Skip to main content

देशांतर

बेसामे मुचो - एक शृंगारिक गाण्याची विविध रूपे

लेखक धनंजय यांनी सोमवार, 11/05/2009 07:32 या दिवशी प्रकाशित केले.
गेले काही महिने मला या "बेसामे मुचो" ("खूप चुंबने दे") गाण्याने पछाडले आहे. हे प्रथम ऐकले, ते आवडावे असे नाही. "अमेरिकन आयडल" या संगीतस्पर्धेत सँजाया मॅलकार (?संजय मालाकार?) याने मी ते गायलेले ऐकले, आणि अशा परिस्थितीत कुठलेही गाणे न आवडले, तर आश्चर्य ते काय? पुढे यूट्यूबवर शोधता दिसले, की हे गाणे अनेक कलाकारांना आपली छाप लावून गावेसे वाटले आहे. तसे हे गाणे फार जुने लोकसंगीत वगैरे नाही. हे गाणे त्या मानाने अगदी हल्लीहल्लीच १९४०मध्ये कोन्सुएलो वेलास्केस या मेक्सिकन पियाने-वादिकेने रचले (शब्द आणि संगीत दोन्हीही).

आमचंबी कॉकटेल!!!

लेखक पिवळा डांबिस यांनी मंगळवार, 21/04/2009 06:25 या दिवशी प्रकाशित केले.
गेल्या काही दिवसांपासून आपल्या सर्वांचे लाडके मिपाकर श्री. नाटक्या हे इथे विविध कॉकटेल्सची (अगदी मनमोहक फोटोंसकट!!) माहिती देत आहेत.... आणि थोड्याच दिवसांपूर्वी एक नाटक्या बेसनलाडूनी (गरज वाटल्यास स्वल्पविराम घालावेत!:)) उत्तर कॅलिफोर्नियात केलेल्या कॉकटेल पार्टीचा सविस्तर वृत्तांतही आपण वाचला..... तो वृत्तांत वाचून डांबिसकाका अस्वस्थ झाले आणि त्यांनी गर्जना केली, "अरे सदर्न कॅलिफोर्नियावाल्यांनो! बघा ती उत्तरेची भय्या (म्हणजे भाऊ हो!) मंडळी किती धमाल करून र्‍हायली!!

भीमाशंकर : खांडस मार्गे [अंतीम]

लेखक हर्षद आनंदी यांनी मंगळवार, 14/04/2009 05:15 या दिवशी प्रकाशित केले.
संपुर्ण अल्बम इथे पहा भाग १ पायवाट संपुन भीमाशंकरचा पायथा सुरु झाला. वेडे-वाकडे खड्डे, खाच खळगे, उभी चढण आणि पायाखाली सरकणारे दगड आमचा वेग मंदावू पाहत होते. बघता बघता अंधार पडला, आमच्या पुढे अथवा मागे कोणताही ग्रुप नसल्याची जाणिव नव्याने झाली, आणि भर भर पुढे जाण्याच्या नादात विखुरलेले आम्ही १४ जण खर्‍या अर्थाने एकटे पडलो.

चाहूल वसंतऋतूची!!

लेखक शाल्मली यांनी सोमवार, 13/04/2009 16:26 या दिवशी प्रकाशित केले.
गेले ४-५ महिने घराच्या बाहेर झाडांचे खराटे, थंड वारे, एकतर बर्फ तरी नाहीतर नुसतीच भयानक थंडी, सगळे पक्षी उष्ण देशात पळून गेलेले असं चित्र बघून नुसता कंटाळा आला होता. अशातच एक दिवस म्हणजे साधारण २०-२२ मार्चच्या आसपास एक पक्षी चोचीत काडी घेऊन उडत चाललेला दिसला. आम्हाला चाहूल लागायच्या आधी पक्ष्यांना चाहूल लागली होती वसंतऋतूच्या आगमनाची! आता ३-४ दिवसातच अजून काही पक्ष्यांची घरटं बांधण्यासाठीची लगबग दिसू लागली.

भीमाशंकर : खांडस मार्गे.

लेखक हर्षद आनंदी यांनी सोमवार, 13/04/2009 05:24 या दिवशी प्रकाशित केले.
साधारण तीन वर्षांपुर्वीची गोष्ट. पुण्यातील स्.प. महाविद्यालयाजवळ मास्टेक कंपनीचा बीपीओ होता, तिथे मी संगणक अभियंता म्हणुन कार्यरत असताना, तेथील काही हौशी तरुणांनी एकत्र येउन गिरीभ्रमण कंपू स्थापन केला. त्यांच्या पहिल्या गिरीभ्रमणाचे यश बघुन, मी सुध्दा त्यांच्या कंपुत सामील झालो. काही नवखे, काही अनुभवी असे आम्ही सह्याद्रीत भटकंती करायला सिध्द झालो. लोहगड, राजमाची असे सोपे किल्ले सुरवातीला केल्यावर जरा अवघड म्हणुन "भीमाशंकर" करायचे ठरले. आमच्या पैकी बरेच जण आधी गाडीनी जाउन आल्यामुळे तसे फार काही अवघड नसल्याच्या भ्रमात होते.