Skip to main content

देशांतर

बदलाबदली !

लेखक भोचक यांनी गुरुवार, 27/08/2009 20:18 या दिवशी प्रकाशित केले.
बदल हा माणसाचा स्थायीभाव आहे. बदलतो तो माणूस. बदलला म्हणून माणूस इथवर पोहोचला. असली बदलाबदलीची वाक्ये ऐकून, वाचून कान आता किटले नि डोळे विटले आहेत. अस्मादिक 'ठेविले अनंते तैसेचि रहावे' या तुकारामी प्रवृत्तीचे. त्यामुळे बदलाचं वारं काही झेपत नाही. मग तो बदल वैयक्तिक असो की सार्वजनिक. वैयक्तिक बाबतीत लिहायचं तर, अगदी हाफिसमधली जागा असो, खुर्ची असो, कम्प्युटर असो की आणखी काही. यातलं काही काही बदललेलं चालत नाही. मालकाने पैसे मोजून ठेवून घेतलं असलं तरी या 'ठेविले अनंते' वृत्तीचा माज मात्र त्याला सहन करावाच लागतो. कारण माझ्याकडून होणार्‍या कामातूनच त्याला 'चित्ती समाधान' लाभत असतं.

भाषा हरवली म्हणजे अस्तित्व हरवते ?

लेखक भोचक यांनी मंगळवार, 28/07/2009 16:56 या दिवशी प्रकाशित केले.
उत्तर भारतीयांच्या आक्रमणापुढे माघार घेत चालेला मराठी माणूस आणि त्याची भाषा आणि संस्कृती हा विषय गेल्या अनेक दिवसांपासून अनेकांच्या चिंतेचा, चिंतनाचा बनला आहे. अनेकांचे ते राजकीय हत्यार बनले आहे आणि अनेकांची दुखरी नस. शिवाय व्यक्तिगतरित्या प्रत्येकाचा या विषयाकडे पाहण्याचा आपापला चष्माही आहे. भाषा हरवली म्हणजे अस्तित्वच हरवते, असाही मुद्दा उच्चरवात मांडला जातोय. याच अनुषंगाने इथे इंदूरमध्ये रहात असल्याने मला काही आढळलं हे मांडण्याचा हा प्रयत्न... प्रामुख्याने होळकर काळापासून मराठी वर्ग इथे आहे हे आपल्याला माहितीच आहे. पण त्यानंतरही महाराष्ट्रातून या भागात होणारे स्थलांतर थांबलेले नाही.

माय, मावशी नि माझी लेक!

लेखक भोचक यांनी शनिवार, 25/07/2009 16:51 या दिवशी प्रकाशित केले.
जैसी हरळामाजी रत्नकिळा की रत्नांमजी हिरा निळा तैसी भाषांमाजी चोखळा भाषा मराठी फादर स्टिफन्स या आंग्ल माणसाने लिहिलेले मराठी भाषेचे वर्णन वाचून छाती अभिमानाने फुगली. तोच आमची साडेतीन वर्षाची लेक आली. तिच्या हातात बाहूली होती. तिला तिचे कपडे बदलायचे होते. तिने 'ऑर्डर' सोडली, बाबा, मला जरा बाहूलीचे कपडे 'निकलून' द्या ना ! क्षण दोन क्षण काय बोलली ते कळलंच नाही. मग मेंदूपर्यंत झण्णकन गेल्यासारखं काही तरी झालं. 'कपडे निकालके दे ना' या हिंदी वाक्यातल्या 'निकलके'चा लचका तोडून तिने मराठी वाक्याला जोडून माझ्यासमोर आदळला होता.

कलेला देशसीमांचं, भाषेचं बंधन नसतं.

