ओमर खय्याम... भाग -९
- Read more about ओमर खय्याम... भाग -९
- 2 प्रतिक्रिया
- Log in or register to post comments
3
| १.
मनाच्या गाभा-यातून
घोंघावतेय आठवणींचे वादळ
थरथरणा-या पापण्यांतून
ओघळतायत आनंदाश्रू नितळ |
२.
एकदा त्याच किनार्यावर
एक स्वैर लाट भेटली
त्या लाटेवर झालेली स्वार
एक आठवण घेऊन आदळली |
३.
गंधुली अंगणातील रातराणीची
सांजवेळीच मोहरून पसरली
छोटुली कळी तुझ्या आठवणीची
अवेळीच बहरून उमलली |
४.
तुझ्या आठवणींशी हृदयाची
पहिल्या प्रहरी झडली चकमक
जिंकता जिंकता हरलो मी
राहिली अनंत वेदनेची तगमग |