Skip to main content

कला

दादा कोंडकेंची क्रेझ

लेखक दा विन्ची यांनी गुरुवार, 16/04/2015 15:37 या दिवशी प्रकाशित केले.
मी उच्च शिक्षणासाठी सध्या देवभूमी उत्तराखंड मध्ये आहे. समवयस्क स्थानिक लोकाशी बऱ्याच वेळा गप्पा टप्पा अर्थात हिंदीमध्ये होत असतात . राष्ट्रवादी आणि शिवसेनेची धोरणे इत्यादी विषय असतात . पण मला असे जाणवले कि शरद पवार , बाळासाहेब ठाकरे, राज ठाकरे, यांच्यापेक्षाही बहुतेकांना स्वर्गीय दादा कोंडके हे माहित आहेत आणि त्यांना त्यांच्या एकूण हजरजबाबी पणा तसेच त्यांचे दुहेरी अर्थाचे संवाद, त्यांची सेन्सार बोर्डाशी असलेली भांडणे ( पंगा) वगैरे चांगलीच माहिती आहेत.

एक -प्रेक्षणीय- पहेली लीला

लेखक चित्रगुप्त यांनी शुक्रवार, 10/04/2015 15:11 या दिवशी प्रकाशित केले.
. १९६६ साली वैजयन्तीमालाची प्रमुख भूमिका असलेला 'आम्रपाली' हा चित्रपट. शंकर जयकिशनचे संगीत, एम.आर.आचरेकरांचे कलादिग्दर्शन, भानू अथय्या यांनी केलेली वशभूषा, गोपीकृष्ण यांचे नृत्य दिग्दर्शन, वैजयंतीमालाचे सौंदर्य आणि या सर्वांतून साकारलेली एकाहून एक सरस नृत्य-गीते, यामुळे तो त्याकाळी चांगलाच गाजला होता. ...

Veer Garjana | वीरगर्जना @ Gudhi Padwa 2015

लेखक वेल्लाभट यांनी सोमवार, 23/03/2015 07:37 या दिवशी प्रकाशित केले.
वीरगर्जना ढोल ताशे आणि ध्वज पथक, ठाणे याचा एक सदस्य अशी ओळख सांगताना मला नेहमीच अभिमान वाटतो. जरी वैयक्तिक आणि कामाच्या जबाबदा-यांतून सरावाला वेळ मिळत नसला आणि त्यामुळे सध्या वादनात सहभाग घेता येत नसला, तरीही ती ओळख तशीच आहे असं मी मानतो. गुढीपाडव्याच्या आधी व्हॉट्सॅप्प वर फेसबुकवर नववर्ष स्वागत यात्रेतील वीरगर्जनेच्या वादनाचा संदेश फॉरवर्ड करताना मला खूप आनंद होत होता. आणि तो आनंद वीरगर्जना पथकाचं ढोल ताशे वादन ऐकताना कैक पटीने मोठा झाला. दिवसेंदिवस बहरत गेलेला हा तालाचा उत्सव ऐकताना कान, मन धुंद होतं.

कविता- मेसेज...

लेखक प्रितम तोरवने यांनी सोमवार, 16/03/2015 17:57 या दिवशी प्रकाशित केले.
मेसेज किती दिवस झाले तुझा काही मेसेज नाही, मला आहे माहीती तुझा मेसेजपेक अजून संपलेला नाही जरी तुझा मेसेजपेक संपलेला असायचा , तरी दुसऱ्याच्या मोबाईल वरून का असेना तुझा मेसेज यायचा , जेव्हा हि वाजते मेसेज ची ringtone , तुझाच मेसेज असावा म्हणून लगेचच चेच्क करतो मी माझा cellphone. काही चुकले का माझे कि नवीन मित्र झाले तुझे सांग ना काय आहे माझा गुन्हा , मी तर मित्र तुझा जुना ……. -कवि -प्रितम दादाजी तोरवणे

ओय! – क्षणभंगुरतेची दोन रुपे

लेखक अन्या दातार यांनी सोमवार, 09/03/2015 04:12 या दिवशी प्रकाशित केले.
मी पाहिलेल्या मोजक्या तेलुगु चित्रपटांपैकी हा एक चित्रपट – ओय! वरवर पाहता एक तरल प्रेमकथा. टॉलिवूडी हाणामारी, भडक विनोदाचे केविलवाणे प्रयत्न तुलनेने कमी. ही ठळक वैशिष्ट्ये चित्रपटाला इतर टिपिकल सौदिंडियन चित्रपटांपासून वेगळे बनवतात. poster कथेचा नायक उदय (सिद्धार्थ) हा अतिश्रीमंत घरातला, तर नायिका संध्या (शमिली) आई-वडिल गमावलेल्या मध्यमवर्गीय कुटुंबातील. दोघांच्या विचारसरणीत जमीन-अस्मानाचा फरक. ती अतिशय टापटिपीची, तर हा पसारा करणारा.

