Skip to main content

कथा

अकादमी 8 :- ऑब्स्टकल आणि रूटमार्च

लेखक कैलासवासी सोन्याबापु यांनी बुधवार, 22/04/2015 15:47 या दिवशी प्रकाशित केले.
अकादमी मधे प्रवेश करून आता नऊ महीने झालेले. पासआउट परेड उर्फ़ पीओपी साठी फ़क्त दोन महीने उरले होते. आता नवीन काही शिकवत नव्हते , फ़क्त जे काही शिकलोय त्याची तंगड़तोड़ प्रैक्टिस चालली असायची, आम्ही ओसी ही आता बरेच seasoned झालो होतो, आता वेध होते फ़क्त पीओपी चे, कारण त्या दिवशी आम्ही आमच्या घरच्याना भेटणार होतो, बरेचवेळी "पीओपी ला काय होईल??" ह्या विचारात मी अन माझे आसेतु हिमाचल जमलेले मित्र विचार करत असु. पीओपी च्या वेळी कोणाला काय काम मिळेल हे आम्ही बोलत असु.

गेम ड्रोम - २

लेखक अद्द्या यांनी मंगळवार, 21/04/2015 11:15 या दिवशी प्रकाशित केले.
त्याचा प्लान होता चांगला . अगदी माझ्या आवडीचा होता . पण सध्या कशातच मन नवतं . गेल्या २५ वर्षाच्या आयुष्यात फक्त तेच ५-६ दिवस होते . जेव्हा मला पूर्ण हरल्यासारखं वाटत होतं . नापास होणं मोठी गोष्ट नवती . आधी हि मासिक परीक्षेत झालो होतो . पण लगेच पुढच्या परीक्षेत त्याची भरपाई हि केली होती . एक तर पुस्तकि किडा नवतो . जमेल तेवढ्या स्पर्धा आणि खेळ खेळायचो . त्यामुळे मासिक परीक्षा कधीच गृहीत धरली नवती . सहामाही आणि वार्षिक परीक्षेलाच काय तो अभ्यास करायचो .त्यामुळेच कोणत्याही परीक्षेत नापास होण्याने कधीच एवढं वाईट वाटलं नसतं . पण . त्या रात्री आई बाबांना बोलताना ऐकलं मी . बाबा रडत होते .

अकादमी 7 :- रगड़ोत्तम भारती बापूसाहेब

लेखक कैलासवासी सोन्याबापु यांनी सोमवार, 20/04/2015 15:49 या दिवशी प्रकाशित केले.
अकादमी मधे आता जवळ जवळ 8 महीने झाले होते, गेट च्या आत यायच्या आधी जो एक होमसिक हळवा बापूसाहेब होता तो 8 महिन्यात कुठे अन कधी गेला हे आजकाल मला पडलेले कोड़े होते, जवळपास सगळ्यांचीच अवस्था तशीच होती , आलो तेव्हा फिजिकल करताना आमची होणारी अवस्था आठवुन आम्ही आपापसात हसत असु त्या दिवसांत. आमच्या ट्रेनिंग चा एक एक पदर हळुहळु उलगडत होता. आता जे मोड्यूल होते ते होते बेसिक माउंटेनियरिंग उर्फ़ प्रार्थमिक गिर्यारोहण. वेगवेगळी गिर्यारोहणाची इक्विपमेंट त्याचे उपयोग इत्यादी ह्यात शिकवले जात असे. कारण मैक्सिमम ड्यूटी तिकडेच असणार होती आयुष्यभर. ह्यात नैसर्गिक प्रेरणे ने हीरो होता आमचा सांगे.

मीटर डाऊन

लेखक स्पा यांनी शुक्रवार, 17/04/2015 12:24 या दिवशी प्रकाशित केले.
ऑफिस मधून निघालो, बस स्टँड वर आलो तर हा धो धो पाऊस परत सुरु, चायला अख्खा दिवस मुसळधार पाऊस सुरु आहे, थांबायचे नाव नाही. मुंबईतला पाऊसच घाणेरडा चायला. मला २६ जुलै ची आठवण आली. FM वर सांगत होते, अर्धी मुंबई भरलीये पावसाने. बहुतेक ऑफिसेस दुपारीच सोडून दिली.आमचा बॉस हलकट पण एक नंबरचा, तो बाजूलाच राहतो. त्याला काय घेणंदेणं? अजिबात सोडले नाही आम्हाला. काम संपवून बाहेर पडेपर्यंत चांगलीच रात्र झालेली होती. गेला अर्धा तास बसची वाट बघतोय. ना बस ना टॅक्सी.हा रोड पण भरायला लागलाय पाण्याने. एरवी हे असले वातावरण मला जाम आवडले असते, एकदम थ्रील वाटते.

