Skip to main content

विरंगुळा

संपला फ्रेंडशिप डे......

लेखक सुधीर मुतालीक यांनी बुधवार, 05/08/2020 06:55 या दिवशी प्रकाशित केले.
कसला डोंबलाचा फ्रेंडशिप डे. च्येष्टाय गड्या हा डे !!! ‘मी तुला माझा फक्त चांगला मित्र मानते...' या वाक्याची लय भीती वाटायची राव ! कोंच्या क्षणी थोबाडावर हे वाक्य येऊन आदळेल याचा नेम नसायचा. बरं, ते आलंच अंगावर की मेंदू त्यावेळी मात्र सटासट कॅल्क्युलेशन करायचा. तेवढे फास्ट कॅल्क्युलेशन इंजिनियरिंगला असताना झाले असते तर आज कुठच्याकुठं गेलो असतो आपण!

सुंदर महाराज

लेखक लेखनवाला यांनी मंगळवार, 04/08/2020 14:34 या दिवशी प्रकाशित केले.
********************** गल्लीतल्या त्या साईमंदीराच्या पुढच्या बाजूच्या बैठया चाळीत बाजूने मोठासा नाला जातो…. सततचा बगळ्याचा वावर एखादया ओढयाला लाजवेल असा… सतत पाणी वाहत असतं निवातं….. इतकं असूनही त्या परिसरात कधीही मच्छर, डास यांचा त्रास जाणवत नाही, का तर? कारण एकच, तिथं कधीही कोणत्याही वेळी धुपारे घालणं चालू असतं. कोण करतं हे? सुंदरमहाराज. इतरवेळी मस्त शर्ट-पॅन्ट घालून स्कूटीवरुन अख्खं मुंबई शहर फिरणारे पण मग संसारासाठी रोजगार आवश्यक, त्यामुळे जशी सूर्याची पाठ फिरली की भगवी लुंगी नेसत घरात प्रवेश करत आपल्या कामाला लागतात.

भुतंखेतं

लेखक जिन्क्स यांनी रविवार, 26/07/2020 20:53 या दिवशी प्रकाशित केले.
महिन्यातून एकदा ऑफिस संपल्यानंतर ऑफिसच्याच टेरेस वर रात्री जमून भोजनाचा आनंद घेत उशिरा पर्यंत गप्पा मारणे हा आमचा त्या वेळचा प्रघात होता. आमचा 4 मित्रांचा चमू होता. त्यातलाच एक मुस्लिम मित्र घरून सामिष पदार्थ घेऊन यायचा आणि त्याचा आस्वाद घेत आमच्या गप्पा रंगायच्या. एका रात्री असाच तो मित्र याखनी पुलाव घेऊन आला होता. टेरेस कडे जातच होतो तेवढ्यात मी पाहिले की आमच्याच ऑफिसचा एक सीनियर डेव्हलपर एकटाच काम करत बसला होता. मी त्याला आमच्या सोबत यायचा आग्रह केला. तो आधी तयार नव्हता पण नंतर तयार झाला. त्या रात्री गप्पा अचानक भुतांच्या विषयावर आल्या.

शब्दखेळ : विरंगुळा (भाग २)

लेखक हेमंतकुमार यांनी सोमवार, 20/07/2020 11:32 या दिवशी प्रकाशित केले.
भाग १ नव्या धाग्यावर स्वागत. नवा खेळ : शब्दव्यूह आणि अंताक्षरी खाली ओळीने नऊ अक्षर समूह दिले आहेत. प्रत्येक समूहातून तुम्हाला एक अर्थपूर्ण शब्द ( दिलेल्या अक्षरसंख्येचा आणि शोधसूत्रानुसार काढायचा आहे). आता पुढे अंताक्षरी अशी चालू होईल: • पहिल्या समूहातून योग्य शब्द निघाल्यावर त्याचे शेवटचे अक्षर पहा. • त्या अक्षराने सुरू होणारा सूत्रानुसार योग्य शब्द दुसऱ्या समुहात आहे.

खिडकीबाहेरचं जग!

लेखक मन्या ऽ यांनी शुक्रवार, 17/07/2020 17:45 या दिवशी प्रकाशित केले.
खिडकीबाहेरचं जग! ती आपले पाणीदार डोळे किलकिले करुन खिडकीबाहेरच जग बघण्याचा केविलवाणा प्रयत्न करत होती. शाळा-ऑफिसात जाणार्यांची गडबड,रस्त्यावरची वर्दळ, फेरीवाले हे सारं तिला एकदातरी जगता यावं. असं वाटे; पण बाहेरच्या दुनियेत मात्र तीच अस्तित्व नव्हतं.. ती आजही नेहमीप्रमाणे किरणची वाट बघत होती.

... And a forward shortleg

लेखक जे.पी.मॉर्गन यांनी गुरुवार, 16/07/2020 21:44 या दिवशी प्रकाशित केले.
आपण कॉमेंटरीमध्ये नेहेमी ऐकतो बघा - Kumble resumes from round the wicket with an aggressive field – 2 slips, a gully, silly point and a forward shortleg. येस! ... And a forward shortleg! एकदम "...आणि डॉ. काशिनाथ घाणेकर" स्टाईलमध्ये! कारण ती जागाच तशी आहे. फुटबॉल मधे स्वीपर किंवा लिबेरो, हॉकीमध्ये quarterback , बास्केटबॉल मधे point guard, कबड्डीमधला कोपरा रक्षक यांचा जो माज, जे ग्लॅमर तेच क्रिकेटमध्ये फॉरवर्ड शॉर्टलेगचं. इथे डायलॉगबाजी करून टाळ्या शिट्ट्या घेण्याची बात नाही - कडक रोलमध्ये पिक्चर खाण्याचा विषय आहे.