लावणी – एक मराठमोळी निशाणी (मराठी भाषेतील सौंदर्यस्थळे)

लेखक सस्नेह यांनी सोमवार, 02/03/2015 03:25 या दिवशी प्रकाशित केले.
‘टांग टांग टांग धडांग टांग टिक टिक..’ असा ढोलकी-हलगीचा आवाज कानावर पडला की सजग होऊन कान टवकारणार नाही तो मराठी माणूसच नव्हे ! तमाशा आणि खास करून लावणी ही खास ‘मऱ्हाटी’पणाची ओळख. मराठी भाषा लोकप्रिय आणि समृद्ध करण्यामध्ये मोलाचा वाटा आहे, तमाशा आणि त्यातही लावणी या नृत्य-प्रकाराचा. तमाशा ही गेल्या दोन शतकांपासून ग्रामीण मराठी माणसाची सर्वात लोकप्रिय लोक-कला आहे. सुरुवातीला मनोरंजनार्थ सुरु झालेल्या या कलेचा पाहता पाहता विकास होऊन ती सामान्य जन-मानसाच्या मुखात, बोलात सहज रुळून गेली.

मितवा... प्रेम या भावनेचा अर्थ नव्यानं कळेल .... सावर रे ए मना....

लेखक किरण८८७७ यांनी रविवार, 01/03/2015 15:03 या दिवशी प्रकाशित केले.
मितवा…मला खरेच कळेना की या चित्रपटाला कौतुक कशा-कशासाठी करावे. वेगळ्या धाटणीची प्रेमकथा, उच्चकोटीचा अभिनय, ओठांवर अलगद येउन बसणारे संगीत अन सर्वात महत्वाचे दिलखेच "संवाद" प्रेम माणसात किती बदल घडवते, किती सहजतेने अन अलगदपणे तुमचे जीवन बदलवते याचे भावूक चित्रीकरण. तर संवाद म्हणजे आपल्यालासमोरnसहजतेने उलगडलेले माणसी विचारसरणीचे विविध पैलूं. थोडी वेगळी प्रेमकहाणी. चित्रपट पाहता-पाहता पुढच्या कथेचा अंदाज येतो, पण असे असले तरीही मितवा कधीच निराश करत नाही. कारण सर्वांचा अप्रतिम अभिनय अन सहज निघणारे पण खूप मतीतार्थ असणारे अप्रतिम संवाद, अन ते हि इतके की काही विचारू नका.

भालचंद्र नेमाडे यांना ज्ञानपीठ पुरस्कार घोषित

लेखक पिंपातला उंदीर यांनी शुक्रवार, 06/02/2015 16:04 या दिवशी प्रकाशित केले.
आताच नेमाडे यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळाल्याची बातमी जाहीर झाली आहे . नेमाडे यांचा तिरस्कार करणार पब्लिक बख्खळ आहे . एके काळी आम्ही नेमाडे वाचतो हे सांगणे अभिमानाचे लक्षण होते . आता हिंदू एक समृद्ध अडगळ नंतर नेमाडे कसे outdated झाले आहेत हे अह्महिकेनॆ सांगण्याची स्पर्धा चालू आहे . कोसलाशिवाय नेमाडे मला अजून एका गोष्टीमुळे आवडतात . त्यांनी एका मुलाखतीत सांगितलं होत , " भारतीय समाज हा समजा एक चादर आहे असे आपण गृहीत धरूया . समजा हि चादर आपण झटकली तर यातून काय पडेल ?

हाँटींग : मी रात टाकली....

लेखक विशाल कुलकर्णी यांनी रविवार, 01/02/2015 23:24 या दिवशी प्रकाशित केले.
काही महिन्यांपूर्वीची गोष्ट.... नेहमीप्रमाणे हातातल्या रिमोटशी खेळत असताना झी मराठी चॅनेलवर क्षणभर थबकलो. प्रत्येक ब्रेकच्या आधी कार्य्क्रमाच्या ब्रेकनंतर येणार्‍या भागाची थोडीशी झलक दाखवायचे आजकाल फॅड आहे. तर मी झी मराठीपाशी थबकलो कारण सारेगमच्या सेलिब्रिटी पर्वाचे जुने भाग दाखवत होते. आणि गुप्त्यांच्या 'वंदनाताई' अमृता सुभाषला सांगत होत्या.... "तू गाणं छानच गायलंस. मुळातच हे गाणं अतिशय गोड आहे. खरेतर 'हाँटींग' आहे, त्यांनी अजुन एक दोन उदाहरणे दिली त्यात 'या डोळ्याची दोन पाखरे..." ही होतं.

क्लासमेट्स - दर्जा!!

लेखक श्रीरंग यांनी सोमवार, 26/01/2015 19:15 या दिवशी प्रकाशित केले.
कॉलेजच्या म्युझिक डिपार्टमेंटच्या उद्घाटनासाठी जवळपास वीसेक वर्षांनी एकत्र भेटलेले क्लासमेट्स.. बर्याच वर्षांनी एकमेकांना भेटण्याची उत्सुकता, नोस्टॅल्जीया, जुने चेहरे इतकया वर्षांनी दिसल्यावर उसळून आलेल्या आठवणी, ज्याच्या नावने हे म्युझिक डिपार्टमेंट चालू होतंय, त्या कायमच्या दुरावलेल्या मित्राच्या आठवणीनी हळवी झालेली मनं.. अशातच आगमन होतं सत्याचं. सत्या.. कॉलेजचा एक काळ गाजवलेला, रुबाबदार व्यक्तिमत्वाचा सत्या. ज्याच्या स्टाईल आरशासमोर उभे राहून मुलं कॉपी करायचा प्रयत्न करायची, तो कॉलेजचा हीरो सत्या. ज्याच्या आवाजात एका हाकेत कॉलेज बंद पाडण्याची ताकद होती, असा सत्या.