Skip to main content

चारोळ्या

(जिलब्या खायकू)

लेखक sagarpdy यांनी गुरुवार, 02/08/2012 11:02 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेरणास्थान १. पाऊस धारा पडती हाती गारा हाती घ्या झारा धारा धारा, शुद्ध धारा २. कुटील कावा मनांत रंगवावा पाडून जिलब्या पोटभर खाव्या ३. नाच मोराचा हैदोस पोराचा जेवण झाल्यावर टाईम झोपेचा (चारोळ्या जुळवण्यात अखेर यशस्वी!)
काव्यरस

<पिवून हय क्यु?>

लेखक विजुभाऊ यांनी गुरुवार, 02/08/2012 10:19 या दिवशी प्रकाशित केले.
दारोळ्या १. प्यासा बार मंडई समोर बाटल्या रित्या २. उठला नाना लावे समाधी तुळशी बागेत ३. नाच पराचा हैदोस वाचताना मोडते समाधी प्रेरना स्त्रोतः http://misalpav.com/node/22407#comment-416944

तीन हायकू -

लेखक विदेश यांनी बुधवार, 01/08/2012 19:32 या दिवशी प्रकाशित केले.
१. पाऊस धारा पडती हाती गारा ओंजळ रिती २. कुटील कावा मनांत रंगवावा देवळात मी ३. नाच मोराचा हैदोस पावसाचा माझी समाधी

प्रेम म्हणजे काय रे भाऊ?

लेखक पुश्कर यांनी गुरुवार, 24/05/2012 17:18 या दिवशी प्रकाशित केले.
कोणी तरी काही चांगल्या ओंळी लिहिल्या आहेत..... मला माझ्या मित्राने विचारले कि प्रेम म्हणझे नेमके काय? मी त्याला सागितले की ... कितीही जवळ जाणार असेल तरी गाडी सावकाश चालव आणि पोहचल्यावर फोन कर असे आईचे काळजीचे बोल म्हणजे प्रेम. दिवाळीला स्वतःसाठी साधे कपडे न घेता मुला-मुलीसाठी त्यांच्या पसंतीचे महागातले जीन्स आणि कपडे घेणारे बाबा म्हणजे प्रेम. कितीही मस्ती केली व रात्री लेट झाले तरी आई-बाबाना न सांगता हळूच दार उघडणारे आजी-आजोबा म्हणजे प्रेम. कितीही वाद झाले तरी दादा जेवलास का अशी विचारणारी बहिण म्हणजे प्रेम. पगार कितीही कमी असेल तरी दिवाळी भाऊभीजला बहिणीच्या पसंतीचे घड्

(एक चारोळी)

लेखक कुंदन यांनी मंगळवार, 08/05/2012 01:01 या दिवशी प्रकाशित केले.
श्रेय : दोन चारोळ्या - http://www.misalpav.com/node/21589 ओळखीच्या पाणवठ्यावर रात्रभर, पिउन जाई राजकुमार ! दिसतो जरी रुबाबदार, पितो मात्र उधारीवर !!

दोन चारोळ्या -

लेखक विदेश यांनी सोमवार, 07/05/2012 17:30 या दिवशी प्रकाशित केले.
१. अनोळखी वाटेवर क्षणभर भेटुन जाई राजकुमार - नाही दिसला पुन्हा जरी तो ओढ तयाची का अनिवार ! २. मिठीत तुझिया विसावतो मी - म्हणू लाडके कसे तुला ? चवळीची तू शेंग बारकी , दुधी टम्म मी फुगलेला !

मोती बनतो शिंपल्यात

लेखक वडा खालचा वडा यांनी गुरुवार, 19/04/2012 16:33 या दिवशी प्रकाशित केले.
मोती बनतो शिंपल्यात पक्षी राहतो घरट्यात | गणपत रावांच्या घराण्यात अक्कल नाही टाळक्यात || मोर या .....
काव्यरस

शब्द शब्द गुम्फावेत असे

लेखक वडा खालचा वडा यांनी गुरुवार, 19/04/2012 16:19 या दिवशी प्रकाशित केले.
शब्द शब्द गुम्फावेत असे वेणीत ओवतात गजरा जसे | भावनिक हृदयाची साद असते माऊ तेव्हाच मन "कविता" करून लागते गाऊ ||१|| मोरया .....
काव्यरस

अंधारात जाता जाता उगीच

लेखक वडा खालचा वडा यांनी बुधवार, 18/04/2012 09:55 या दिवशी प्रकाशित केले.
अंधारात जाता जाता उगीच प्रकाशाकडे तिरकस पणे पाहावे | मी तुझीच आहे रे "राजा " असे म्हणून दुसर्या सोबतच निघून जावे || मोरया .....
काव्यरस

" चार चारोळ्या - "

लेखक विदेश यांनी मंगळवार, 13/03/2012 18:25 या दिवशी प्रकाशित केले.
खांदा देण्या कितिदा गेलो इतक्या वेळा मी गेलो - आपल्यासाठी उरले कोणी ... पहावयाचे विसरून गेलो ! |१| एक तारखेची गंमत असते आमच्या प्रेमा भरती येते - माझ्या नयनीं पत्नी असते तिचिया नयनीं वेतन असते ! |२| कचरामुक्त जगास बघावे ध्यास मनीं जरि धरतो - अशक्य मजला परि वाटते, जोवर मी लेखन करतो ! |३| सावलीतही गॉगल लावून हीरो बनण्या गेलो , ' डोळे नाहीत आले- ' सांगत घामाघूम झालो ! |४| (पूर्व प्रसिद्धी: हास्यगाssरवा २०१२)