Skip to main content

विरंगुळा

दोसतार - ४५

लेखक विजुभाऊ यांनी सोमवार, 11/05/2020 22:34 या दिवशी प्रकाशित केले.
किल्ल्यात एक गुहा पण करायची आणि शेवटच्या दिवशी त्या भुयार करायला वापरलेल्या डबड्यात मोठ्ठा दंड्या फटाका लावायचा. धुडूम ... अख्खा किल्ला हादरून जातो. किल्ल्यातली माती उडते त्यावरच्या झाडाझुडपांसह. मस्त मजा येते रे" टंप्या. हे असले काही पाटणला नसायचे. तिथल्या दिवाळीची गम्मत काही वेगळीच.
मागील दुवा http://misalpav.com/node/46671 पाटणला किल्ला करायचा तर अगोदर जमीन सपाट करायला लागते. अंगणात जिथे म्हणून सपाट जमीन सापडेल तिथे तुळशीचे सदाफुलीचे नाहीतर कोरफडीचे रोप आज्जी लावायची. मोगर्‍याचे झाड होते. तगरीचे पण होते.

शब्द झाले मोती.. - २

लेखक गणेशा यांनी शनिवार, 09/05/2020 17:25 या दिवशी प्रकाशित केले.
शब्द झाले मोती..१ मागील धाग्याबद्दल : या धाग्याला पुन्हा २०१५ प्रमाणे पुन्हा सुरुवात करावी म्हणतोय.. भाग -१ मध्ये जरी धाग्याला मी सुरुवात केली असली तरी यात खरे तर शब्दांचे मोती पेरले ते खास करुन आपल्या पैजारबुवांनी ..आज निवांत पणे पुन्हा सगळे रिप्लाय वाचले.. वा काय मस्त वाटले.. तसेच इतर अनेक जनांनी ही यात मजा आनली..आपण एकमेकांना ओळखत ही नव्हतो आणि काय सुंदर नाते विनले गेले. नियम : तेंव्हा सारखेच आता ही वाटते आहे.. आपण फक्त लिहावे .. उत्स्फुर्त.. तेंव्हाच सुचलेले..

मन्याचे लॉकडाऊन

लेखक चिनार यांनी शुक्रवार, 08/05/2020 18:17 या दिवशी प्रकाशित केले.
जानेवारी-फेब्रुवारी महिन्यातच कोरोना व्हायरस जगभर पसरू लागल्याच्या बातम्या मन्याने पेपरमध्ये वाचल्या होत्या. ऑफिसमध्येही दबक्या आवाजात या विषयावर चर्चा सुरु झाली होती. मन्या तिकडे दुर्लक्ष करायचा. कारण ऑफिसमधल्या लोकांना चर्चेसाठी कायमच विषय हवा असतो. आणि एकंदरीत चर्चा,बातम्या वगैरे बघता, कोरोना हा श्रीमंतांचा रोग आहे अशी मन्याची समजूत झाली होती. साधारण परदेशवारी वगैरे केलेल्या लोकांना हा रोग होतोय अशी चर्चा होती. आता मन्याने उभ्या आयुष्यात विमानतळसुद्धा एकदा आणि तेही बाहेरून बघितलं होतं. त्यामुळे कोरोना काही आपल्यापर्यंत पोहोचत नाही असे म्हणून मन्या बऱ्यापैकी बिनधास्त होतं.

टेस्ट

लेखक शेखरमोघे यांनी बुधवार, 06/05/2020 23:33 या दिवशी प्रकाशित केले.
अनेक दिवस काकांची भुणभुण चालू होती - आपण टेस्ट करून घ्यायला हवी. काकूनां वाटत होतं - काय जरूर आहे, सगळं व्यवस्थित तर आहे.  सकाळी उठल्यावर काकूंच्या लक्षांत आले - काका कधीच जामानिमा करून बाहेर पडले आहेत.  काकूंनी फक्त खात्री करून घेतली, बाहेर पडण्याचे कारण म्हणून वापरायची ढाल - वाणसामानाची पिशवी - काकांनी न विसरता बरोबर घेतली आहे.  कांही वेळाने लॅच उघडतानांचे काकांचे जोरजोरातले गुणगुणणे ऐकू आले, तेव्हा काकू स्वतःशीच पुटपुटल्या - खुषीत दिसताहेत म्हणजे टेस्ट निगेटिव्ह आली असावी, आता भुणभुण तरी कमी होईल.    लॅच उघडून आंत

दोसतार - ४४

लेखक विजुभाऊ यांनी सोमवार, 04/05/2020 00:24 या दिवशी प्रकाशित केले.
टंप्या असा काही बोलला असेल यावर विश्वास त्याचा स्वतःचाही बसणार नाही. पण मुख्याध्यापक सर सांगताहेत म्हणजे तो खरेच तसा बोलला असेल हे नक्की.
मागील दुवा : http://misalpav.com/node/46560 शिक्षक दिनाला बक्षीस मिळाले म्हणून आईला काय आनंद झाला. तीने मीठ मोहरी ने माझी दृष्टच काढली. मुद्दाम उतरवून टाकलेली मीठ मोहरी चुलीत टाकली. मीठ मोहरी उतरवून टाकणे म्हणजे काय ते कधीच समजत नाही. पण ती उतरून टाकल्या नंतर चुलीत मोहरी तडतडल्याचा जो मस्त वास येतो त्याची सर कशालाच नाही. शिक्षक दिन होऊन गेला . पण तो तिथेच थांबला नाही.

