चारचाकीत घुसलेला उंदीर.
जिम कॉर्बेट नी केनिथ अँडरसन यांच्या वाघ, बिबळ्या शिकारीच्या कथा वाचताना सहज आठवले की आपण शिकार तर नाही, पण एका उपद्रवी उंदराला पकडले होते. उंदीर पकडण्यात कसला आलाय शूरपणा? पण हा उंदीर सतत चार दिवस चारचाकीत धुमाकूळ घालत होता. माणसे आणि वायर याने सोडल्या नव्हत्या. त्याला पकडणे सोपे नव्हते. तसेच चालत्या गाडीत (८०-१०० च्या स्पीडवर) याने जर मला अंगावर चढून किंवा पायात येऊन बिचकावले असते, तर गाडीसह मी कुठेतरी घुसलो असतो. माझ्या मृत्यूचे कारण कुठलाही डिटेक्टिव्ह, शेरलॉक होम्स, गोपीचंद जासूस शोधू शकला नसता. तर या अशा उंदराला मी कसे पकडले, याची ही कथा. पुढे-मागे तुम्हालाही कामात येऊ शकते.
गाडीत उंदीर घुसणे हे भयंकर प्रकरण असते. वायरी कुरतडणे, घाण करणे, फ्लोअर मॅट फाडणे असे अनेक उद्योग करून उंदीर तुमच्या गाडीची वाट लावू शकतो. उंदराने असे करू नये म्हणून यूट्यूबवर असंख्य व्हिडिओ आणि ॲमेझॉनवर असंख्य प्रोडक्ट्स आहेत. तरीही लाखो गाड्यांची दरवर्षी उंदरे वाट लावतात. त्यासाठी 3M टेप, जाळी बसवणे वगैरे वगैरे प्रयोग लोक करत असतात. काही विष घालून उंदराला मारतात, पण तो एखाद्या अवघड जागी जाऊन मेला तर त्याच्या प्रेताच्या वासाने गाडीत भयंकर वास सुटतो.
मागच्या वर्षी डिसेंबर मध्ये लहान भावाचे लग्न होते म्हणून मी आणि माझे वडील Hyundai i10 ही माझ्या काकांची गाडी घेऊन नाशिकला पत्रिका वाटायला पोहोचलो. दिवसभर पत्रिका वाटून झाल्यावर आत्याच्या घरी जेवणे आटोपून आत्याला घेऊन रात्री १ वाजता नाशिक बाहेरच्या धुळे रोडवरील पंपावर २ तास घालवून CNG भरून आम्ही धुळ्याकडे सुसाट सुटलो. रस्ता मोकळाच होता. ट्रक सोडले तर हायवेला जास्त गर्दी नव्हती.
अचानक आत्याने सांगितले की माझ्या अंगावरून काहीतरी गेलं, आणि असं दोन-तीन वेळा झालं. मी एका भरपूर प्रकाश असलेल्या हॉटेलबाहेर गाडी लावली आणि आम्ही तिघांनी शोधाशोध सुरू केली. सर्व सामान काढूनही काही न मिळाल्याने, आम्ही भास झाला असावा असे समजून पुन्हा निघालो. नंतर १ तास काहीही हालचाल झाली नाही. जुनी गाणी आणि जुन्या गप्पा ऐकत प्रवास चालू होता. मध्यंतरी मलाही पायाजवळून काहीतरी गेल्याचा भास झाला, पण मी दुर्लक्ष केलं.
आत्याला ३ वाजता मालेगावात सोडून मी आणि वडील धुळ्याकडे निघालो. धुळ्यात तासाभराने पोहोचल्यावर, उतरल्या उतरल्या वडिलांच्या पायाला रक्ताची धार दिसली. मलमपट्टी करून, "उतरल्यावर ठेच लागलेली असावी" असे आम्हाला वाटले. पण वडिलांनी सांगितले की, "गाडीत मी झोपेत असताना मला काहीतरी चावलं, आणि जखमेवरून तो उंदीरच असावा" असा ठाम विश्वास व्यक्त केला. "मला जाणवत होतं, पण तू गाडी चालवताना घाबरू नये म्हणून मी काही बोललो नाही," असं त्यांनी बोलून दाखवलं.
मला मात्र गाडीत उंदीर वगैरे घुसू शकत नाही असं वाटत होतं. तरीही, यावर काय करता येईल म्हणून मी बऱ्याच लोकांना सल्ला विचारला. एकाने सांगितले, "गाडी वॉशिंगला टाकून दे, ते स्वच्छ करून उंदीर पळवून लावतील." त्याप्रमाणे, त्या दिवशी मी गाडी सर्विस सेंटरला धुवायला दिली. त्यांनी "डिझेल मारू, त्याच्या वासाने उंदीर पळेल" असं सांगितलं. ते करून झाल्यावर मी निर्धास्त होऊन गाडी घेऊन फिरत होतो.
