एका कुरणात एक कोकरू आपल्या आईबरोबर चरत होते.
त्याचवेळी एक गरुड, उंच आकाशातून वखवखलेल्या नजरेने त्या कोकराभोवती घिरट्या घालू लागला.
गरुड खाली झेपावून कोकरावर झडप घालणार, इतक्यात आकाशात दुसरा एक गरुड हावरट पणे गिरक्या घेऊ लागला.
त्याचीही नजर त्या कोकरावर अन त्याच्या आईवर!
ते पाहून पहिला गरुड खवळला.
त्या दोन पक्षीराजांमध्ये जमिनीवरील कोकरासाठी आकाशातच युद्ध सुरु झाले.
त्यांच्या कर्कश आवाजाने आसमंत भरून गेला.
कोकराच्या आईने वर पाहिले. त्यांच्यातले भयाण भांडण पाहून ती आपल्या कोकराजवळ आली,
म्हणाली,
'मुला, या दोन महान पक्षीराजांनी एकमेकांवर आक्रमण करावे, हे किती विचित्र आहे!
हे अमर्याद आकाश याना पुरेसे नसेल काय!
माझ्या पिल्ला, मनातल्या मनात तू देवाला प्रार्थना कर की,
देवदूतासारखे पंख लाभलेल्या तुझ्या आकाशातील भावंडांमध्ये शांतता निर्माण होऊ दे.
त्यांच्यातील भांडण मिटू दे!'
....... आणि त्या निष्पाप कोकराने पटकन डोळे मिटून परमेश्वरापाशी प्रार्थना करायला सुरुवात केली!
- 'War and the Small Nations' या खलील जिब्रानच्या रूपक कथेचा भावानुवाद.
वाचने
12840
प्रतिक्रिया
25
मिसळपाव
प्रतिक्रिया
सुंदर
भयचकीत
त्या कोकराला हे ठाऊक नाही की
+१ पण...
In reply to त्या कोकराला हे ठाऊक नाही की by विजुभाऊ
त्या दोघात सत्ता संघर्ष चालू असेल तोवर कोकराला भय नाही.हे पण तेव्हाच खरे आहे जेव्हा तुम्ही दोन हत्तींच्या मारामारीच्या ठिकाणापासून सुरक्षित अंतरावर असाल !+१
In reply to +१ पण... by डॉ सुहास म्हात्रे
वाह!
छान अनुवाद!
विशाखा.... आजही त्या किंवा
कोकरु
छान रुपक कथा.
याला प्राक्तन सुद्धा म्हणता
रूपक अतिशय चपखल आहे.
अवांतराचे सवांतर.
In reply to रूपक अतिशय चपखल आहे. by एस
हा फारच अभ्यासपूर्वक
In reply to अवांतराचे सवांतर. by बॅटमॅन
अवश्य.
In reply to हा फारच अभ्यासपूर्वक by एस
खलील जिब्रान!!! _/\_
उजवी अमेरिका आणि डावी रशिया ,
इतक्या सगळ्या इतिहासातून
In reply to उजवी अमेरिका आणि डावी रशिया , by विवेकपटाईत
राष्ट्र छोटे वा मोठे कसेही
भावानुवाद आवडला...
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी:- Ye Naa Gade... ;) { हंटर }व्हिएतनाम युद्धात सर्वात अधीक
असहमत.केनेडींचा एवढा संबंध नव्हता.
In reply to व्हिएतनाम युद्धात सर्वात अधीक by विजुभाऊ
मस्त रुपककथा
सुरेख
अशी ताकद पाहिजे कथेत...!!!