ओय! – क्षणभंगुरतेची दोन रुपे
मी पाहिलेल्या मोजक्या तेलुगु चित्रपटांपैकी हा एक चित्रपट – ओय!
वरवर पाहता एक तरल प्रेमकथा. टॉलिवूडी हाणामारी, भडक विनोदाचे केविलवाणे प्रयत्न तुलनेने कमी. ही ठळक वैशिष्ट्ये चित्रपटाला इतर टिपिकल सौदिंडियन चित्रपटांपासून वेगळे बनवतात.
कथेचा नायक उदय (सिद्धार्थ) हा अतिश्रीमंत घरातला, तर नायिका संध्या (शमिली) आई-वडिल गमावलेल्या मध्यमवर्गीय कुटुंबातील. दोघांच्या विचारसरणीत जमीन-अस्मानाचा फरक. ती अतिशय टापटिपीची, तर हा पसारा करणारा. ती पै न पै वाचवणारी, तर हा उधळ्या. ती अतिशय देवभोळी, हा देवावर फारसा विश्वास नसणारा. याची रात्र पब नि डिस्कशिवाय जाणार नाही, तर तिला पब-डिस्कबद्दल काडीचेही आकर्षण नाही. तिच्या लेखी आयुष्य खूप आहे, चिरंतनतेवर तिचा विश्वास आहे. त्याच्या लेखी आयुष्य छोटे आहे आणि सर्वच अशाश्वत आहे.
या दोन ध्रुव असलेल्या जीवांची भेट घडते ती ३१ डिसेंबरच्या पार्टीत, एका पबमध्ये! पबसारख्या ठिकाणी शांतपणे दुस-या दिवशीची कामे डायरीत टिपून घेणा-या मुलगी बघून याला फार कुतुहल वाटते. फ़्लर्ट करण्याचा एक अयशस्वी प्रयत्नही तो करतो, पण कुतुहल काही शमत नाही. अखेर आपल्या मित्राच्या सहाय्याने तो तिचे घर शोधून काढतो.
आपल्या वडिलांच्या मृत्युपश्चात उदय कंपनीची सूत्रे आपल्या हातात घेतो. उदयचे कुतुहल आता प्रेमात बदलत जात असते. तिच्यासाठी म्हणून तो हैदराबादच्या ऐवजी विझागला येतो आणि अनेक खटपटी करुन तिच्या घरी भाडेकरु म्हणून राहतो.
तिच्या जोडीदाराकडून असलेल्या अपेक्षांमध्ये उदय कुठेच बसत नाही हे जाणून असतो, पण तरीही तो तिला इंप्रेस करायचे प्रयत्न चालूच ठेवतो. तिच्या वाढदिवसाच्या रात्री तिला शुभेच्छा देऊन आश्चर्याचकित करतो. १२ महिन्यांचे प्रतिक म्हणून १२ भेटवस्तू देतो. ११ भेटवस्तू या अत्यंत क्षणभर टिकणा-या, पण तरीही आनंददायक आहेत. तिची शाश्वततेची आवड लक्षात घेऊन शाश्वत भेट म्हणून स्वत:च्या प्रेमाची कबुली देतो.
तिचा होकार तिच्याकडून थेट न कळता इन्शुरन्स पॉलिसीचा वारस असल्याच्या पत्राने कळतो. पण हा आनंद फ़ार काळ टिकत नाही. मेडिकल चेक अपमध्ये तिला कॅंसर असल्याचे कळते. क्षणिक गोष्टींची त्याची आवड उदयसमोर एक भयाण रुप घेऊन येते. ही गोष्ट अर्थातच उदय तिला सांगत नाही.
आयुष्यात एकदातरी करायच्या गोष्टी गप्पांमधून उदय तिच्याकडून वदवून घेतो आणि त्या सर्व इच्छा पूर्ण करतो. पण अखेर तिचे शेवटचे क्षण जवळ येतातच. तिच्या आजवरच्या सर्व कल्पनांना, विचारांना धक्का बसतोच. आपण समजत होतो तितकेही आयुष्य मोठे नव्हते हे भयाण सत्य अखेर समोर येतेच.उदयच्या वाढदिवसाला आपल्याजवळच्या जपून ठेवलेल्या आठवणी व इतर काही गोष्टी भेट देते. क्षणिक टिकणारी भेट म्हणून तिचे प्रेम कबूल करते.