रात्री आम्ही शहरातीलच काकांच्या घरी जायला निघालो – बायको, मी, काकू आणि मुलगा. मुलासाठी लावलेलं "शार्क डू डू डू डू" गाणं ऐकत आमचा प्रवास हळुवार सुरू होता. डिसेंबरचा महिना असल्याने मी गाडीत हीटर चालू केला. ५ किमीवरील घर ५०० मीटर राहिल्यावर, माझ्या चपलेतून डोकावणाऱ्या डाव्या पायाच्या तर्जनीला काहीतरी चावलं. मी जोरात पाय उचलला आणि गाडी बंद करून आतला लाईट लावला. सगळे दचकले. थोडं थांबून मी पुन्हा क्लच दाबून स्टार्ट करू लागलो, तर पुन्हा पायावर जोराचा हल्ला झाला.
आता मात्र माझी खात्री पटली की गाडीत उंदीर आहे, आणि हीटर चालू केल्यामुळे उष्ण वातावरणामुळे तो बाहेर आलाय. तरीही बायको आणि काकूने मला सांगितले, "घर जवळ आलंय, काय घाबरतो? मुलासारखा मुलगा असून पण, चालव." तेवढ्यात उंदराने माझ्या बाजूला बसलेल्या काकूच्या पायावर हल्ला चढवला. काकू आजारी असल्याने हालचाल करू शकत नव्हत्या, त्यामुळे जोरजोरात आरडा-ओरडा सुरू केला. पटकन दरवाजा उघडून खाली उतरू लागल्या. मागे पाहिलं तर बायको मुलाला घेऊन आधीच उतरली होती. ते तिघं एकमेकांची साथ करत पायी घराच्या दिशेने निघून गेले. गाडीत मी आणि उंदीर – आम्ही दोघच उरलो. आता काय करावे म्हणून सुचेनाच.
मी काकांना फोन करून घरातून माझे शूज घेऊन या, असं सांगितलं. त्यांनी टू-व्हीलरवर मला शूज आणून दिले. ते शूज घालून, जीन्सची बॉटम त्या शूजमध्ये खुपसून मी हिंमत करून गाडी चालू केली, आणि कशीबशी घरी पोहोचलो. नंतर घरातील सर्वांनी टॉर्च, बॅटऱ्या घेऊन १ तास उंदराचा युद्धपातळीवर शोध सुरू केला. पण उंदीर कुठेही दिसला नाही, किंवा त्याचा मागमूसही नव्हता.
दुसऱ्या दिवशी दिवसभर गाडी उन्हात उभी करून ठेवली – जेणेकरून गाडी तापून उंदीर पळ काढेल. पण त्या उपायावर विसंबून फायदा नव्हता. उंदीर जिवंत किंवा मेलेला हवा होता खात्रीसाठी. त्याशिवाय मी गाडी पुन्हा चालवू शकत नव्हतो.
अशात मला माझा एक “कार एक्सपर्ट” कलीग आठवला. मी त्याला फोन करून झालेला प्रकार सांगितला आणि यूट्यूबवर पाहिलेल्या व्हिडिओतील 3M टेप, तंबाखू, डांबर गोळ्या वगैरे काय वापरू, म्हणून सल्ला मागितला. त्याने सांगितले, "हे सगळं गाडीत उंदीर घुसू नये म्हणून आहे. आता जो उंदीर आधीच आत घुसलाय, त्याला हे सगळं वापरणं निरर्थक आहे. आता २ उंदीर पकडण्याचे पिन्जरे घेऊन गाडीत सापळा लाव. तेव्हाच उंदीर सापडेल."
त्याचे म्हणणे बरोबर होते, गाडीत उंदीर घुसू नये म्हणून काय करावे हे सांगणारे असंख्य व्हिडिओ होते, पण गाडीत घुसलेला उंदीर कसा काढावा हे सांगणारा एकही व्हिडो मला मिळाला नव्हता. त्या प्रमाणे मी धुळ्यातील प्रसिद्ध पेठ “पाचकंदील” भागात जाऊन एक पिंजरा विकत घेतला. पिंजरा विकणाऱ्याने मला सांगितले, "आत झेंडूचं फुल ठेवा. त्याच्या वासाने उंदीर येतो." पिंजरा आणि सोबत दोन स्टिक ग्लू पॅड आणून मी संध्याकाळी झेंडूच्या फुलासह गाडीत ठेवले आणि त्याचा फोटो काढून फेसबुकवरील एका कारला वाहिलेल्या समूहात झालेला सगळा प्रकार लिहून टाकला.
तिथे “new fear unlocked” वगैरे दणादण कमेंट्स पडू लागल्या. अशात एकाने कमेंट केली की, "झेंडूच्या फुलाऐवजी काजू-बदाम ठेवा."
त्याप्रमाणे मी काजू-बदाम घेऊन अर्ध्या तासाने गाडी जवळ गेलो. दरवाजा उघडून पाहिलं तर काय! झेंडूच्या फुलाचे चिथडे झाले होते. उंदीर पिंजऱ्यात अडकला होता. सापळा लावल्याच्या अवघ्या अर्ध्या तासात सापळा यशस्वी झाला होता.
