मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

जीवनमान

हिरकमहोत्सवाची सांगता..

आजी ·
आमच्या शाळेचा हिरकमहोत्सव होता. मला निमंत्रण आलं होतं ते बघून मला खूप आनंद झाला. कुणाकडून तरी माझा व्हाॅटस्ॲप नंबर मिळवून शाळेच्या निमंत्रण विभागाच्या कोऑर्डिनेटरांनी मला हिरकमहोत्सव सोहळ्याला बोलावलं होतं. माझी शाळेची वर्षं म्हणजे पाचवी ते अकरावी इयत्तेपर्यंतची वर्षं. एकूण सात वर्षं मी त्याच शाळेत शिकत होते. शाळेची आठवण मला मी इतकी मोठी झाले तरी अधुनमधून यायची. पण हे निमंत्रण पाहून ती तीव्रतेनं आली. माझी शाळेतली वर्षं फार चांगली गेली होती. सगळे शिक्षक चांगले होते. मला त्या शाळेत कधीही, कुठलीही शिक्षा झाली नाही. माझ्या शाळेबद्दलच्या आठवणी मधुर होत्या. शाळेत एक पाण्याची टाकी होती.

कल्पकता

युयुत्सु ·
असंख्य भारतीय पापक्षालनासाठी गंगेत डुबक्या मारत असताना डीपसिक या नवजात चिनी कंपनीने अमेरीकेच्या तंत्रवर्चस्वाला हादरवणारे "अल्प मोली बहुदुधी" असे नवीन आर१ हे मॉडेल बाजारात आणले आणि अनेक मातब्बर कंपन्यांचे शेअर्स गडगडायला सुरुवात झाली. डीपसिकच्या या उपलब्धीने अनेक जागतिक समीकरणे आता बदलतील. मागील वर्षी २९ मे रोजी मी "कल्पकता" या विषयावर एक टिपण लिहीले होते. त्याची सर्व संबंधीताना आठवण राहावी म्हणून परत प्रसृत करत आहे... ============= कल्पकता ====== माझ्या एका मंदबुद्धी संघोट्या माजी मित्राने माझ्याशी एकदा कचाकचा भांडण केलं, मला अद्वातद्वा अपमानकरक बोलला (आणि मग मी त्याला हाकलून दिलं).

कोष

प्रकाश घाटपांडे ·
दर्द में डूबे हुए नग़मे हज़ारों हैं मगर साज़-ए-दिल टूट गया हो तो सुनाए कैसे | अनेक शायरांची प्रतिभा अशा डिप्रेशस मूड मधूनच फुलली.गम / उदासी ची पण एक नशा असते त्यांना.हा एक प्रकारचा डिफेन्स मेकॅनिझम असतो. सब्लिमेशन म्हणतात त्याला. प्रत्येकाच्या आयुष्यात अशा काही फेजेस या ना त्या प्रकारे कुठल्याना कुठल्या टप्प्यात येतात. पुर्वी नात्यांच्या ईकोसिस्टीममुळे नैराश्यावर प्राथमिक अवस्थेतच उपचार होउन जात. आता नात्यांची वीण बदलली आहे. आता ही नात्यांची इको सिस्टीम मानसिक आरोग्य क्षेत्रातील सेवा सेक्टर मधे गेली आहे. अर्थात आताच्य सेवा या सेवा नसून तो व्यवसाय असतो.

तर्पण फाउंडेशनचा सोहळा: अनाथांच्या नाथा तुज नमो

मार्गी ·
✪ समाजातल्या अवघड प्रश्नांना सोडवण्याचा ध्यास ✪ पंखास या बळ दे नवे, झेपावया आकाश दे ✪ कर्तृत्वाचा व दातृत्वाचा "सेतू" ✪ अनाथ असण्यापासून सनाथ होण्याचा प्रवास- गायत्री पाठक ✪ गुंतागुंतीच्या प्रश्नांवर मिळूनी करू मात ✪ "तुम्ही जे कराल, तेच तुमच्याकडे फिरून येईल" ✪ अनाथ मुलींना मिळणार हक्काचं माहेर ✪ कौन कहता है कि आसमां में छेद नहीं हो सकता सर्वांना नमस्कार. काल १३ जानेवारीला तर्पण फाउंडेशन, मुंबई ह्यांचा युवा गौरव पुरस्कार कार्यक्रम होता. मुंबईत एस.एन.डी.टी. विद्यापीठात झालेल्या ह्या कार्यक्रमामध्ये समाजात खूप वेगळं काम करणार्‍या युवांना गौरवण्यात आलं.

