कथा
लायब्ररी लव 2
लायब्ररी लव 2
'डस्टी ये आपण थोडे काम करुया, ' डस्टीला पुस्तक रॅक च्या खाली बसलेली पाहून म्हणाले , डस्टी माझ्या कडे पाहून आळसामुळे हळुच डोळे उघड झाक करू लागली, मी रॅक च्या खाली हात घालुन तीला माझ्याकडे ओढले व तीला घेऊन उभी राहीले. हातात तीला घेता डस्टीने मोठी जांभई दिली व अचानक तीने उंदराचे पिटुकले पाहून माझ्या हातातुन उडी मारून त्या उंदराच्या मागे धावू लागली. मी तीच्या मागे गेले पण मला ती कोठेच दिसेनासी झाली.
' डस्टी तु कोठे आहेस?,' मी हळु आवाजात म्हणाले'
'माईऊ ..माईऊ....',मी तीचा अवाज काढुन बोलवू लागले.
बिडी काडी
माझे मूळ गाव थेऊर(चिंतामणीचे). तसे उरुळी कांचन (जिथे गांधीजींचा निसर्गोपचार आश्रम आहे) पण बालपण थेऊर मधेच गेले. आई-वडील तिथल्याच हायस्कूल मध्ये शिक्षक म्हणून नोकरीला होते. आम्ही d-type चाळीमध्ये मध्ये रहायचो. साखर कारखान्याने ही चाळ बांधली होती. भरपूर मित्र. गोट्या, सूरपारंब्या, कांदाफोड, क्रिकेट, विष अमृत, लपाछपी, अप्पाराप्पी, शिवाजी म्हणतो, donkey-monkey, विटी दांडू, असे अनेक खेळ आम्ही खेळायचो.
माझ्याबद्दल थोडक्यात
मी कुठल्याही धर्माच्या विरोधात नाही, हिंदूंच्या तर नाहीच नाही! पण आपला तो बाळासाहेब आणि दुसऱ्याच कार्टं या मानसिकतेच्या विरोधात आहे. मी सर्व धर्मांच्या ठेकेदारांच्या विरोधात आहे. मी अंधश्रद्धेच्या विरोधात आहे. मी whatsapp आणि facebook वर अफवा आणि चुकीचे संदेश पसरवणार्यांच्या विरोधात आहे. माझे स्वातंत्र्योत्तर भारतावर काडीचे सुधा प्रेम नाही, परंतु स्वातंत्र्यपूर्व भारतावर मी मनापासून प्रेम करतो. त्या काळात जन्म झाला असता तर नक्कीच देशासाठी फासावर गेलो असतो.
दुलई.......
परवा दोशी फाऊंडेशनच्या नाट्यमहोत्सवाला जाण्याचा योग आला. त्यात शेवटच्या दिवशी नासिरुद्दीन शाह, रत्ना शाह व हिबा शहा यांनी सादर केलेल्या इस्मत चुगताईंच्या कथाकथनाचा कायम लक्षात राहील असा कार्यक्रम झाला. या तिघांनी त्या कथा त्यांच्या अभिनयाची जोड देऊन इतक्या बहारदारपणे सादर केल्या की बस ! अर्थात नासिरुद्दीन शाहच्या दिग्दर्शनाचा त्यात मोठा वाटा होता हे नाकारण्यात अर्थ नाही. पण सगळ्यात मोठा वाटा होता त्या कथांचाच.
आता खाली मी इस्मतआपाची एक कथा मराठीत अनुवाद करणार आहे ती त्यांनी १९४२ साली लिहिली. बाई मोठ्या हिंमतवान, समाजावर ढोंगीपणासाठी हलक्या फुलक्या विनोदाने टीकेचे आसूड ओढत.
विज्ञान कथा: "शापित श्वास!"
