मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

गझल

भारी पडली जात

गंगाधर मुटे ·
लेखनविषय:
भारी पडली जात पोळून गेले तरी कधीच मी, आखडले ना हात तुझे जिंकणे असे भावले, की खात राहिलो मात बोलत होती ती अशी की, मी गुंतून गेलो पार जरा न कळले केव्हा कशी ती, उलटून गेली रात वाटेवरती काटे बोचरे, पसरून होते दाट आता पोचलो कसाबसा मी, कित्येक खस्ता खात एकच गुन्हा समान झाला, परी सजा वेगळी त्यात आतंकवादी मजेत बाहेर, साध्वी सडते आत सूर बोबडे ऐकून माझे, मुरडून घेती नाक नसेल जर का आवड माझी, मी बसू कशाला गात? नारळ फुटला, प्रसाद वाटू, बोलून गेलेत काल वाट पाहतोय इथे अजूनी, घासून बसलो दात निकाल आला, करुनी माझ्या, परिश्रमास मातीमोल कर्तृत्वाचा बोर्‍या वाजला, नि भारी पडली जात भिती मन

सांजवेळी सोबतीला..

मयुरेश साने ·
लेखनविषय:
काव्यरस
सांजवेळी सोबतीला - एकदा येऊन जा ओठ जे गातात गाणे - ओठी तू घेऊन जा ज्या - मुळे फुलती कळ्या - अन् पाकळ्या होती खुळ्या वसंत तो "मी" प्रितीचा - तू भेटुनी बहरून जा न भेटण्याची कारणे आता मला देऊ नको भेटण्याच्या कारणांची - कारणे ऐकून जा याच - साठी टाळतो मी - पौर्णीमेचा चंद्र ही कोजागिरी असते कशी ?- तू एकदा दाऊन जा शब्द ही सोडून जाती - लागता चाहुल तुझी मी जे मुक्याने बोलतो - तू एकदा समजून जा श्वास ही बघ एक होती - "मी "- न् - "मी"!

नवे साल गाणे जुने गात आहे...

मयुरेश साने ·
लेखनविषय:
काव्यरस
नवे साल गाणे जुने गात आहे.... जुना मी तरीही नवी बात आहे जुन्या चंद्रम्याची नवी रात आहे तुझा चंद्र नाही तुझ्या बाहुपाशी सदा राबता मी हापीसात आहे काळोख आहे आता ही उद्या ही जुन्या कंदीलाची नवी वात आहे किती काळ दु:खात ऐसे रडावे नवे हासणे अन् जुनी कात आहे अशी गोड वचने देउ नको ना नवे राहू दे ! गं- जुने खात आहे संकल्प लिहिले जुने - ते नव्याने बोलाची कढी बोलाचाच भात आहे अरे ट्रेन नाही रवीवार आहे कडी पकडण्याला पुढे हात आहे जगावे कशाला कुणाला कळेना हप्ता विम्याचा तरी जात आहे मयुरेशला सांगुनीही कळेना नवे साल गाणे जुने गात आहे. मयुरेश साने...०१-जानेवारी-११

अबोला गाजला होता.....

मयुरेश साने ·
लेखनविषय:
तुला पाहून माझा शब्द - तेव्हा लाजला होता मुका राहुनही मझा - अबोला गाजला होता तुझा तो स्पर्श चंदेरी - तुझा तो हात पुनवेचा उन्हाचा हात ही माझा - अचानक भाजला होता जरी बेताल मी आहे - नव्हे हा कैफ मदिरेचा तिने सौंदर्य वर्खाचाच - प्याला पाजला होता तुझा मुखचंद्रमा पाहून- मुखडा गाइला होता चेहरा रोजचा दु:खी - सुखाने माजला होता असे स्वप्नात ही व्हावे ? तुला मी फूल देताना घड्याळातून काटेरी -गजर ही वाजला होता मला पाहून आताशा - म्हणे हा आरसा मजला असा मयुरेश नाही पाहिला - जो आजला होता. मयुरेश साने...दि...२९-डिसेंबर-१०

सोकावलेल्या अंधाराला इशारा

गंगाधर मुटे ·
लेखनविषय:
काव्यरस
सोकावलेल्या अंधाराला इशारा सोकावलेल्या अंधाराला, इशारा आज कळला पाहिजे वादळ येऊ दे कितीही पण, हा दीप आज जळला पाहिजे आंब्याला मानायचे कांदा, किती काळ असेच चालायचे? डोळे उघडून तू वाग जरा, नकोसा वाद टळला पाहिजे गाय इकडे आणि कास तिकडे, चारा मी घालायचा कुठवर? कधीतरी इकडे; या बाजूस, दुधाचा थेंब वळला पाहिजे प्रवेशदाराचा ताबा घेत, का उभा ठाकला आहेस तू? माझा प्रवेश नाकारणारा, इरादा तुझा ढळला पाहिजे आता थोडे बोलू दे मला, ऐकणे तुही शिकायला हवे हे आवश्यक नाही की तूच, दरवेळेस बरळला पाहिजे निर्भीडतेने 'अभय' असा तू, यज्ञकार्य असेच चालू ठेव ग्रहणापायी झाकोळलेला, चंद्र आता उजळला पाहिजे

बहादुर शाह जफर के कुछ आखरी अशार...

अश्फाक ·
लेखनविषय:
काव्यरस
१८५७ च्या उठावा नंतर इंग्रजांनी बहादुर शाह जफर यांच्या दोन्ही मुलांचे शीर धडा वेगळे करुन ताटात सजवुन पेश केले आणि त्यांना रंगुनं येथे बंदिस्त केले , तेव्हा तिथल्या वातावरणात ही गजल लिहिली होती ( आज ही लाल किल्ल्यात स्मरण म्हणुन गजल लिहिली आहे) लगता नहीं है जी मेरा उजड़े दयार में !

आदाब अर्ज है !

अश्फाक ·
लेखनविषय:
सर्वं मिपाकरांना सलाम. सहा महिन्यांपुर्वी एक प्रयत्न केला होता . (http://www.misalpav.com/node/11661) पन सभासदांची सम्पादनाची सोय काढ्ण्यात आली आणि आमची गोची झाली . आता नविन सुरुवात करत आहे फरक फक्त इतकाच कि रोज प्रतिसाद मधे गजल टाकत जाइल. आजची ग़जल तशी जुनिच पन अप्रतिम आहे म्हणुन देन्याचा मोह आवरत नाही. आपल्या सुचना आणि प्रतिक्रिया आमच्यासाठी अमुल्य आहेत, प्रतिक्षेत ......... मुहाजिर हैं मगर हम एक दुनिया छोड़ आए हैं !

आसवे तो हुंदका टाळुन गेली..............

मयुरेश साने ·
लेखनविषय:
काव्यरस
आसवे तो हुंदका टाळुन गेली पापणीला सारखी जाळुन गेली जागली जी रात्र माझ्या लोचनी ती फसवीण्याचा वायदा पाळुन गेली मी जरा केला उभा माणूस मनीचा "जात" आली आडवी चाळुन गेली स्वप्न माझे कागदी हळुवार इतके कातरिची धार ओशाळुन गेली फासले असेल ही काळे - त्या माणसांनी "ती" तरी कधी- हा चेहरा कुरवाळुन गेली ? रंगला तो सावळा भजनात ऐसा मृदुंगाला थाप गोंजारून गेली उपोषणाने ही जीव जात नाही सिध्धिच तपला कंटाळुन गेली तो गुन्हा होता जरासा लाघवी "चूक" ती......