मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

मी मराठी - अलक

बिपीन सुरेश सांगळे · · जनातलं, मनातलं
सनीचे बाबा मोठ्याने वर्तमानपत्रातली बातमी वाचत होते , " मराठी ही अभिजात भाषा व्हावी यासाठी सामान्य नागरिकांनी पुढे यायला पाहिजे ! " सनीला एकदम आठवण झाली . त्याने भगव्या रंगात ' मी मराठी ' असं लिहिलेला एक गडद निळ्या रंगाचा टीशर्ट आणला होता . त्याने त्याच्या कपडे कोंबलेल्या कपाटात तो शोधला ; पण सापडला नाही . मग त्याने आईला विचारलं , " मम्मी , माझा तो टीशर्ट कुठंय ग - मी मराठी लिहिलेला ? "

वाचने 5867 वाचनखूण प्रतिक्रिया 15

मुक्त विहारि 27/02/2021 - 10:50
शिवसेनेचे बेगडी मराठी प्रेम, चांगले व्यक्त केले आहे
सर्व मराठी लोकांची जबाबदारी आहे मराठी भाषा वाढवणे,तिचा रोजच्या व्यवहारात उपयोग करणे. फक्त सेनेवर आरोप केल्या मुले आपली जबाबदारी संपत नाही ती पळवाट झाली. मी मुंबई मध्ये सर्व ठिकाणी मराठी च वापरतो आणि आज पर्यंत तरी कोणतीच अडचण आली नाही.

चौथा कोनाडा 05/03/2021 - 18:05
अलक आवडली. जय मराठी, जय महाराष्ट्र !