दोन अतिशय भिन्न विचारसरणी असणा-या व्यक्ति अपघाताने जवळ येतात, पण नियती दोघांना त्यांच्या विचारांचे भयाण रुप दाखवते याशिवाय वेगळा दैवदुर्विलास तो काय असावा?
वेगळ्या वाटेवरची कथा म्हणून चित्रपट मला भावलाच. त्याहीपेक्षा, दिग्दर्शकाचा संयतपणा जास्त आवडला. दोघांच्या आवडी-निवडी, आचार-विचार यातला फ़रक दाखवण्यासाठी घेतलेली पहिली काही मिनिटे अगदी बोलकी आहेत. सहाय्यक कलाकारांचा उत्तम अभिनय. ’ए’ सर्टिफ़िकेटसाठी आवश्यक तो मसाला वापरण्याच्या अनेक संधी असूनही तो दिग्दर्शकाने कटाक्षाने टाळला आहे. यासाठी आनंद रंगा यांना १० पैकी १० गुण. श्रवणीय गाणी व उत्तम लोकेशन्स यामुळे चित्रपट अतिशय उठावदार झाला आहे.

वर्गीकरण
अरे वाह
कॉलेजीयन्सना आवडेल असा
हम्म्म ! बगाया पायजेन. पण
In reply to हम्म्म ! बगाया पायजेन. पण by अत्रुप्त आत्मा
सबटायटल्स घ्या की डौन्लोडवून.
हम्म.....हिरवीन मरते म्हंजे
In reply to हम्म.....हिरवीन मरते म्हंजे by रेवती
सिद्धार्थ
In reply to सिद्धार्थ by श्रीरंग_जोशी
धन्यवाद पंत!
In reply to हम्म.....हिरवीन मरते म्हंजे by रेवती
असं काय म्हंते गं त्या
सिद्धार्थ - रंग दे बसंती
आटोपशीर
http://en.m.wikipedia.org
In reply to http://en.m.wikipedia.org by जेम्स बॉन्ड ००७
मलाही वॉक टू रिमेंबर आठवला..
@श्रीरंग्_जोशी - कोंचम इष्टम
कोंच्म तर लयच भारी!! शिवाय
बघायला पाह्यजे!!
एका सुंदर सिनेमाची मस्त ओळख....
सुन्दर
स्ट्रायकर
चित्रपट परी़क्षण आवडले.तू
In reply to चित्रपट परी़क्षण आवडले.तू by यशोधरा
आहे तूनळीवर. चित्रपट चांगला
In reply to आहे तूनळीवर. चित्रपट चांगला by रेवती
:-)
In reply to :-) by श्रीरंग_जोशी
शिनेमा बघण्याचा पेशन्स
In reply to शिनेमा बघण्याचा पेशन्स by रेवती
माझे याच्या उलट आहे
In reply to माझे याच्या उलट आहे by श्रीरंग_जोशी
ही ही ही.
In reply to माझे याच्या उलट आहे by श्रीरंग_जोशी
हाहा ! मला आशा नसते पण अजून
छान परिचय ! आणि लिंक
लेख आवडला.
मस्त लेख
मला वाटायचं असले पिक्चर
In reply to मला वाटायचं असले पिक्चर by आनन्दिता
घ्या आता हे सगळं बघणं आलं !
In reply to मला वाटायचं असले पिक्चर by आनन्दिता
बोमारिल्लु पाहिलाय मी, मस्तच
In reply to मला वाटायचं असले पिक्चर by आनन्दिता
क्या बात!!
परिक्षण आवडलं रे अन्या.
गौतम मेनन
In reply to गौतम मेनन by सिरुसेरि
RHTDM चालला नाही? :O...
RHTDM / मिन्नाले