Skip to main content

विरंगुळा

सच बोलू तो

लेखक Govind यांनी मंगळवार, 25/08/2020 09:27 या दिवशी प्रकाशित केले.
  गोष्ट आमच्या लहानपणी घडलेली आहे. मी तेव्हा सहावीत असेन.आमचा मित्र फिरोज आणि त्याच्या घरातील हा किस्सा आहे. फिरोजचा अब्बा म्हणजे मोतीलाल हा एक अट्टल बेवडा होता. तो चोवीस तास नशेत असायचा. जेव्हा शुद्धीवर यायचा तेव्हा बायकापोरांना एवढ्या तेवढ्या कारणावरून बदडणे हा त्याचा छंद होता. त्याला कुठलंही कारण पुरायचं. म्हणजे अगदी शेजारच्या घरातील कुत्रा जरी भुंकला तरी तो तेवढ्या कारणावरून बायकोला मारहाण करी. त्यामुळे ती बिचारी सदाची घाबरलेली असे. नवर्‍याला वर डोळा करून बोलायची सोय नव्हती. नाहीतर मग बेदम मार खावून पुन्हा वर तलाक द्यायच्या धमक्या मिळत.

बाप

लेखक Govind यांनी सोमवार, 24/08/2020 22:38 या दिवशी प्रकाशित केले.
  सकाळची वेळ. सगळीकडे एकप्रकारचं चैतन्य संचारलेलं. सूर्याची कोवळी किरणं सगळीकडे पसरलेली. सार्वजनिक नळावर बायकांची पाणी भरण्यासाठी लगबग चाललेली. घरोघर दारात सडे टाकून त्यावर सुंदर रांगोळ्या काढण्यात गुंतलेल्या मुलीबाळी. कुणी शेतकरी आपली गुरे घेऊन शेताकडे निघालेला. पाणी भरता भरता बायकांचा आवाज वाढायला लागला. वाढत्या उन्हाबरोबर पाणी भरण्याची घाई वाढू लागली आणि त्यासोबतच भांडणांनाही सुरूवात झाली. रस्त्याच्या कडेलाच असणार्‍या झोपडीसमोर फाटक पोतं अंथरूण बसलेलं सुधाकरचं म्हातारं आपले मिचमिचे डोळे उघडायचा प्रयत्न करत होतं पण ऊन्हामुळं डोळ्यांसमोर अंधारी येत होती.

पाचूंडी!

लेखक चिनार यांनी सोमवार, 24/08/2020 19:37 या दिवशी प्रकाशित केले.
पाचूंडी ! पाचवी-सहावीत असताना शाळेत एक प्रवचनकार/कीर्तनकार आले होते. त्यांनी सांगितलेली ही गोष्ट.. एका युद्धमोहिमेनंतर छत्रपती शिवाजी महाराज आपल्या सैन्यासह रायगडावर परतत होते. जवळजवळ ऐंशी हजार मावळे महाराजांसोबत होते. मजल दरमजल करत येताना, कुतुबशाहाच्या सीमेवर महाराज पोहोचले. तिथंच त्यांनी तळ ठोकला. कुतुबशहाला बातमी मिळाली. राजे सीमेवर आलेत म्हणून तो आनंदित झाला. इकडे राजे,कुतुबशाहाकडून भेटीचं आमंत्रण येईल ह्याची वाट बघत होते. कुतुबशाहाला राजे स्वतःहुन भेटायला येतील असं वाटत होतं. दोन-तीन दिवस झाले काहीच घडलं नाही. थोड्याश्या नाराजीनेच महाराजांनी तळ हलवायचा निर्णय घेतला. लगबग सुरु झाली.

वसूली

लेखक Govind यांनी सोमवार, 24/08/2020 12:32 या दिवशी प्रकाशित केले.
निवरादादा आता खूपच थकला आहे पण आजदेखील तो शिलाई मशिनवर बसून कपडे शिवत असतो. तीनही मुलींची लग्नं झाली आणि त्यांना मुलंबाळंदेखील झाली. आता कसली म्हणून चिंता उरली नाही. एक दीड एकर जमिनीचा तुकडा आहे तिथं त्याची बायको शेतीची कामं करते आणि निवृत्ती उर्फ निवरादादा आपला अपंग पाय घेऊन लोकांचे कपडे शिवत बसतो. मला बघताच त्यानं हाक मारली आणि मी त्याच्याकडं गेलो. गावातील बर्‍याच लोकांच्या आतल्या गोष्टी याला ठाऊक. त्याच्यासोबत गप्पा मारत बसणं हा एक विलक्षण विरंगुळा असे. खूप सार्‍या गोष्टी त्याच्याकडून कानावर येत. त्याच्या जवानीतल्या कित्येक गोष्टी मी त्याच्याकडून ऐकल्या आहेत.

