मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

प्रासंगिक

नरेंद्र गोळे · · जे न देखे रवी...
प्रासंगिक येथ ’पौरुषास अटक’, सांगून गेले जे तिथे । ’कोरडे’ पाहून जगणे, क्रंदू लागती ते तिथे ॥ सुहृदांनो काय सांगू, भावना आमच्या इथे । तेव्हाही होतो ’थक्क’, ’चकीत’ झालो या इथे ॥ १ ॥ जे खुशीने विहरती वा, सुखे संचरती तिथे । तेच वैभव मातृभूचे वाढवू शकती तिथे ॥ खंत खुलवत नांदणे, तिथले बरे ना येथले । नांदा खुशीने तेथ वा, सत्वर निघुनी या इथे ॥ २ ॥ वाहिले लाटेवरी अन्‌ पोहोचले, असती जिथे । ओढ घेऊन जे घराची, पाहती स्वप्ने तिथे ॥ त्यांस सल्ला हाच की, सावरा वल्ही तिथे । सत्वरे ती वल्हवा अन्‌, लवकरी पोहोचा इथे ॥ ३ ॥ भावना तुमच्या समजल्या, आम्हीही व्याकुळ इथे । काय राहणे ते विदेशी, तुमचे आम्हा रुचते 'असे' ॥ या इथे आयुष्य फुलवा, साथीला आम्हीही असू । या शिकवू या सर्व विश्वा, जगण्यात सौष्ठव ते कसे ॥ ४ ॥

वाचने 1821 वाचनखूण प्रतिक्रिया 4

लिखाळ 22/07/2009 - 18:49
सौष्ठवपूर्ण जीवनाचा योग्य विचार वेळेवर सुचला पाहिजे. कविता छान आहे. -- (खुष्कीच्या मार्गाने प्रवास करणारा)लिखाळ. :) 'काहीतरी कुठेतरी चुकते आहे.' असली वाक्ये आपल्या 'सूक्ष्म' विचारशक्तीची बतावणी करायला उपयोगी असतात :)

नरेंद्र गोळे 15/09/2009 - 07:11
सौष्ठवपूर्ण जीवनाचा योग्य विचार वेळेवर सुचला पाहिजे.>> हे कळणे अवघड असतेच. आणि तो प्रसंग जर जुना झाला की मग प्रासंगिकाला तरी अर्थ काय उरेल! नाही का? प्रतिसादाखातर धन्यवाद.

मदनबाण 15/09/2009 - 08:16
कविता छान आहे. :) मदनबाण..... पाकडे + चीनी = भाई-भाई. http://videos.oneindia.in/watch/12877/now-china-incursion-uttarakha