_सुखी वैवाहिक जीवनाचा गुरुमंत्र (बायकोचं प्रगतीपुस्तकं)

लेखक कॅप्टन जॅक स्पॅरो यांनी शुक्रवार, 17/04/2015 09:41 या दिवशी प्रकाशित केले.
पेर्णास्त्रोतः सुखी वैवाहिक जीवनाचा गुरुमंत्र श्री. सौंदर्य ह्यांची माफी मागुन. (काही तासांपुर्वी 'सुखी वैवाहिक जीवनाचा गुरुमंत्र ' हा लेख वाचला होता. त्या धाग्याचं स्वैर विडंबन म्हणुन आणि बायकोला मार्क्स कसे मिळवावेत ह्याचं मार्गदर्शन म्हणुन हा विडंबनप्रसवप्रपंच) तुम्ही आयुष्यात खुष राहु इच्छिता? हा घ्या एक विडंबन मंत्र. आपापल्या नवर्‍यांना खुश कसे ठेवाल? अगदी सोप्पं आहे. नवर्‍याला खुश ठेवणं हे बटाट्याची सुकी भाजी करण्यापेक्षा सोप्पं आहे. कसं?????? सांगतो. १. नवर्‍याला आवडणार्‍या गोष्टी करा.

राधा …....२

लेखक चुकलामाकला यांनी गुरुवार, 16/04/2015 08:07 या दिवशी प्रकाशित केले.
राधा …....१ पहाटवाऱ्यानं सोबत आणलेल्या बासरीच्या सुरांनी राधेला उठवलं . राधेची लगबग चालू झाली . राधा जणू सोळा वर्षाची अल्लड युवती बनली. कितीप्रकारे नटली तरी तिचं समाधान होईना. शेवटी एकदाचा साजशृंगार आटपला आणि ती झपाझप शिवमंदिराच्या दिशेने चालू लागली . सूर्य नुकताच आकाशात डोकावत होता . मंदिरात पोचली तेव्हा तिथं कुणीच नव्हतं . कृष्णाची वाट पाहत ती आवारात बसून राहिली. हळूहळू लोक येऊ लागले. क्वचित कुणाच्या तोंडून त्यांच्या राजाची स्तुती ऐकू येई . आणि इकडे राधेचा उर अभिमानाने भरून जाई .

राधा …....१

लेखक चुकलामाकला यांनी सोमवार, 13/04/2015 19:46 या दिवशी प्रकाशित केले.
आता फक्त आजचीच रात्र. तिनं स्वत:लाच समजावलं. पण मन तर बाभरं झालेलं. ऐकतय थोडंच. ते द्वारकेत पोचलं सुद्धा. काय करत असेल तो या वेळी ? इतक्या वर्षांनी आपण भेटणार म्हणून डोळ्यातून आनंद उतू जात असेल का? त्याचे भावुक डोळे मनातलं सगळं बोलून जात. म्हणून गोकुळात असताना तिची कधी काही खोडी करायची असेल तर तो तिच्या मागे उभा राहत असे, डोळे लपवून. कारण त्याचे डोळे तिच्यापासून काही लपवू शकत नसत. याउलट अनयचे डोळे, तिला त्याआडचं मन कधी समजतंच नसे. अनयच्या आठवणीने तिच्या काळजात कळ आली. बिचारा! अनय म्हटलं की "बिचारा" हा शब्द तिच्या तोंडी आपसूक येत असे.

सुगंधा - भाग ३ (अंतिम)

लेखक कविता१९७८ यांनी गुरुवार, 09/04/2015 15:30 या दिवशी प्रकाशित केले.
अमोघला आपल्या कानावर विश्वासच बसेना, "अपंग मुल दत्तक घ्यायची काय गरज आहे? आपल्याला मुल होणार नाहीये का? " रागातच तो तीच्यावर ओरडला, त्याने कधी या गोष्टीचा विचारच केला नव्हता. अपंग मुल तर सोडाच पण कधी नॉर्मल अनाथ मुल दत्तक घेण्याचा विचारही त्याच्या मनात आला नव्हता. "हे काय ऐकतोय मी? आपण दुसर्‍याचं मुल दत्तक घ्यायचं, त्या मुलाची काही माहीती नाही, कोण , कुठलं, कोण त्याचे आईवडील काही माहीत नसताना? आणि मुळात आपण ते मुल दत्तक घ्यायचंच का?" ती पार गोंधळुन गेली, "अमोघ माझं ऐकुन तर घ्या ..