Skip to main content

देशांतर

विदेशी दिनदर्शिकेसंबंधीत माहिती

लेखक पाषाणभेद यांनी शनिवार, 10/07/2010 17:54 या दिवशी प्रकाशित केले.
आय टी उद्योगच नव्हे तर आजकाल सगळ्याच उद्योगांत काम करतांना बर्‍याचदा पाश्चात्य देशांशी संबंध येत असतो. त्या कारणाने तेथील वेळा, सण वार, सुट्या, राष्ट्रिय सण, समारंभ, स्थानिक सुट्या आदी असल्या तर त्या भारतात राहून समजत नाही. येथे अनेक सदस्य आयटी/ अन्य कारणाने भारताबाहेर वास्तव्यास आहेत. माझी एक विनंती आहे की त्यांनी त्या त्या देशातल्या वर उल्लेखिलेल्या सुट्यांचे वेळापत्रक सरकारतर्फे जाहिर झालेले वेळापत्रक म्हणा किंवा त्याशी संबंधीत संस्थळ किंवा दिनदर्शिका असेल तर ते येथे द्यावे जेणे करून येथील अनेक सदस्यांना त्याचा उपयोग होवू शकेल.

जपान चित्रसफ़र - ३ ( कामाकुरा )

लेखक डोमकावळा यांनी बुधवार, 07/07/2010 13:34 या दिवशी प्रकाशित केले.
या आधी जपान चित्रसफ़र - १ (असाकुसा मंदिर) जपान चित्रसफ़र - २ (ओदायबा) उंच इमारती , गजबजलेल्या मेट्रो आणि माणसांची प्रचंड गर्दी असलेल्या टोकियो पासून दूर गेलं की जपानचं बदलतं रूप पहायला मिळतं. उंच इमारतींच्या जागी पसरट टुमदार छोटी छोटी घरं, घरांच्या आजूबाजूला असलेली झाडे असलेलं कामाकुरा हे एक छोटस पण आकर्षक शहर. आणि टोकियो जवळच्या काही प्रमुख पर्यटन स्थळांपैकी एक.

जपान चित्रसफ़र - २ (ओदायबा)

लेखक डोमकावळा यांनी मंगळवार, 06/07/2010 12:27 या दिवशी प्रकाशित केले.
या आधी जपान चित्रसफ़र - १ (असाकुसा मंदिर) 'तोयोसू' नावाच्या टोकियोच्या एका उपनगरा पासून काहीशा अंतरावर असणारे 'ओदायबा' नावाचे एक ठिकाण. ओदायबा हे जपानच्या समुद्रावर वसलेलं उपनगर. खर तर वसलेलं म्हणण्यापेक्षा समुद्रावर अतिक्रमण करून वसवलेलं कृत्रीम बेटच. टोकियो आणि ओदायबा हे 'रेनबो ब्रिज' (Rainbow bridge) नावच्या मोठ्या आणि सुंदर पुलाने जोडले गेले आहेत.

जपान चित्रसफ़र - १ (असाकुसा मंदिर)

लेखक डोमकावळा यांनी रविवार, 27/06/2010 18:17 या दिवशी प्रकाशित केले.
असाकुसा. जपान मधल्या अनेक पर्यटन स्थळांपैकी एक पर्यटन स्थळ. इथल्या अतिप्राचीन मंदिरापैकी एक म्हणून ओळखले जाणारे हे असाकुसा मंदिर. मंदिराचे प्रवेशद्वार. सुरुवातीलाच लक्ष वेधून घेतो तो प्रवेशद्वारात असलेला भलामोठा जपानी पद्धतीचा कंदील. या प्रवेशद्वाराची रचना अतिशय आकर्षक आहे.

ब्राझील फुटबॉल जत्रा

लेखक केशवसुमार यांनी मंगळवार, 22/06/2010 00:00 या दिवशी प्रकाशित केले.
मागच्या आठवड्यात ब्राझील मधल्या फुटबॉल वेडा बद्दल मी दिलेला प्रतिसाद .. काल झालेला ब्राझील विरुद्ध आयव्हरीकोस्ट सामना, ब्राझीलीयन जनते बरोबर बघण्याचा योग आला त्याची ही क्षणचित्रे.. आयुष्यभर लक्षात राहिल असा हा अनुभव होता...

बडे दिनो के बाद हम बेवतनों को याद...

लेखक राजेश घासकडवी यांनी रविवार, 16/05/2010 11:15 या दिवशी प्रकाशित केले.
बडे दिनो के बाद हम बेवतनों को याद वतन की मिट्टी आयी है, चिठ्ठी आयी है अमेरिकेत आलो त्याला बरीच वर्षं झाली. नशीबाची गोष्ट म्हणजे एकाच वर्गातल्या आम्हा तिघांना एकाच युनिव्हर्सिटीमध्ये स्कॉलरशिप मिळाली. त्यामुळे ती खूपच सोय झाली. आम्ही तिघे एक अपार्टमेंट घेऊन राह्यलो. एकगठ्ठा तिघं जण एकत्र असल्यामुळे साहजिकच पहिल्या थॅंक्सगिव्हिंगला इतर जनता गावोगावहून आमच्या घरी जमली. परत एकदा मोठ्ठा ओळखीचा ग्रुप जमत होता. ग्रॅड स्टुडंट असल्यामुळे बजेटं तशी मर्यादितच होती. पण दुकानात दारू खरेदी करायला गेलो तेव्हा आमच्या डोळ्यावर विश्वासच बसेना. आंद्रे शॅंपेन - बाटलीची किंमत केवळ दोन डॉलर‍! मिळाली.

आणखी बुडीत खाते ('त्या' बुडीत खात्यांशी संबंध नाही)

लेखक नितिन थत्ते यांनी बुधवार, 12/05/2010 21:46 या दिवशी प्रकाशित केले.
बुडीत खात्यांची चर्चा चालू आहे म्हणून माझा वेगळा अनुभव. शीर्षकातच डिस्क्लेमर आहे. सुमारे २० वर्षांपूर्वीची गोष्ट. कंपनीच्या कामासाठी एकटाच मद्रासला गेलो होतो. एग्मोर भागात कंपनीचे गेस्टहाऊस होते. तेथे रहात होतो. नेहमी २-३ दिवसांसाठी जातो तेव्हा तडतड करून, रात्री उशीरा काम करण्याची पद्धत असते. पण यावेळी चांगला १०-१२ दिवसांचा मुक्काम होता त्यामुळे थोडा निवांतपणा होता. संध्याकाळी ऑफिसमधून आल्यावर इकडे तिकडे भटकणे, मग जेवण आणि झोपणे असा कार्यक्रम होता. एके दिवशी संध्याकाळी असेच फिरताना लोकांकडे पहात पहात चाललो होतो. कसे काय ते माहिती नाही पण जवळच असलेल्या एका इसमाशी नजरानजर झाली.