फाssट्टकन !!!

लेखक बोलघेवडा यांनी शनिवार, 02/05/2020 18:01 या दिवशी प्रकाशित केले.
"हॅलो...अगंss सग्गssळ्या सोसायटीत बभ्रा झालाय. कुणाला म्हणून तोंड दाखवायची सोय ठेवलेली नाही ह्यांनी आता." . . "पण असं केलं तरी काय जावईबापुंनी...म्हणते मी???". . "अग्ग..सत्तत नजर ठेऊन असायचे त्या शेजारच्या चीचुंद्रीवर..सवितावर!! . आता त्या सटवेला...सासरचेही नाहीत अन् नवराही परगावी!! म्हणजे ह्यांना रान मोकळं!! . बरं, कुठं होतात म्हणून विचारलं तर कावरे बावरे व्हायचे नुसते!! मी काय दिलं नसतं करून?? . काssयबाई...मेला आचरट प्रकार!!..

दोसतार - ४३

लेखक विजुभाऊ यांनी शुक्रवार, 24/04/2020 07:40 या दिवशी प्रकाशित केले.
अरे हे काय . अज्या का उभा आहे वर्गासमोर, असा मधेच . का रे काय झाले. काय झाले. अरे तिसरा तास संपून छोटी सुट्टीही संपली. आता चौथा तास सुरू झालाय. सस्स्स्स्स्स… श्शीशी… मुलांनी नाराजी व्यक्त केली. ऑफ तास संपला होता.
मागील दुवा : http://misalpav.com/node/46227 शिक्षक दिन येवून गेला . संध्याकाळी घरी जाताना रस्त्यात कोणाच्या तासाला काय गम्मत झाली हेच बोलत बोलत गेलो. सगळेच तसे बोलत गेले. मज्जा तर प्रत्येक तासाला झाली होती. प्रत्येल्काला काहीतरी नवीन सापडले होते. कविता अजिबात न आवडणारा रघु कविता चालीवर गुणगुणत होता.

मोगँबो - ८ ( अंतीम)

लेखक विजुभाऊ यांनी गुरुवार, 16/04/2020 07:49 या दिवशी प्रकाशित केले.
सारंग जे काही म्हणत होता ते किती प्रॅक्टीकल होते ते यावेळेस तरी त्याला माहीत नव्हते पण ते करायचे होते हा ठाम निर्धार त्याच्या बोलण्यातून सरांनाही जाणवला. ज्योतीने ज्योत पेटवावी तसा तोच निर्धार प्रत्येकाच्या मनात आला होता. आजचा आणि उद्याचा दिवस हे महत्वाचे आहेत प्रत्येकजण मनातल्या मनात स्वतःला सांगत होता. आयुष्याला कलाटणी देणारे दोन दिवस.
मागील दुवा : http://misalpav.com/node/46438 आजचा दिवस कसा जाणार आहे याचा विचारच मनात यायला वेळ नव्हता. दिवसात फक्त चोवीस तासच का असतात.

नवंविवाहित आणि जुनंविवाहित! (गप्पा)

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी बुधवार, 15/04/2020 15:37 या दिवशी प्रकाशित केले.
एक नवविवाहित एका जुनंविवाहिताशी गप्पा मारतोय. नवं वि:-आता मी खूप आंनदात आहे. जुनं वि:- अजून काही दिवस तू 'असाच' आंनदात असणार नवं वि:- 'असाच' मंजे? जुनं वि:- 'असाच!' नवं वि:- मग नन्तर काय होईल? जुनं वि:- तू 'पाश्चात्तापदग्धवियोग' प्राप्त करवून घेशील नवं वि:- हा कोणता नवा योग जुनं वि:- छे रे छे! अरे बाळा,हा काळा बरोबर फुलत फुलत गेलेला योग आहे. नवं वि:- मंजे? जुनं वि:- अरे मुला,माझ्या गुलाबाच्या फुला, एक सांग ब्रे मला. तुला विवाहाच्या नवंमांडवा खालून पुढे सरून किती महिने झाले? नवं वि:-दोन! जुनं वि:- हां..म्हणूनच तुला येत नाही(अजून) फोन ...

मोगॅबो-८

लेखक विजुभाऊ यांनी मंगळवार, 14/04/2020 15:58 या दिवशी प्रकाशित केले.
मी पक्या गण्या आणि संध्या सकाळी जॉगिंग पार्क वर सरांना भेटतो. आणि तुम्हाला फोन करतो. चला आता उद्या सकाळी भेटूया." सकाळी काय होणार आहे हे कोणालाच माहीत नव्हते. पण तरीही सगळेच एका ठामपणा ने उठले. घरी जाऊन झोप येणार नव्हतीच .सकाळी मोगँबो सरांना भेटायचे होते. प्रश्नांला थेट भिडायचे होते. मागील दुवा http://misalpav.com/node/46406 फाईव्ह गार्डन च्या सेंट्रल गार्डन पहाटे इतकी गर्दी असू शकते यावर विश्वास बसणे जरा कठीणच जाते. सकाळी सहा वाजता इतकी माणसे इथे काय काय करतात. कोणी सुलटे चालतात कोणी विरुद्ध दिशेने चालतात. कोणी हात वर करून चालतात.