मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

हे ठिकाण

पैशाचा पाऊस

बिपीन सुरेश सांगळे ·
लेखनविषय:
---------------------------------------------------------------------------------------------------------- पैशाचा पाऊस -------------------------------------------------------------------------------------------------------------- विऱ्याने समोर नाचणाऱ्या पोरींवर नोटा उधळल्या . जणू पैशाचा पाऊसच ! पोरी जाम खुश. त्यांना माहिती होतं गिऱ्हाईक येडं झालंय म्हणून . रात्रीची वेळ होती. पनवेलच्या त्या डान्सबारमध्ये रात्र रंगात आली होती. त्याचबरोबर जवानी आणि नशासुद्धा ! बार बराच मोठा होता. मध्ये डान्सफ्लोअर होता. चारी बाजूंनी गिऱ्हाईकं बसली होती. तर्राट झालेली.

गोलकीपर (बालकथा - मोठा गट )

बिपीन सुरेश सांगळे ·
लेखनविषय:
गोलकीपर --------------------------------------------------------------------------------------------- “ यश , तुझ्या सरांचा फोन आहे,” बाबा म्हणाले. आणि यश दचकलाच. हो ना. सरांचा फोन म्हणजे आश्चर्य, भीति, गंमत सारंच. तेही रात्रीच्या वेळी . पाय चोळत यश बेडवर बसला होता . टीव्हीवर फुटबॉलची एक मॅच पहात. तो उठून बाबांकडे गेला. “ अहो सर - पण सर, “ बाबा व्याकुळतेने बोलत होते. यशला काही कळत नव्हतं. “ एक मिनीट, “ बाबा सरांना म्हणाले आणि त्यांनी यशला विचारलं, “ सर विचारताहेत, फायनल खेळू शकशील का ?

मानवाश्रम

बिपीन सुरेश सांगळे ·
लेखनविषय:
मानवाश्रम 1. टीव्हीवर ब्रेकिंग न्युज होती - रमोला गेल्याची ! ती बॉलिवूडची खूप टॉपची हिरॉईन होती . तिनं आत्महत्या केली की तिला मारण्यात आलं , याच्यावर उलटसुलट चर्चा सुरु होती . संशयाची सुई तिचा एक्स बॉयफ्रेंड मोहितकुमारकडे वळली होती . कारण काही दिवसांपूर्वी त्याने तिच्याशी ब्रेकअप केलं होतं. मीडिया ट्रायल सुरु झाल्या होत्या. त्याच्यावर राजकारण सुरु झालं होतं. केस बरेच दिवस चालणार होती . 2. केसचा तपास इन्स्पेक्टर पाटीलकडे सोपवण्यात आला होता . पाटील एक भ्रष्ट अधिकारी होता . पण त्याला त्याच्या मुलाने आयुष्यात शिकून मोठं व्हावं असं वाटत असे .

मी मराठी - अलक

बिपीन सुरेश सांगळे ·
लेखनविषय:
सनीचे बाबा मोठ्याने वर्तमानपत्रातली बातमी वाचत होते , " मराठी ही अभिजात भाषा व्हावी यासाठी सामान्य नागरिकांनी पुढे यायला पाहिजे ! " सनीला एकदम आठवण झाली . त्याने भगव्या रंगात ' मी मराठी ' असं लिहिलेला एक गडद निळ्या रंगाचा टीशर्ट आणला होता . त्याने त्याच्या कपडे कोंबलेल्या कपाटात तो शोधला ; पण सापडला नाही . मग त्याने आईला विचारलं , " मम्मी , माझा तो टीशर्ट कुठंय ग - मी मराठी लिहिलेला ? "