क्वाएट प्लीज... लेडीज अँड जेंटलमेन!

लेखक जे.पी.मॉर्गन यांनी शनिवार, 11/07/2020 18:16 या दिवशी प्रकाशित केले.
चंदा आए, तारे आए, आनेवाले सारे आये आए तुम्ही संग ना... आन मिलो सजना| जुलै महिन्याचा दुसरा आठवडा .... दुपारची वेळ.... बाहेर रिमझिमणारा पाऊस.... हातात मोठा मग भरून वाफाळता चहा आणि ही अप्रतीम ठुमरी. जुन्या आठवणींची हुरहुर लावणारी. ह्यावेळी खरोखरच एका सजणीने झुरवलं. तिच्या आठवणीने जीव वेडापिसा झालाय. तिचं आणि माझं नातं अगदी मी वयात येतानापासूनचं - त्याहीपेक्षा किंचित आधीचंच. हिरवळीवरून - पांढर्‍या शुभ्र पेहरावात ओंजळीने मोती उधळीत येणारी ती. तिच्या त्या निळ्या डोळ्यांना, सोनेरी केसांना, तिच्या तारुण्याने मुसमुसलेल्या अंगकांतीला, स्ट्रॉबेरीचा रंग ल्यालेल्या गालांना चिरतारुण्याचं वरदान.

(नदीम-) श्रवणभक्ती

लेखक कुमार जावडेकर यांनी बुधवार, 01/07/2020 12:30 या दिवशी प्रकाशित केले.
आम्ही नदीम-श्रवणच्या संगीताचा बारकाईनं अभ्यास केला आहे. ... अर्थात नदीम-श्रवणच्या संगीताचा 'फार काही न' अभ्यास केला तर अधिक चांगलं होईल असं आमच्या ज्येष्ठ बंधूंचं मत आहे! साधी गोष्ट आहे. आमच्या आई-वडिलांचा काळ शंकर-जयकिशनचा; तर बंधूंचा काळ आर. डी. बर्मनचा; अन् आमच्यावर वेळ आली नदीम-श्रवण ऐकण्याची. ('काळ आला होता, पण वेळ आली नव्हती' असं यावर आमचे बंधू म्हणतील असा आमचा तर्क आहे. आमचं त्यावर 'काळ काही सांगून येत नाही' असं उत्तर तयार आहे.) पण प्रत्येक काळ वेगळा असतो. आमचे आई-वडील शंकर-जयकिशनच्या लाखेच्या तबकड्या ग्रामोफोनवर लावायचे (…त्यांना त्या लाखमोलाच्या वाटायच्या!). ज्ये.

आमचे गाव अन देवाचे नाव

लेखक कोहंसोहं१० यांनी मंगळवार, 30/06/2020 16:21 या दिवशी प्रकाशित केले.
(हा धागा उडवलेला दिसला. कारण समजले नाही परंतु कदाचित काही शब्द आक्षेपार्ह असावेत असे समजून ते वगळून पुन्हा धागा पोस्ट करत आहे. धागा आक्षेपार्ह वाटल्यास जरूर उडवावा परंतु त्यामागचे कारणही कळवावे ही प्रशासनास विनंती) रात्रीची जेवायची वेळ. बंड्या, आई, आणि बा जेवायला बसलेत. बंड्या एकदम खोल विचारात. बंड्या(बांना): बा देवाला नाव कुणी ठेवलं? (बा बंड्याच्या प्रश्नांनी एकदम चक्रावून जातात) बा: आरं बंड्या, काय बी काय इचारतो. बंड्या: आज की नई शाळेमंधी आमच्या वर्गात एक नवीन गुर्जी आलं व्हतं शहरातून. लै हुश्श्यार हाय म्हणं. आल्याआल्याच गुर्जीनं विचारलं देवाचं नाव कुणी ठेवलं सांगा पोरांनो.

दोसतार - ५७ ( अंतीम भाग)

लेखक विजुभाऊ यांनी शनिवार, 27/06/2020 10:15 या दिवशी प्रकाशित केले.
रात्री झोपताना बरेच वेळ झोपच येत नव्हती. डोळे मिटले की डोळ्यासमोर मुलांनी गच्च भरलेले मैदानच येत होते. मॅच हरलो तरी खूप मजा आली. मुख्याध्यापक सरांनी सहावी ब आणि आमच्या टीमला त्यांच्या घरी चहा चे निमंत्रण दिले. सर्वांचे अभिनंदन केले. पुढचे बरेच दिवस मॅच शिवाय वर्गात दुसरा विषयच नव्हता.
मागील दुवा http://misalpav.com/node/47081 वार्षीक परीक्षेचा शेवटचा पेपर संपला की पुन्हा एकदा यवतेश्वराची सहल करायचीय. सगळ्यांना घेऊन. एल्प्या टंप्या योग्या राजा मंदार , महेश आंजी , गौरी , संगीता , दाम्या , अज्या , सुन्या सगळ्यांनी जायचय.