मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

धोरण

सारे काही एकाच जातीसाठी

स्वधर्म ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
टीपः मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीचा विचार नक्कीच करता येऊ शकतो, त्यावर न्यायालयात अनेक खटलेही चालू आहेत. पण हा लेख मराठा समाजाविषयी शासनाचा दृष्टीकोन कसा आहे त्याविषयी आहे. आमची बरोबरी करायला तुमच्या सात पिढ्या जातील सप्टेंबर 2025 मध्ये ऐन गणेशोत्सवाच्या धामधुमीत मनोज जरांगे यांच्यासोबत हजारो मराठा आंदोलक आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईच्या आझाद मैदानात येऊन धडकले. जरांगे यांनी उपोषण आरंभले. सर्व वर्तमानपत्रे, टीव्ही चॅनल्स एक आणि एकच बातमी चालवू लागले ते म्हणजे मराठ्यांचे आंदोलन.

हिंदुत्ववादी आणि उजवे

उपयोजक ·
बरेच भारतीय हे हिंदुत्ववादी लोक आणि उजव्या विचारांचे लोक यामध्ये गल्लत करतात. आधी बघू की हिंदुत्ववादी म्हणजे काय? १) त्यांना हिंदू धर्मातले देव ही संकल्पना मान्य असते. ते राम , कृष्ण , शंकर , हनुमान असे जे जे हिंदू धर्मातले देव आहेत ते त्यांना मान्य असतात. ते त्यांच्या अस्तित्वाबद्दल चिकित्सा करत नाहीत. हे काहीसे आक्रमक असतात. २) ते हिंदू धर्माबद्दल चुकीच्या शब्दात केलेली टीका , निर्भत्सना यांना कडाडून विरोध करतात. ३) त्यांना हिंदू धर्मातल्या बऱ्याचशा परंपरा , हिंदू धार्मिक ग्रंथ हे मान्य असतात. ते त्यांची चिकित्सा करत बसत नाहीत.

चित्रपट परिक्षण:मला भावलेला चित्रपट "मियळगन" (Meiyazhagan)....(Spoiler Alert )

श्वेता२४ ·
फोटो

तुमच्या अतिशय तरल आणि सुंदर आठवणी ज्या राहत्या घराशी निगडीत आहेत असे घर कायमस्वरूपी सोडण्याची वेळ तुमच्यावर कधी आली आहे का?

डीग्री!

अमरेंद्र बाहुबली ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
माझी डिग्री अर्धवट राहिलीय मी तळमळतोय, नेहमी, रोज. कधी होईल पूर्ण? का होत नाहीये? का राहताहेत विषय? मी रोज झोपतोय आणि तळमळत जागा होतोय. डिप्लोमा झाल्यावर मी डिग्रीला अ‍ॅडमिशन घेतलं. जॉब करत डिग्री करायची म्हटली, पण डिग्री सोपी नव्हती. माझे विषय राहिले, ते मी काढतच गेलो. इकडे पगार वाढला, "डिग्री करायची गरज नाही" असे सल्ले मिळू लागले. पण मी डिग्री पूर्ण करतच राहिलो, पण ती पूर्ण होत नाहीये. कधी मी पेपरला वेळेत पोहोचत नाहीये, तर कधी पोहोचूनही मला काही लिहिता येत नाहीये. लिहूनही पास होत नाहीये. तर कधी भलतंच काहीतरी आचरट घडतंय — सगळं जग जणू माझी डिग्री होऊ नये म्हणून तुटून पडलंय. डिग्री पूर्ण होत

हिंदी, काका कालेलकर आणि ३ वर्षे

माहितगार ·
लेखनप्रकार
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकींच्या तोंडावर मराठी-हिंदी वाद रंगवत खळ-खट्याक नाट्य चालु असल्याचे बातम्यांच्या हेडलाईन्स मधून दिसते. त्या बातम्या असोत का मिपावरील संबंधीत धागा असो मी उघडण्याचे कष्ट यावेळी अद्याप तरी घेतले नाहीत. चार सहा नगरसेवकांना निवडून आणण्या पलिकडे अशा चहाच्या पेल्यातल्या वादळा पलिकडे मराठी लोकांमध्ये गांभीर्य किती आणि तोंड देखले पणा किती ह्या बद्दल कमी बोलावे तेवढेच बरे. असो. असो माझं टोपणनाव माहितगार, योग्य वेळी योग्य माहिती उपलब्ध करण्याचा प्रयास करावा हे माझे काम.

