Skip to main content

घेऊ कसा उखाणा (तिकडम)

लेखक अरुण मनोहर यांनी सोमवार, 13/06/2011 19:55 या दिवशी प्रकाशित केले.
तिकडम सगळे जण आग्रह करतात लवकर नाव घ्याना तोंडात लाडुचा बकाणा घेऊ कसा उखाणा? . , . . शिकावू डेंटीस्टने- ढिली बनवली कवळी दात वाजती टणाणा मधे अडकून जीभ- करतेय नुस्ता ठणाणा घेऊ कसा उखाणा? . . . . पहिल्यांदा पडली टाळी, दुसऱ्याचा झाला हशा तिसरा सपशेल उताणा चौथ्याचा जिकर केला, तर लोक म्हणले हाणा घेऊ कसा उखाणा? ..........................................................
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 1143
प्रतिक्रिया 0

प्रतिक्रिया