मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

अबोला गाजला होता.....

मयुरेश साने · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
तुला पाहून माझा शब्द - तेव्हा लाजला होता मुका राहुनही मझा - अबोला गाजला होता तुझा तो स्पर्श चंदेरी - तुझा तो हात पुनवेचा उन्हाचा हात ही माझा - अचानक भाजला होता जरी बेताल मी आहे - नव्हे हा कैफ मदिरेचा तिने सौंदर्य वर्खाचाच - प्याला पाजला होता तुझा मुखचंद्रमा पाहून- मुखडा गाइला होता चेहरा रोजचा दु:खी - सुखाने माजला होता असे स्वप्नात ही व्हावे ? तुला मी फूल देताना घड्याळातून काटेरी -गजर ही वाजला होता मला पाहून आताशा - म्हणे हा आरसा मजला असा मयुरेश नाही पाहिला - जो आजला होता. मयुरेश साने...दि...२९-डिसेंबर-१०

वाचने 1802 वाचनखूण प्रतिक्रिया 5

मयुरेश :) मजा आया. तुला पाहून माझा शब्द - तेव्हा लाजला होता मुका राहुनही मझा - अबोला गाजला होता - बोलती बंद झालेली फार मस्त सांगितली तुम्ही. :) सौंदर्याचा वर्ख पाजला होता तर अप्रतिम कल्पना. तुझा तो स्पर्श चंदेरी - तुझा तो हात पुनवेचा उन्हाचा हात ही माझा - अचानक भाजला होता हे वाचून संदीप (खरे) ची प्रेयसीवरची कविता आठवली. अश्शी नाजूक की चांदण्यात झोपलीस म्हणून काळी पडलीस. :)

सत्यजित... 14/07/2017 - 02:54
>>>तुला पाहून माझा शब्द - तेव्हा लाजला होता मुका राहुनही मझा - अबोला गाजला होता>>>व्वाह् व्वा... >>>तुझा तो स्पर्श चंदेरी - तुझा तो हात पुनवेचा उन्हाचा हात ही माझा - अचानक भाजला होता>>>क्या बात!

In reply to by सत्यजित...

सत्यजित... 14/07/2017 - 03:03
अवांतर—माझा एक शेर आठवला... 'काजवे घेवून हाती,शोध माझ्या सावल्या तू... घेवुनी हाती उन्हे मी,चांदण्याचा धूर झाले!'