मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

धोरण

व्यर्थ न हो बलिदान...

·
लेखनविषय:
लेखनप्रकार
मरकेगाव, तालुका धानोरा. नक्षलवाद्यांनी पंधरा पोलिसांना हाल हाल करून मारलं. कुणाच्या डोळ्यात पहार खुपसली, कुणाचे हात पाय तोडले,तर कुणाच्या डोक्यात दगड घालून मेंदू बाहेर काढलेला... कुणाही जखमीला गोळी घालू नका! त्यांना दगडाने सळईने चेचून मारा असं त्या नक्षलवाद्यांचा प्रमुख ओरडून सांगत होता. लोकसत्तात आलेली ही बातमी. आज भारताला नक्की धोका कुणापासून आहे? बाहेरील देशातून आलेल्या दहशतवाद्यांकडून का स्वातंत्र्य मिळून साठ वर्षे झाल्यानंतर सुद्धा नायनाट न करता आलेल्या अंतर्गत अतिरेक्यांकडून?

-२३००० ते +२००९

विनायक प्रभू ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
कधी कधी नशिब चांगले असते. लोकल मधे चक्क खिडकीची जागा मिळते. सकाळी साडेसात वाजता दादरच्या एका शाळेत जायचे होते. बसल्या बसल्या डूलकी लागली. गाडी सुरु कधी झाली ते कळालेच नाही. Nowadays there is a decline in moral degradation. हे वाक्य कानावर आले आणि खड्बडुन जागा झालो. च्या मारी गाडी मंगलोर ला पोचली की काय असा दाट संशय आला. बघतो तर बाजुला साधारण माझ्याच वयाचा एक 'प्रेशर कुकुर' शिट्ट्या वाजवत होता. मला अचानक जागा झालेला बघुन त्याने म्हटले,"सॉरी हं" तुमची झोपमोड केली. मी गप्प राहीलो. "पण मी म्हणतो ते खरे आहे की नाही". आणखी एक शीटी . आता मात्र राहवेना.

सावरकर आणि आपण

ए. प्रशांत ·
लेखक - अभिनय कुलकर्णी सावरकर नाव घेताच 'स्वातंत्र्यवीर' ही पदवी आठवते त्यांची ती प्रसिद्ध गाजलेली उडी आठवते. त्यांची सशस्त्र क्रांती आठवते. मग त्यानंतरची हिंदूत्ववादी भूमिका आठवते. आणि मग फार तर जातीनिर्मुलनासाठी केलेलं काम आठवतं. कधी कधी भाषाशुद्धी चळवळ आठवते. पण समग्र सावरकर आपण समजून घेण्याचा प्रयत्न कधी केलाय? हे सगळं आणि याहूनही बरंच काही करणारी, मांडणारी एकच व्यक्ती होती. तिला वेगवेगळे आयाम होते आणि त्यातले अनेक आपल्याला पटणारे आणि न पटणारेही होते. पण म्हणून ते समजून न घेता त्याकडे दुर्लक्षच बरेच झाले.

वाविप्र

विनायक प्रभू ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
हे प्रश्न मला वारंवार विचारले जातात. अगदी मिपावर सुद्धा. अर्थात व्यंनि मधुन. आजपण विचारला गेला. मी उतरे दिली. गेल्या ३० वर्षात ही उत्तरे मी तरी बदललेली नाहीत. प्रश्नकर्त्याने ही उत्तरे लेख लिहुन 'कर्तव्य आहे' सदस्यांचा गोंधळ दुर करावा अशी कळकळीची आणि 'कळीची' विनंती केली म्हणुन हा प्रपंच. ह्या काही उत्तराबद्दल वाद होण्याची शक्यता आहे ह्याची मला संपुर्ण कल्पना आहे. Different strokes for different folks according to frame of reference. प्रश्नः संतती नियमनाची चांगली साधने कोणती?

जुन २००९मधिलworld cup

विनोद कोकने ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
Twenty 20 World Cup – Schedule June 2009 Fri 05 16:30 England v Netherlands, 1st Match, Group B, ICC World Twenty20, 2009 London (D/N) Sat 06 09:00 New Zealand v Scotland, 2nd Match, Group D, ICC World Twenty20, 2009 London Sat 06 12:30 Australia v West Indies, 3rd Match, Group C, ICC World Twenty20, 2009 London Sat 06 16:30 India v Bangladesh, 4th Match, Group A, ICC World Twenty20, 2009 Nottingham (D/N) Sun 07 12:30 South Africa v Scotland, 5th Match, Group D, ICC World Twenty20, 2009 London Sun 07 16:30 England v

सुटका(अर्थात सत्याचे प्रयोग-२)

विनायक प्रभू ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
प्रतिक्रिया वाचुन थोडासा प्रकाश पडला. पण प्रश्न अवघड होता. फुल फोकस ची गरज होती. गाडीने जाता जाता विद्याविहार ला रेल्वेचा 'उपरी उपस्कर कार्यशाळा' चा फलक बघितला. बघुया का ह्याचा उपयोग करुन असा विचार आला. 'उपरी उपस्कर कार्यशाळा' म्हणजे वरवरचे मेंटेनन्स. घरी आलो. बघतो तर काय, महिला मंडळ जमलेले. बायकोच्या निपाणी वरुन शाळे पासुनच्या दोन मैत्रीणी आलेल्या. लग्नानंतर पहिल्यांदाच घरी आलेल्या. त्यातल्या एकीने तर सायकॉलॉजी मधे एम्.ए. केलेले. ग्रहदशा वाईट असली की असेच होते. ह्या बाईने एकदा बायकोकडे फोनवर 'तुझा नवरा कसा झोपतो' अशी विचारणा केली होती. 'झोपतो' म्हणजे, उजव्या की डाव्या कुशीवर.