पृथ्वीवरचा निसर्ग-बिंदू वेगाने आकाशात चालला होता. तो काळोख्या अनंत आकाशात एका अज्ञात ठिकाणी खूप दूरवर पोहोचल्यावर त्यापासून पाच बिंदू वेगळे झाले- पृथ्वी, अग्नी, वायू, पाणी आणि आकाश! ही पंचमहाभूते एका महत्त्वाच्या चर्चेसाठी आणि निर्णय घेण्यासाठी एकत्र आले होते. ते पाचही बिंदू तरंगत होते.
अग्नी ने हसतच बोलायला सुरुवात केली, म्हणाला, "कमाल आहे माणसांची! पृथ्वी च्या अंताबद्दल त्यांनी चित्रपट बनवून देखील टाकला. २०१२. पण ते वर्ष उलटून गेले आणि त्याप्रमाणे झालेच नाही. बिचारी माणसे, त्यांना वाटत आहे की विज्ञानामुळे आपण निसर्गावर सुद्धा मात केली आणि निसर्ग आपला अंत कसा करेल हे सुद्धा आपण ठरवू.
थ्रील.....!!!!!
कधी कधी काही काही आठवणी आपला कधीच पिच्छा सोडत नाहीत. अगदी सावलीसारख्या आपल्याशी जोडल्या गेल्या असतात. अशीच एक आठवण माझ्याही आठवणीत आहे. जी आजही मला रात्रीची झोपू देत नाही. आजही ती रात्र माझ्यासमोर अगदी जशीच्या तशी उभी आहे. आजही तो झाला प्रसंग आठवला की अंगावर काटा येतो.
माझ नाव अमोल परब. गोष्ट तशी साधारण दहा बारा वर्षापूर्वीची. मी नुकताच बी.ई. पास आऊट झालो होतो. ते ही फर्स्ट क्लास विथ डिक्टिंशन. भरीसभर म्हणून मुंबई युनिर्व्हसिटीमधुन तिसराही आलो होतो. घरच्यांच्या आणि खासकरून बाबांच्या आनंदाला पारावार उरला नव्हता. ते फार खुश झाले होते.
“माझी जडण घडण”
माझे वडील इतिहास आणि गणिताचे शिक्षक आहेत. पण इंग्रजी व्याकरणावर सुद्धा त्यांची चांगली पकड आहे. मी शाळेत असताना त्यांनी माझ्याकडून active voice - passive voice, affirmative, negative हे सगळे प्रकार पक्के करून घेतले होते, आणि त्यांनी शिकवलेल्या इंग्रजीचा मला आयुष्यभर फायदा झाला.
अभियांत्रिकी डिप्लोमा झाल्यावर, माझ्याकडे नोकरी नव्हती. घरात किती दिवस बसून काढणार? काहीतरी करायला हवं म्हणून हात पाय मारायला सुरुवात केली. मोजून १७ ठिकाणी कॉलसेंटरच्या मुलाखती दिल्या. प्रत्येक ठिकाणी शेवटच्या HR मुलाखती पर्यंत गेलो, आणि HR ने हे सांगून मला नकार दिला कि, तुमच्या इंग्रजी भाषेवर मातृभाषेचा प्रभाव आहे.
फन एंड फ़ेअर
हा एक लई भारी प्रकार असतो . गेली कित्येक वर्षे गेलो नवतो . मला वाटतं , ६-७वीत असेन. शेवटचा अशा कोणत्या गोष्टीला गेलो असेन कोणाबरोबर ते. .
गावात दर वर्षी उन्हाळ्यात आधी सर्कस आणि मग फन फ़ेअर , काही ना काही येतच . नोवेंबर डिसेंबर पर्यंत डेरा असतो या लोकांचा गावात .
घरी लहान बहिण या दोन्ही पैकी एकी कडे जाण्याबद्दल मला विचारून विचारून कंटाळून रडून शेवटी माझा नाद सोडून द्यायची . प्रत्येक वेळी तिला म्हणायचो . मोठी झालीस आता . लहान मुलांचे नाद सोड .
पण तरीही त्यादिवशी पोचलो तिथे . काय आहे . बहिणीला नकार देणे सोप्प असतं हो . पण समोर एक अति गोड प्रकारात मोडणारी मुलगी थांबली अहे.
मिसळपाव