मिजास - अलक

बिपीन सुरेश सांगळे ·
लेखनविषय:
मिजास - अलक ------------- परश्या डोकं धरून , झाडू बाजूला ठेवून कचऱ्याच्या घाण वास मारणाऱ्या ढिगाजवळ बसला होता . कचऱ्याचे ढीग उपसून उपसून त्याला त्याचं स्वतःचं आयुष्यच कचरा झाल्यासारखं वाटत होतं . रस्त्याने जाणाऱ्या , चांगले कपडे घालून मिरवणाऱ्या जनतेकडे पाहून , आपण असे फिरू शकत नाही याचं त्याला नैराश्य आलं होतं . कचरेवाल्या राधाबाईने जवळ येऊन त्या तरुण पोराच्या पाठीवरून मायेने हात फिरवला व ती म्हणाली , " चांगली कापडं घालनाऱ्या मान्सांपेक्षा आपण भारी हावोत . आपण हावोत म्हून तर त्यांची मिजास चालतीया ! "

जाणीव - अलक

बिपीन सुरेश सांगळे ·
लेखनविषय:
जाणीव - अलक ---------------------------- खच्यॅक - टपोरीने त्वेषाने भाल्याच्या पोटात चाकू खुपसला आणि रक्ताच्या चिळकांड्या उडाल्या . भाल्याच्या शरीरात वेदनेचा एकच आगडोंब उसळला . त्याला प्रकर्षाने जाणवलं , ' शरीरात चाकू खुपसल्यावर फारच नकोशी , जीवघेणी कळ येते . टपोरीच्या भावाच्या पोटात आपण चाकू खुपसला होता तेव्हा त्यालाही असंच झालं असेल ! ... ' याची जाणीव त्याला झाली तेव्हा फार उशीर झाला होता .

वाटेकरी

बिपीन सुरेश सांगळे ·
लेखनविषय:
वाटेकरी ------------------------------------------------------------------------------------------------ रात्रीची वेळ . अंधार . एक मोठा रस्ता .त्या रस्त्याला रात्रीच्या वेळी कोणी नसायचंच. त्यात पाऊस. शहराचा तो भाग रिकामा होता . तिथे ना दुकानं होती ना घरं . कारण तो कॅंटोन्मेंट हद्दीचा भाग होता . दिवसा मन प्रसन्न करणारी तिथली झाडं आत्ता मात्र भुतांची आश्रयस्थानं वाटत होती . मधूनच एखादी सर्र्कन पाणी उडवत जाणारी गाडी . त्या गाड्यांनाही कसली घाई ! एखादा मरून पडला तरी कोण बघतंय आणि कोण थांबतंय . वरून धोधो पाऊस अन खाली रस्त्यांचे झालेले नाले .

वृक्षासिनी

लेखनवाला ·
एमपीएसीच्या क्लासच्या बाहेरच्या आवारात तरुण मुला-मुलीचा घोळका नेहमीसारखाच. दुपारचे तीन वाजायला दहा मिनिटं होती, सतिश आणि बाकी जण तिथं कधीचेच येऊन तिथल्या घोळक्यात सामील होत वेगवेगळ्या विषयावर गप्पा मारत होते, बरोबर तीनच्या ठोक्याला चालू बॅच संपून यांना आत प्रवेश मिळणार होता, त्याला आता या येणा-या खेपेला काही करुन एमपीएसी पास होत सरकारी नोकरी पक्की करायची होती, अगोदरचे दोन प्रयत्न काहीश्या गुणांमुळे हुकले होते, त्यामुळे यावेळी निर्धार पक्का होता.

न विरघळणारी खडीसाखर

बिपीन सुरेश सांगळे ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
न विरघळणारी खडीसाखर ---------------------------------------------------------------------------- --------------------------------------------- संध्याकाळचे पाच वाजले होते ; पण सात वाजल्यासारखे वाटत होते. एवढं आकाश काळवंडलेलं. आणि जोडीला पावसाची उदास संततधार . भिजून भिजून आवारातली अशोकाची झाडंही मलूल पडलेली . पावसाच्या धारा उगा नाईलाजाने पहात. इतर वेळ असती तर वेगळी गोष्ट होती . निशीगंधानं खिडकीत बसून पाऊस एन्जॉय केला असता. कॉफीचा मोठा मग हातात धरून. काठोकाठ भरून. एकेक घोट चवीचवीने घेत. पावसाच्या धारा जशा अवकाश चिरत जातात तशा काळीज चिरत जाणाऱ्या गझल ऐकत … आताही ती खिडकीत होती.