सत्याचे प्रयोग

विनायक प्रभू ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
तुला मैत्रीणी किती रे? तात्यानी माझ्या चिरंजिवाना प्रश्न विचारला. त्याने काय उत्तर दिले ते कळाले नाही. कारण 'बिस्किट आंबाड्यांचा" ताजा घाणा आणायला किचन मधुन हाक आली होती. वैधानिक इशारा: 'सत्याचे प्रयोग' व्यावसायिक्(प्रोफेशनल) ट्रेनिंग असल्याशिवाय करु नयेत. अनुभव नसेल तर 'त्वांड फुटते'. हा इशारा डब्ल्यु. डब्ल्यु. एफ. च्या पैलवानांच्या इशार्-याच्या धर्तीवर वाचावा. वरील प्रष्न तात्यानी माझ्या घरी अचानक ठरलेल्या 'अल्पोपहार कट्टा' वर विचारला. त्याचे उत्तर त्याने काय दिले हे परत विचारणे मला बरोबर वाटले नाही. गरज पण वाटली नाही. आता त्याच्या प्रश्नांची उत्तरे मी कशाला संभाळू? त्याचा मुखत्यार तो.

आम्ही -एक अंमळ वेडझवे

विनायक प्रभू ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
मास्तर, हे तुम्ही सर्व फुकट का करता. कमीत कमी खर्च तरी घ्या. -इती ब्रिटीश आज रेतीबंदरावर बाल्या उर्फ ब्रिटीश भेटला. समोर दिसला, त्याला माझा प्रोजेक्ट सांगितला. मागे त्याने "मास्तर्,आमच्या पाड्याकडे पण बघा" असे प्रतिक्रियेत मला आवाहन केले होते. समोर दिसल्यावर ते वाक्य आठवले आणि म्हटले चला करुन टाकु. त्याला म्हटले, "बाल्या तुझ्या पाड्यावर इंग्रजी माध्यमाची शाळा आहे का? तो म्हणाला,"आहे की". चल, मग कामाला लाग. पाड्यावरच्या मुख्याध्यपकाला भेट आणि माझा कार्यक्रम ठेव. कार्यक्रम झाल्यावर मी त्यांना शेवटच्या महिन्यात तयारी वाढवण्याकरिता सराव परिक्षेचे पेपर देइन.

आभार

नोहिद सागलीकर ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
आभार आमच्या आधि या दुनियेत आलेल्या सगळ्याचे आभार, हो तर तुमच्या शिवाय हि सुंदर स्वच्छ (? )दुनिया बघायला कशिमिळालि असति आम्हा पामरांना ? ! तुमच्या शिवाय का हि लेकुरे उदंड झाहली ! ! नग्व्या मिळेना चड्डी ,भुक्या मिळेना भाकरी! !पियाला पानि नाहि पन भरभरुन मिळ्ते हातभट्टि! तुमच्याच तर सगळ्या लिला आहेत , म्हनुनच तर आम्हा समद्यांचा आर्जुन झाला आहे, आमच्या राज्य कर्त्या चिच बात घ्या ,पुरता अर्जुन झालय त्यांचा , जनतेचि अर्धवट साथ, पाठींब्या चा स्वार्थी हाथ, त्यात म्हागाई चि वरात, दहशत वाद टाकतोय कात, झगडा द्यायचा कुनाशि आणी खुर्चि टिकवाय चि कशि?

मिपा मुखपृष्ठ: अभ्यंकर वहिन्या ते बाबूजी!

भास्कर केन्डे ·
मिपाच्या मुखपृष्ठावर आजकाल अभ्यंकर वहिन्यांची वर्दळ असते. त्यांच्या अनुमोदनानंतर मिपाच्या तर्रीवर ताव मारायला आम्ही मिपाच्या दालनांमध्ये प्रवेश करतो. आज मात्र मिपाचे दर्शन मंगलमय वाटले. सकाळी सकाळी बाबूजींची आठवण, त्यांनी वीर सावरकर बनवताना केलेले शर्थीचे प्रयत्न, खाललेल्या खस्ता यांचे स्मरण करुन दिल्याबद्दल मिपाचे आभार! वीर सावरकर बनवताना बाबूजींनी वर्षानुवर्षे एक तपश्चर्याच केली. तिची माहिती सर्वसाधरणपणे मराठी जनतेला नाही. मला वाटते बाबूजींच्या या तपाची माहिती असणारे वा ती तपश्चर्या थोड्याफार प्रमाणात जवळून बघणारे काहीजन मिपावर आहेत.