Skip to main content

विरंगुळा

मनातले माधवनगर -उत्सव-सण-वार...

लेखक शशिकांत ओक यांनी बुधवार, 27/01/2021 18:39 या दिवशी प्रकाशित केले.

‘मी पाहिलेले-अनुभवलेले आखीव माधवनगर’.

1

मनातले माधवनगर -उत्सव-सण-वार...

१.गणेशोत्सव... माधवनगरातील कॉटन मिलमधे गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात असे. त्यात आरती-प्रसाद विसर्जन या भानगडीत न पडता आम्हा सवंगड्यांना त्यावेळचे खास आकर्षण असे ते दर शनिवारी ठेवल्या गेलेल्या विविध कार्यक्रमांचे. त्या काळात एकमेकांच्या घरी जाऊन गल्लीतील सगळे जण बसायला पटकुरं घेऊन रात्री आठ वाजल्यापासून घोळक्याने मिलच्या गेटपाशी रेटारेटी सहभागी होत, आत झुंडीने जात.

आज काय घडले ... पौष शु. ८ पानपतचा अखेरचा संग्राम !

लेखक Ashutosh badave यांनी सोमवार, 25/01/2021 16:17 या दिवशी प्रकाशित केले.
आज काय घडले ... पौष शु. ८ पानपतचा अखेरचा संग्राम ! शके १६८३ च्या पौष शु. ८ या दिवशी पानिपतचा शेवटचा घनघोर संग्राम होऊन सदाशिवरावभाऊ पेशवे यांचा अंत झाला व लढाई थांबली. या दिवशी सूर्योदयापूर्वी मरूं वा मारूं या भावनेने मराठ्यांची सेना वीरश्रीने मैदानावर आली. श्रीमंत भाऊसाहेब व विश्वासराव घोड्यावर बसून निशाणाकडे निघाले. सर्वांच्या अंगांत त्वेष संचारत होता. लढाईचे तोंड भारी लागून मारामारी, खणाखणी, एक प्रहरपर्यंत चालू होती. भाऊसाहेब व विश्वासराव बारा वाजण्याच्या सुमारास घोड्यावर स्वार होऊन स्वतः हल्ल्यात पुढे झाले.

हस्ताक्षर..

लेखक चिनार यांनी शनिवार, 23/01/2021 11:34 या दिवशी प्रकाशित केले.
जागतिक हस्ताक्षर दिनाच्या निमित्ताने लिहिलेलं काहीतरी.. मी लिहायला सुरवात केल्यावर 'काहीतरी लिहिणं' ते 'काहीतरीच लिहिणं' या प्रगतीला फार वेळ लागला नाही. मग 'काहीच्या काही लिहिणं' या पुढच्या टप्प्याकडे वाटचाल सुरु झाली. पण स्वतःच्या अद्वितीय अक्षरांमुळे ते हस्तलिखित कोणालाही दाखवायच्या लायकीचे नसायचे.अद्वितीय अश्यासाठी की एकदा काढलेले कोणतेही अक्षर मी परत कधीही तसेच्या तसे काढू शकत नाही. दरवेळेला अक्षराच्या स्वभावाचे आणि आकाराचे विविध कंगोरे कागदावरच उलगडून दाखवण्याचा माझा प्रयत्न असतो. त्या अर्थाने माझं लिखाण खरंच 'युनिक' आहे. लोकं आकडेमोड करतात तशी मी अक्षर'मोड' करतो.

हस्ताक्षर..

लेखक चिनार यांनी शनिवार, 23/01/2021 11:33 या दिवशी प्रकाशित केले.
जागतिक हस्ताक्षर दिनाच्या निमित्ताने लिहिलेलं काहीतरी.. मी लिहायला सुरवात केल्यावर 'काहीतरी लिहिणं' ते 'काहीतरीच लिहिणं' या प्रगतीला फार वेळ लागला नाही. मग 'काहीच्या काही लिहिणं' या पुढच्या टप्प्याकडे वाटचाल सुरु झाली. पण स्वतःच्या अद्वितीय अक्षरांमुळे ते हस्तलिखित कोणालाही दाखवायच्या लायकीचे नसायचे.अद्वितीय अश्यासाठी की एकदा काढलेले कोणतेही अक्षर मी परत कधीही तसेच्या तसे काढू शकत नाही. दरवेळेला अक्षराच्या स्वभावाचे आणि आकाराचे विविध कंगोरे कागदावरच उलगडून दाखवण्याचा माझा प्रयत्न असतो. त्या अर्थाने माझं लिखाण खरंच 'युनिक' आहे. लोकं आकडेमोड करतात तशी मी अक्षर'मोड' करतो.

पिन (लेडीज स्पेशल)

लेखक Bhakti यांनी मंगळवार, 19/01/2021 17:31 या दिवशी प्रकाशित केले.
पिन आम्ही बायकांनी कितीही ठरवलं तरी पिनशिवाय आमच पान हलत नाही. पिन म्हणाल की डोळ्यासमोर अनेक प्रकार उभे राहतात.सेफ्टी पिन,टिक टोक पिन,डोक्याची पिन,साडी पिन. घरी किती जरी पिनांचा साठा असला तरी लग्न समारंभाला एक जरी वेळेवर सापडेल तर शपथ!मग मागामाग सुरु होते.आणि जिच्याकडे पर्स उघडल्यावर जास्त साठा असेल आणि जी सर्वाना पिन पुरवते ती सर्वात श्रीमंत बाई असते.

पेन इकॉनॉमी..

लेखक चिनार यांनी सोमवार, 18/01/2021 11:55 या दिवशी प्रकाशित केले.
पेन.. कितीही प्रामाणिकपणाचा आव आणला तरी आयुष्यात एका गोष्टीची चोरी आपण सगळ्यांनीच केलीये/अजूनही करतो... पेन !!! ह्यात प्रामुख्याने दोन प्रकार येतात, चोरी केलेला पेन आणि जवळ राहून गेलेला पेन... आठवणीने वापस केलेला पेन ही कॅटेगरी आता नामशेष झालीये..एवढासा पेन, त्यात काय वापस करायचं? 'चोरी गेलेले पेन' ही एक पॅरालल इकॉनॉमी आहे. ह्यांच व्हॅल्यूएशन रिलायन्सच्या मार्केट कॅपिटल एवढं नक्कीच असेल.हर्षद मेहता सिरीजमध्ये शेयर मार्केट आणि मनी मार्केट ह्यांचा उल्लेख आहे. ह्यांच्याच आसपास, पण न दिसणारं एक पेन मार्केटसुद्धा आहे. प्लॅटफॉर्म नंबर पौने दस सारखं!

बेरी के बेर

लेखक Bhakti यांनी शनिवार, 16/01/2021 18:05 या दिवशी प्रकाशित केले.
संक्रांती नंतर दुसऱ्या दिवशी किक्रांत असते.बच्चे कंपनीचा मुरमुरे,बोर,रेवड्या,चॉकलेट लयलुटीसाठी बोरनहाणसाठीचा दिवस असतो. आगगाडीच्या डब्यात बसल्यासारख एक घर झाल कि दुसर घर अस करत करत ५-६ घरी ह्या सोहळ्याची मौज होते.परीच्या घरी कन्येला घेऊन बोरनहाणसाठी गेले .परीभोवती सगळे बाल गोपाल गोलाकार जमले.काही नवखे तर काही तरबेज होते,एकमेकांना सांगत होते ..