मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

सांजवेळी सोबतीला..

मयुरेश साने · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
काव्यरस
सांजवेळी सोबतीला - एकदा येऊन जा ओठ जे गातात गाणे - ओठी तू घेऊन जा ज्या - मुळे फुलती कळ्या - अन् पाकळ्या होती खुळ्या वसंत तो "मी" प्रितीचा - तू भेटुनी बहरून जा न भेटण्याची कारणे आता मला देऊ नको भेटण्याच्या कारणांची - कारणे ऐकून जा याच - साठी टाळतो मी - पौर्णीमेचा चंद्र ही कोजागिरी असते कशी ?- तू एकदा दाऊन जा शब्द ही सोडून जाती - लागता चाहुल तुझी मी जे मुक्याने बोलतो - तू एकदा समजून जा श्वास ही बघ एक होती - "मी "- न् - "मी"! --"तू" -न्- "तू" ! देह मी ठेवीन तेव्हा "अमर" - तू होऊन जा आज आयुष्या मला - थोडी "तिची" सोबत हवी धन्य मग वाटेल मरणे - तू एकदा जगवून जा काटा फुलाशी राहतो तैसा असे रुसवा तिचा समजूत मी काढेन ग ! - तू भांडणे ऊकरून जा कोण जाणे ? कोणत्या काळात मग भेटू पुन्हा ? हुंदके देईन "मी" - "तू" पापण्या भिजवून जा मयुरेश साने...दि..०४-जानेवारी-११

वाचने 1273 वाचनखूण प्रतिक्रिया 2