लेखक बहुगुणी यांनी शुक्रवार, 24/07/2009 10:29 या दिवशी प्रकाशित केले.
खूप वर्षांपूर्वी माझ्या बरोबर लॉस एंजेलिस येथे एक चिनी स्त्री सहकारी काम करीत होती. पेली ली नाव तिचं. तिच्या सुरूवातीच्या काळात तिच्याशी इंग्लिश मध्ये संवाद साधणं म्हणजे एक कसरतच होती (आजही परिस्थितीत फारसा फरक पडलेला नाही.) मला माझ्या वरिष्ठांनी सांगितलं की मला हवं असल्यास तिला कामावरून कमी करून व्यवस्थित इंग्लिश बोलणारा/री दुसरी कोणी व्यक्ती टेक्निशिअन म्हणून मला हवी असल्यास ते व्यवस्था करतील.

मी एन आर आय कसा?

लेखक बहुगुणी यांनी गुरुवार, 23/07/2009 22:05 या दिवशी प्रकाशित केले.
राहून राहून वाटतं मी एन आर आय कसा? माझा देह जरी इथे माझं मन राही तिथे माझं घर माझ्या देशा मी बोलतो तीच भाषा त्यांची माझी गाणी एक पावसामधले पाणी एक माझ्या पगाराचं चलन वेगळं म्हणुन का केवळ असा उसासा? ज्ञानार्जनाची हौस म्हणुन गाव सोडून आलो शहरात अर्थार्जनाची गरज म्हणुन देश सोडून परदेशात एक संक्रमण चालतं तर दुसर्‍यालाच विरोध कसा? रोज घरच्या बातम्या वाचतो मतदानात भाग घेतो हुषारीची कदर करतो यथाशक्ति मदत करतो भ्रष्टाचरणी चिडून उठतो प्रतिकार करतो जमेल तसा तरीही मी परका कसा? माझ्या देशप्रेमाची का कुणी वांझोटी शंका घ्यावी माझ्या निष्ठेला, मायेला आणि का कुणी आव्हानं द्यावी? कुणी सहज करावा अपम

प्रासंगिक

लेखक नरेंद्र गोळे यांनी बुधवार, 22/07/2009 12:36 या दिवशी प्रकाशित केले.
प्रासंगिक येथ ’पौरुषास अटक’, सांगून गेले जे तिथे । ’कोरडे’ पाहून जगणे, क्रंदू लागती ते तिथे ॥ सुहृदांनो काय सांगू, भावना आमच्या इथे । तेव्हाही होतो ’थक्क’, ’चकीत’ झालो या इथे ॥ १ ॥ जे खुशीने विहरती वा, सुखे संचरती तिथे । तेच वैभव मातृभूचे वाढवू शकती तिथे ॥ खंत खुलवत नांदणे, तिथले बरे ना येथले । नांदा खुशीने तेथ वा, सत्वर निघुनी या इथे ॥ २ ॥ वाहिले लाटेवरी अन्‌ पोहोचले, असती जिथे । ओढ घेऊन जे घराची, पाहती स्वप्ने तिथे ॥ त्यांस सल्ला हाच की, सावरा वल्ही तिथे । सत्वरे ती वल्हवा अन्‌, लवकरी पोहोचा इथे ॥ ३ ॥ भावना तुमच्या समजल्या, आम्हीही व्याकुळ इथे । काय राहणे ते विदेशी, त

लय आणि ताल शरिरातून व्यक्त करणे

लेखक धनंजय यांनी मंगळवार, 30/06/2009 11:06 या दिवशी प्रकाशित केले.
लय आणि ताल या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. पण आपल्या शरिरात व्यक्त होताना त्यांचा घनिष्ठ संबंधही आहे. तालाबद्दल तात्यांनी लेख लिहिला, त्यात त्यांनी आठवण करून दिली हृदयाच्या ठोक्यांमधला ताल हा आपल्या सर्वांमध्येच असतो. पुढे या ठिकाणीच मी वसंतराव देशपांड्यांची एक ध्वनिफीत ऐकली, त्यात त्यांनी सांगितले की हृदयाच्या ठोक्यातून येणारी अचल लय असते, तिच्यातून बदलती लयकारी येऊ शकत नाही - कारण हृदयाची लय अचानक बदलली तर जीव घाबरा होतो, सौंदर्यानुभव येत नाही. पण तरी तात्यांनी म्हटल्यासारखे हे खरेच जाणवते, की आपल्या शरिरात एकाप्रकारची लय असते.