एक -प्रेक्षणीय- पहेली लीला
१९६६ साली वैजयन्तीमालाची प्रमुख भूमिका असलेला 'आम्रपाली' हा चित्रपट. शंकर जयकिशनचे संगीत, एम.आर.आचरेकरांचे कलादिग्दर्शन, भानू अथय्या यांनी केलेली वशभूषा, गोपीकृष्ण यांचे नृत्य दिग्दर्शन, वैजयंतीमालाचे सौंदर्य आणि या सर्वांतून साकारलेली एकाहून एक सरस नृत्य-गीते, यामुळे तो त्याकाळी चांगलाच गाजला होता.
... अर्थात त्यावेळी मी पंधरा वर्षांचा असल्याने तेंव्हा हा चित्रपट बघता आला नव्हता, मात्र इंदूरच्या 'रीगल' टॉकीज वर वैजयंतीमालाचे एक अतिभव्य, सुंदर कट-आऊट लागले होते, ते बघत भान हरपून उभे रहाणार्यात मी पण असायचो.
........ हे सर्व आज आठवण्याचे कारण म्हणजे आजच प्रदर्शित झालेला, सनी लिओनीची प्रमुख भूमिका असलेला 'एक पहेली लीला' हा चित्रपट. जणू ६६ साली राहून गेलेली इच्छा इतक्या वर्षांनी पूर्ण करण्यासाठी, जन्मात प्रथमच मी या पिच्चरचा 'फर्स्ट डे फर्स्ट शो' बघून आलो.
या चित्रपटाचे कथानक लंडन मधील एका नृत्यापासून सुरू होते, ते पुढे राजस्थान मधील अप्रतिम स्थळे, तेथिल ठाकुर मंडळींच्या अलिशान हवेल्या, वेगवेगळी नृत्य-गीते, रोमांचक प्रणय प्रसंग, हळूहळू आकार घेणारे रहस्य, नाडी-ग्रंथ वगैरेतून भविष्यवाणी वगैरे वळणावळणाने पुढे वाढत जाते, आणि अगदी शेवटी अनपेक्षित वळण घेऊन संपते.
सुंदर छायाचित्रण, बर्यापैकी संगीत - नृत्ये, उत्कंठावधक कथानक, यथायोग्य पात्र-निवड आणि दिग्दर्शन, उतमोत्तम वस्त्राभूषणात नटलेली नायिका या सर्वामुळे चित्रपट अजिबात कंटाळवाणा वाटत नाही. सनीताईंकडून उत्तम अभिनयाची कुणीच अपेक्षा करणार नाही, मात्र तिने सुंदर रंगबेरंगी भारतीय वेशभूषेत आपल्या कमनीय रूपवैभवाची जी उधळण केली आहे, त्याबद्दल तिला सलाम.
.
एकदा तरी सिनेमागृहात जाऊन बघाण्यालायक असलेल्या या चित्रपटात आणखी एक गंमत आहे. आपण किती सरधोपटपणे विचार करत असतो, आणि समोर उलगडत जाणार्या घटना-क्रमातून जो तार्किक निष्कर्ष आपण काढत असतो, त्याचा व्यत्यास सुद्धा तितकाच खरा असू शकतो, हे चित्रपट संपता-संपता जाणवते, आणि आपण स्वतःशीच काहीसे खजील होत बाहेत पडतो.
वाचने
12224
वाचनखूण
प्रतिक्रिया
22
सनीताईंकडून उत्तम अभिनयाची
In reply to सनीताईंकडून उत्तम अभिनयाची by हाडक्या
सनीताई???
यथायोग्य पात्र-निवड
हम्म्म्म्म...!
In reply to हम्म्म्म्म...! by अत्रुप्त आत्मा
हॅल्लो ... आलो मी !!
In reply to हॅल्लो ... आलो मी !! by प्रसाद गोडबोले
सनीचे निरागसत्व.
In reply to हॅल्लो ... आलो मी !! by प्रसाद गोडबोले
तन्वी श्यामा शिखरिदशना पक्
In reply to तन्वी श्यामा शिखरिदशना पक् by उगा काहितरीच
हे उगा काहितरीच बघा तुमचं!
आपल्या कमनीय रूपवैभवाची जी
खरेतर सनीलिओनी असल्याने आणि
In reply to खरेतर सनीलिओनी असल्याने आणि by गणेशा
दगडू
तपशीलवार....
In reply to तपशीलवार.... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
हि रंगीबेरंगी वेशभूषा भारतात
In reply to हि रंगीबेरंगी वेशभूषा भारतात by कहर
कोणत्या ठिकाणी
आमचा सलाम
वैताग आला काकूंना बघून!!
In reply to वैताग आला काकूंना बघून!! by सूड
पदरचे पैसे>>>
In reply to पदरचे पैसे>>> by जेपी
बरं सदरचे पैसे!!
In reply to बरं सदरचे पैसे!! by सूड
परत एकदा ख्याक..
सलामे फनकार!
आज तात्या (मिपावर) हवे होते ;
In reply to आज तात्या (मिपावर) हवे होते ; by एस
आज तात्या (मिपावर) हवे होते ;