असावा सुंदर चॉकलेटचा बंगला - Chocolate Cha Bangla | Marathi Rhymes & Balgeet ए० आय० ने बनवलेले दुसरे पूर्ण मराठी गाणे

स्वरुपसुमित ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
नोंद जुना धागा संपादक मंडळाने क्रुपया उडवावा,त्यातले दुवे बदलले गेले आहे मित्रानो दुसरे पूर्ण गाणे mfa व्हर्जन ज्यात फक्त लहान मुलांसाठी व्हिडिओ ची लिंक,ह्यात तुम्हे कॉमेंट करू शकत नाही https://youtube.com/shorts/mOcvDaEZBoE?feature=share साधी लिंक https://youtube.com/shorts/1nhbGOBGvOM?feature=share आता काही दिवस विश्रांती पुढचा ये रे येरे पावसा वर करायचा विचार आहे पण काही अनिमेशन सुचत नाही ए० आय० मध्ये काही गोष्टी जमल्या नाही खारिचे शेपुट मुले साफ सफाई जमली नाही छतावर मोरे नाचवता नाही आला चोकलेट चे कारंजे नाही जमले पोपटाचा पिंजरा नाही जमलं ज्यात माझा काही कंट्रोल नाही तुमच्या प्रतीक्र

पहिलीपासून हिंदी निर्णय की राजकीय हत्यार ?

कपिलमुनी ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
तुम जिस स्कूल मे पढते हो उसके देवाभाऊ हेडमास्टर है.. सध्याचा राजकारणातील महत्त्वाची खेळी म्हणजे "देवाभाऊ" ने रचलेली रणनीती, ज्याने उद्धव ठाकरे यांच्या सर्वसमावेशक प्रतिमेला धक्का देत विरोधी आघाडीला कमकुवत केले आहे. या रणनीतीने हिंदी आणि उत्तर भारतीय मतदारांना प्रभावित करत दोन पक्षी एकाच दगडात मारले आहेत. मास्टर स्ट्रोक काय आहे? ही खेळी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि महाविकास आघाडी (MVA) यांना कमकुवत करण्यासाठी रचण्यात आली.

चारचाकीत घुसलेला उंदीर.

अमरेंद्र बाहुबली ·
लेखनविषय:

जिम कॉर्बेट नी केनिथ अँडरसन यांच्या वाघ, बिबळ्या शिकारीच्या कथा वाचताना सहज आठवले की आपण शिकार तर नाही, पण एका उपद्रवी उंदराला पकडले होते. उंदीर पकडण्यात कसला आलाय शूरपणा? पण हा उंदीर सतत चार दिवस चारचाकीत धुमाकूळ घालत होता. माणसे आणि वायर याने सोडल्या नव्हत्या. त्याला पकडणे सोपे नव्हते. तसेच चालत्या गाडीत (८०-१०० च्या स्पीडवर) याने जर मला अंगावर चढून किंवा पायात येऊन बिचकावले असते, तर गाडीसह मी कुठेतरी घुसलो असतो. माझ्या मृत्यूचे कारण कुठलाही डिटेक्टिव्ह, शेरलॉक होम्स, गोपीचंद जासूस शोधू शकला नसता. तर या अशा उंदराला मी कसे पकडले, याची ही कथा.

भारताची स्क्रॅमजेट तंत्रज्ञानातील यशस्वी वाटचाल

कपिलमुनी ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
भारताची स्क्रॅमजेट तंत्रज्ञानातील यशस्वी वाटचाल: DRDO ची मोठी कामगिरी स्क्रॅमजेट (Supersonic Combustion Ramjet) तंत्रज्ञान हे एक क्रांतिकारी पाऊल आहे, जे वाहनांना हायपरसोनिक वेगाने—म्हणजे मॅक 5 पेक्षा जास्त (6,100 किमी/तास) प्रवास करण्यास सक्षम करते. भारताच्या डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन (DRDO) ने या क्षेत्रात उल्लेखनीय यश मिळवले आहे, ज्यामुळे भारताला हायपरसोनिक तंत्रज्ञानात प्रभुत्व मिळवणाऱ्या मोजक्या देशांमध्ये स्थान मिळाले आहे.या लेखामध्ये DRDO च्या स्क्रॅमजेट यशाचा आढावा घेण्याचा प्रयत्न केला आहे , या प्रयोगाच्या यशाचा भारतीय सैन्याच्या भविष्यावर होणारा