लेखकबबलुयांनी रविवार, 26/10/2008 14:46 या दिवशी प्रकाशित केले.
या ऊन्हाळ्याच्या शेवटाला आमच्या घरापासून जवळच असलेल्या "बिग सर" पॅसिफिक सामुद्रिक Scenic Highway ला गेलो होतो.
मस्त प्रकरण आहे हे ! अतिविशाल पॅसिफिक समुद्र, क्यालिफोर्नियाची नयनरम्य coastline आणि उत्कृष्ट हवामान.
त्यातलेच काही फोटू....
लेखकअरुण मनोहरयांनी रविवार, 26/10/2008 04:32 या दिवशी प्रकाशित केले.
सध्या मिपामधे दोन विषयांवर भरपूर चर्चा वाचायला मिळाली आहे. पहिला विषय- राज ठाकरे ह्यांनी धसास लावलेला, मराठी प्रदेशात मराठी माणसांना नोकरी मिळण्यास प्राधान्य हवे हा.
दुसरा शुद्ध, अशुद्ध भाषेचा.
ह्या दोन्ही विषयांना जोडणारी एक बातमी इ सकाळवर वाचली. कर्नाटकात, मराठीपळ्या आणि कोननकल्ल गावात १७९७ सालापासून स्थायीक झालेली मराठी कुटूंबे. २०० वर्षे जुना बाज असलेली भाषा तिथे अजूनही वापरली जाते.
मराठीपळ्यात १००% मराठी लोकसंख्या आहे.
लेखकअरुण मनोहरयांनी रविवार, 26/10/2008 04:31 या दिवशी प्रकाशित केले.
सध्या मिपामधे दोन विषयांवर भरपूर चर्चा वाचायला मिळाली आहे. पहिला विषय- राज ठाकरे ह्यांनी धसास लावलेला, मराठी प्रदेशात मराठी माणसांना नोकरी मिळण्यास प्राधान्य हवे हा.
दुसरा शुद्ध, अशुद्ध भाषेचा.
ह्या दोन्ही विषयांना जोडणारी एक बातमी इ सकाळवर वाचली. कर्नाटकात, मराठीपळ्या आणि कोननकल्ल गावात १७९७ सालापासून स्थायीक झालेली मराठी कुटूंबे. २०० वर्षे जुना बाज असलेली भाषा तिथे अजूनही वापरली जाते.
मराठीपळ्यात १००% मराठी लोकसंख्या आहे.
लेखकभास्कर केन्डेयांनी बुधवार, 22/10/2008 01:46 या दिवशी प्रकाशित केले.
सहा ऋतुंचे सहा सोहळे. पण मला बुवा या न्यु इंग्लंडातली पानगळती (फॉलियेज/फॉल) फार आवडते. उन्हाळा संपून गुलाबी थंडी सुरु होते तसा हिरवा गर्द असणारा निसर्ग रंग पलटू लागतो. उंच-उंच झांडांचे शेंडे पिवळे-लाल पडू लागतात व बघता बघता सगळा परिसर पिवळा धमक व लाल भडक मखमलीने सजून गेलेला असतो.
वरमाँट, न्यू हँप्मशरला तर सगळेच जातात. पण दररोज आनंद देणार्या कामावर जाताना दिसणार्या आजूबाजूंचा झाडांचे कौतुकही करावे म्हणून मी विषेश चित्रे काढली.
लेखकभोचकयांनी मंगळवार, 21/10/2008 12:23 या दिवशी प्रकाशित केले.
आजच्या 'नई दुनिया' या इंदूरमधील सर्वाधिक खपाच्या वर्तमानपत्रात आलेल्या अग्रलेखाचा मराठी तर्जुमा. वाचा आणि थंड बसा.
केंद्रीय मंत्री लालूप्रसाद यादव यांनी मुंबईत रेल्वेच्या परीक्षेसाठी आलेल्या उत्तर भारतीय विद्यार्थ्यांवर केलेल्या हल्ल्याप्रकरणी राज ठाकरे यांना मनोरूग्ण असे संबोधले आहे. लालू यांनी संतापाच्या भरात हे वक्तव्य केले असले तरी राज यांना 'मनोरूग्ण' म्हटल्याने त्यांनी केलेले गुन्हेही कायद्याच्या कक्षेत माफ ठरतात हे लालू विसरलेले दिसतात. कारण कायदाही तेच सांगतो. राज यांनी केलेला गुन्हा हा काही कोणत्याही व्याधीतून आलेला नसून ती एक अतिशय नियोजनबद्ध कृती आहे.
लेखकभोचकयांनी बुधवार, 15/10/2008 17:06 या दिवशी प्रकाशित केले.
आपल्याला हिंदी चांगलं कळतं असं मराठी माणसाला उगाचच वाटत असतं. म्हणजे त्यात थोडं तथ्य नक्कीच आहे. अहिंदी भाषिकांमध्ये मराठी लोकांनाच हिंदी जास्त चांगली कळते आणि बोलताही येते. पण म्हणून आपण आपली संपूर्ण अभिव्यक्ती त्या भाषेत करू शकतो असं नाही. आता हा अनुभव महाराष्ट्रात तितका येणार नाही. पण उत्तरेकडे गेल्यानंतर अनेकदा हिंदी चांगली समजत असूनही अनेकदा आपला 'मोरू' होतो.
इंदूरमध्ये सुरवातीला आल्यानंतर हिंदीत संवाद साधणं काही कठीण नाही, अशीच भावना होती. पण काही दिवसात आपोआपच विकेट पडायला सुरवात झाली. बायकोने एकदा तूप आणायला लावलं. इथे दुध-दुभतं भरपूर. त्यामुळे त्याची दुकानही बरीच.