पार्टी

लेखक Govind यांनी रविवार, 23/08/2020 18:18 या दिवशी प्रकाशित केले.
सुगी संपली आणि ऊसतोडीचा हंगाम सुरू झाला. सालाबादप्रमाणे गावोगावचे मजूर ऊसतोडीसाठी निघाले. आमच्या गावातील काहीजण दूरदूरपर्यंत जायचे.त्यांच्या नेण्याआणण्याची आणि रोजंदारीची व्यवस्था शेजारच्या गावातील काही जण करायचे. त्यांना मुकादम म्हणतात. आठ दहा टोळ्या त्यांच्या हाताखाली असतात. कामगारांची ने आण करायला तेव्हा ट्रक नव्हते. या टोळ्या रबरी टायरची चाके लावलेल्या बैलगाड्यांमधून उसाची वाहतूक करीत. अशा टोळ्या आमच्या गावावरून निघाल्या कि त्यांची ती भलीमोठी रांग पाहायला भारी मजा यायची. बैलांच्या गळ्यातील घुंघरमाळांची ती कलकल ऐकून कितीतरी वेळा भान हरपून जाई. आजही तिचा आवाज माझ्या कानांमधे घुमतो.

तपश्चर्या

लेखक माझिया मना यांनी रविवार, 23/08/2020 00:22 या दिवशी प्रकाशित केले.
इथे कोणी गिरिजा राजवाडे रहायच्या का? असे विचारणाऱ्या म्हाताऱ्या इसमाकडे दीपाने वळून पाहिले. गाडी स्टँडवर लावत ती मागे आली. काय काम आहे त्यांच्याकडे? असे तिने जरा रागातच विचारले. त्या कुठे आहेत, मला त्यांना पहायचंय एकदा, अजीजीने ते उत्तरले. हे असलं विचित्र उत्तर ऎकून दीपा आत गेली, आणि ८० वर्षाच्या सासूबाईंना घेऊन बाहेर आली. ओळख पटली नि गिरिजाबाईंना हे घर ना सोडण्याच्या आपल्या निर्णयाचा आनंद झाला. ६४ वर्ष वाट पाहून, मनाची समजूत घालून जिवंत समजत असलेला पती जिवंतच होता. रागाच्या भरात सोडलेले घर पुन्हा जवळ केले त्याने. गिरिजाबाईंनी देवाचे अाभार मानले. आज ६४ वर्षांनी तपश्चर्याला फळ मिळाले.

असा बालगंधर्व पुन्हा न होणे

लेखक महासंग्राम यांनी शुक्रवार, 14/08/2020 11:28 या दिवशी प्रकाशित केले.
आजच्या काळात बालगंधर्व माहिती नसलेला मनुष्य सापडणे जरा कठीणच. बालगंधर्व चित्रपटामुळे त्यांचं कार्य आताच्या पिढीला कळलं त्याच बरोबर त्यांचा स्वभाव कलेप्रती असणारी निष्ठा, प्रेक्षकांसाठी उच्च तेच सादर करण्याचा स्वभाव सुद्धा माहिती झाला. त्यांचे असेच काही अपरिचित प्रसंग इथे सादर करतोय.

नारायण... लॉकडाऊन इफेक्ट!

लेखक चिनार यांनी गुरुवार, 13/08/2020 09:51 या दिवशी प्रकाशित केले.
दरवाज्यात उभं राहून वऱ्हाडी मंडळींच्या हातावर सॅनिटायझर ओतणाऱ्या आधुनिक नारायणाची एक पोस्ट वाचली. त्याच कल्पनेचं आमचं एक व्हर्जन, "काय नारायणराव? पाहुण्यांच्या हातात अक्षता आणि बत्तासे वाटायची संस्कृती आहे आपली! सॅनिटायझर काय वाटताय?", एका पाहुण्याने खोचक सवाल केला. "बत्ताश्याचं काय घेऊन बसलात प्रभाकरराव? ढीगभर आणलेत मी स्वतः जाऊन. पण सरकारने साखर यंदा चीनवरून मागवली होती असं आजच्याच पेपरात आलंय. ठेऊन दिले गाठोड्यात बांधून बाजूला. देऊ का त्यातले दोन बत्तासे?" "नको नको", असं म्हणत पाहुणे पुढे गेले आता नारायणाला दरवाज्यात इतका वेळ उभं राहायला फुरसत असणं शक्यच नाही.

संवाद (भाग २)

लेखक aanandinee यांनी गुरुवार, 13/08/2020 03:39 या दिवशी प्रकाशित केले.
आपल्या साऱ्या निर्णयांत, कृतीत आपल्या मनात आपला स्वत:शीच जो संवाद सतत सुरू असतो त्याचा मोठा वाटा असतो. भीतीच्या बाबतीत या आतल्या संवादाचे येणारे आवाज हे सहसा “आज नकोच, नंतर बघू”, “बापरे मला कसं जमेल” “असं झालं तर!” अश्या स्वरुपाचे असतात, हे आपण गेल्या भागात पाहिलं. भीतीचे वेगवेगळे प्रकार [फोबिया (विशिष्ट गोष्टीची किंवा परिस्थितीची भीती), Generalised Anxiety Disorder (जी ए डी किंवा प्रत्येक गोष्टीची धास्ती), हेल्थ anxiety (आरोग्याबद्दलची, आजारांची भीती), सोशल anxiety (समूहामध्ये वावरण्याची भीती), पॅनिक डिसऑर्डर (भीतीचा तीव्र झटका)] यांच्याबद्दलही गेल्या भागात थोडक्यात पाहिलं .