस्थानिक होते . त्यातील एका छोट्याश्या संस्थानिकाच्या पदरी एक सरदार होता . आजूबाजूच्या गावातील सारा वसुलीचे काम त्याच्याकडे होते.
मोरूचा मिपासंन्यास...!
गुढीपाडवा आला. सकाळ झाली .
पूर्वी मोरूचा बाप मोरूला म्हणे - ''अरे मोरू, उठ ! आज गुढीपाडवा आहे. आटपून तयार हो लवकर. वगैरे ''
लहानपणापासून मोरूला सवयच तशी होती. मोरूची हालचाल झाली पण डोळे मुळीच उघडेनात. बाबांनी उठवल्याशिवाय मोरूला मुळीच जाग येत नसे- गजराने तर नाहीच नाही .
पण आताचा हा आवाज वेगळाच अन नाजूक होता , ''अरे मोरू, उठ ना ! चहा घे -गार होईल …''
'' हे काय भलतंच ! बाबा चहा घेऊन आले कि काय? अन त्यांचा आवाज असा बायकी का झालाय? '' थांबा जरा '' म्हणून कुशीवर वळला , तेव्हढ्यात ''अरे आता उs s ठ ना ! '' असा दीर्घ पुकारा झाल्यावर उठून बसणं भाग होतं.
दर्शन
गवताच्या एका पात्याने पिंपळाच्या प्रचंड सावलीकडे तक्रार केली,
'तू सारखी इकडून तिकडे हलत राहतेस, माझी शांतता भंग पावते!'
सावलीने उत्तर दिले,
'मी हलत नाही. जरा वर पहा, तिथे एक झाड आहे आणि ते वाऱ्याने चहूबाजूंनी हलते!'
गवताच्या पात्याने आपले इवलेसे डोळे वर करून पहिले........
........ आणि जीवनात पहिल्यांदाच त्याला आपल्यावरील वृक्षाच्या विराट रूपाचे दर्शन घडले!
ते पाते मनातल्या मनात म्हणाले, ' माझ्यापेक्षा हे गवत खूप विशाल आहे!'
..... तेव्हापासून ते पाते शांतचित्त झाले.
खलील जिब्रानच्या 'The Shadow'या लघुकथेचा भावानुवाद.
मिसळपाव