मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

जाणीव - अलक

बिपीन सुरेश सांगळे · · जनातलं, मनातलं
जाणीव - अलक ---------------------------- खच्यॅक - टपोरीने त्वेषाने भाल्याच्या पोटात चाकू खुपसला आणि रक्ताच्या चिळकांड्या उडाल्या . भाल्याच्या शरीरात वेदनेचा एकच आगडोंब उसळला . त्याला प्रकर्षाने जाणवलं , ' शरीरात चाकू खुपसल्यावर फारच नकोशी , जीवघेणी कळ येते . टपोरीच्या भावाच्या पोटात आपण चाकू खुपसला होता तेव्हा त्यालाही असंच झालं असेल ! ... ' याची जाणीव त्याला झाली तेव्हा फार उशीर झाला होता .

वाचने 1123 वाचनखूण प्रतिक्रिया 0