सहज सुचलं म्हणून

कंजूस ·
सहज सुचलं म्हणून ( राजकारणसोडून छोट्या चर्चांसाठी) इतिहास, पुस्तकं, पाककला आणि इतर विषयांची चर्चा खरडफळ्यावर होते आणि मोठमोठे माहितीपर प्रतिसाद खरडफळा साफ झाल्यावर गायब होतात. तर तसे होऊ नये म्हणून हा धागा सुरू करत आहे. * आमच्या इथे एक पेपर आणि मासिके वाचनाचा एक मिनी ज्येष्ठ नागरिक कट्टा ( म्हणजे दोन बाकडी , कडाप्पा फरशी टाकून) सुरू झाला होता. परवा तिकडे एक पाटी वाचली आणि पुण्यात असल्यासारखं वाटलं. 'ज्येष्ठ नागरिक कट्टा' पाटीखाली 'राजकारण चर्चेसाठी नाही' असं लिहिलं होतं. हसू आलं. तर हा आपला धागाही राजकारण चर्चेसाठी नकोच असं ठरवलं. बघू असा चालतो.

जीवाभावाचा "सोबती": सोबती सेवा फाउंडेशन

मार्गी ·
✪ रोगाकडून आरोग्याकडे नेणारी वाट ✪ अवघड जागची दुखणी आणि संवादाची सोबत ✪ "मला मरण हवंय!" ✪ देखभाल करणार्‍यांसमोरच्या अडचणी ✪ मोबाईल व्यसनमुक्ती ✪ आनंद घेण्याचा अधिकार आणि अपराधभाव ✪ योग्य वेळी थांबण्याची कला नमस्कार. आज ५ डिसेंबर रोजी एक वेगळा शुभारंभ अनुभवता आला. माझी काकू सौ. वर्षा वेलणकर व माझा काका श्री. चंद्रशेखर वेलणकर ह्यांनी सुरू केलेली ही नवीन संस्था! खरं तर काका त्याच्या व्यवसायातून नुकताच "रिटायर" झाला आहे! पण तो आणि काकू ही नवीन इनिंग सुरू करत आहेत. हिन्दीमध्ये निवृत्त होणे ह्यासाठी "अवकाश प्राप्त" त्यामुळेच म्हणत असावेत!

मराठवाड्यातील एक लग्न आणि इतर निरीक्षणे

वामन देशमुख ·
मराठवाड्यातील एक लग्न आणि इतर निरीक्षणे परभणी जिल्ह्यातल्या एका लहानशा गावी, माझ्या आजोळच्या एका लग्नाला यायचं होतं. काल रात्री सिकंदराबादहून १७६६३ या रेल्वेने बसलो. आज सकाळी परभणीला आलो. तिथून आधी १७६६८ या गाडीने, नंतर एका जीपने लग्नाच्या गावी आलो. फ्रेश होऊन नाश्ता झाल्यानंतर दाढी ट्रिम् करायला बाहेर पडलो. या गावात दोन सलुन आहेत. आधी एका ठिकाणी गेलो तर तिथे दोनजण आधीच बसून होते. दुसरा दुकानात तीनजण बसून होते. परत पहिल्या दुकानात आलो. वाट पाहण्याशिवाय गत्यंतर नव्हते.

इकडचं-तिकडचं

युयुत्सु ·
इकडचं-तिकडचं भारतात गोरक्षण हा सध्या कळीचा आणि संवेदनशील मुद्दा आहे. या पार्श्वभूमीवर आत्ताच माझ्या आवडत्या DW-TV वर एक बातमी येऊन थडकली आहे.

दहीभात...

किल्लेदार ·
पुण्यात कुणाकडे कधीतरी दही-बुत्ती हा दहीभाताचा प्रकार ताटात पडला. दही-बुत्ती हे मूळचे दाक्षिणात्य अपत्य असले तरी पुण्यातल्या घरी वास्तव्यास आल्यामुळे साहजिकच "गोssड" झाले होते. पण “यजमान-दाक्षिण्य” दाखवून मी तो भात गोड (न) मानून कसातरी गिळला. एरवी पित्तशामक असणारा दहीभात, पित्त खवळायलाही कारणीभूत ठरू शकतो हे तो साखर परलेला दहीभात खाऊन त्या दिवशी नव्याने उमगले. हिंदुस्तानात भाषावार प्रांतरचना स्वातंत्र्यप्राप्तिनंतर झाली असली तरी "भाता-वार” प्रांतरचना जिथल्या तिथल्या खाद्यसंस्कृतीनुसार फार पूर्वीच झालेली आहे.