उंदीर बाहेर काढून त्याला सोडून द्यावं असं ठरवलं. पण हा “अनुभवी” उंदीर परत येऊन गाडीत शिरेल अशी शक्यता होती. म्हणून त्याला रात्रभर पिंजऱ्यात पडू दिलं आणि सकाळी लांब सोडून यावं असं ठरवलं. ही आनंदाची बातमी मी फेसबुकवरील समूहात कळवली. तिथे "उंदराला मारून टाकावे" किंवा "जिवंत ठेवावे" यावरून दोन गट पडले.
सकाळी मी पिंजरा पाहिला, तेव्हा रात्रीच्या थंडीने उंदीर काकडून मेला होता. त्याला फेकून, पिंजरा गरम पाण्याने स्वच्छ धुवून काढला. त्यानंतर पुन्हा असा त्रास झालेला नाहीये. भविष्यातही कुणाला होऊ नये, अशी अपेक्षा!
हा सर्व प्रकार झाल्यावर मी दुसऱ्याचा दिवशी बाजरात जाऊन लेस नसलेले शुज आणून गाडीत ठेवले, जेव्हा केव्हा कुठेही जायचे असेल तर विना शुजची मी गाडी चालवत नाही, गाडीत खाद्यपदार्थ खाण्यास बंदी केली आहे. (अपवाद मुलगा) गायछाप जर्दा, साध्या मास्क मध्ये बांधून त्याच्या पुरचुंड्या इंजिन मधे जागोजागी “डिप्लॉय” केल्या आहेत.

वाचने
4850
वाचनखूण
प्रतिक्रिया
36
निव्वळ थरारक वृतांत !
In reply to निव्वळ थरारक वृतांत ! by मारवा
धन्यवाद मारवा!
अनुभव नक्कीच उपयोगी पडतील.
In reply to अनुभव नक्कीच उपयोगी पडतील. by कंजूस
रोचक अनुभव,
मांजर पाळा
In reply to मांजर पाळा by चंद्रसूर्यकुमार
सोसायटीत एक मांजर पाळले आहे,
कटप्पा की साजिश .....
In reply to कटप्पा की साजिश ..... by कर्नलतपस्वी
खिक्क
In reply to कटप्पा की साजिश ..... by कर्नलतपस्वी
इसीलिये बाहुबली ने कट्प्पा को
उंदरासोबतच पाल सुध्दा कार वर
In reply to उंदरासोबतच पाल सुध्दा कार वर by कानडाऊ योगेशु
बरेच अपघात हे असेच होत असावेत
खुप माहितीपूर्ण,रंजक घटनाक्रम
In reply to खुप माहितीपूर्ण,रंजक घटनाक्रम by Bhakti
अंड्याची टरफलं ठेवली तर नाही
In reply to खुप माहितीपूर्ण,रंजक घटनाक्रम by Bhakti
मोराचे पीस
In reply to खुप माहितीपूर्ण,रंजक घटनाक्रम by Bhakti
धन्यवाद ताई, नचिकेत म्हणतात
In reply to धन्यवाद ताई, नचिकेत म्हणतात by अमरेंद्र बाहुबली
काही शाकाहारी उपाय नाही का ?;
In reply to काही शाकाहारी उपाय नाही का ?; by Bhakti
भक्ती तै, कांची कामकोटी,कांचीपुरमला जाऊन...
In reply to भक्ती तै, कांची कामकोटी,कांचीपुरमला जाऊन... by कर्नलतपस्वी
हंपीतील मंदिरांतील भिंतींवर
In reply to भक्ती तै, कांची कामकोटी,कांचीपुरमला जाऊन... by कर्नलतपस्वी
अहो, सोन्याची आणि हंपीची
In reply to अहो, सोन्याची आणि हंपीची by Bhakti
भक्ती तै मग तर...
झेंडूचे फुल आणि तंबाखूचा
In reply to झेंडूचे फुल आणि तंबाखूचा by टीकोजीराव
मलाही
भौबली, गाडीत राजेश चुन्याची
In reply to भौबली, गाडीत राजेश चुन्याची by अभ्या..
खिक्क!
In reply to भौबली, गाडीत राजेश चुन्याची by अभ्या..
खिक्का!
अबा,यावरून एक आठवण झाली.
In reply to अबा,यावरून एक आठवण झाली. by कर्नलतपस्वी
हाहा. घाण मरण मिळाले पालीला!
अथतो उंदीर पुराणजिज्ञासा
In reply to अथतो उंदीर पुराणजिज्ञासा by विजुभाऊ
धन्यवाद विजूभाऊ.
भारी विषय आहे
In reply to भारी विषय आहे by गामा पैलवान
बघतो! लिहिणे सोपे आहे व्हिडिओ
एक कुशंका आहे ....
किस्सा आवडला. पण उंदीरा
काही वर्षांपूर्वी माझ्या
भारी किस्सा आहे. एकदा उंदराने
In reply to भारी किस्सा आहे. एकदा उंदराने by श्वेता व्यास
माझी दार दोन महिन्यातून एकदा