मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

विचार

मजला बघ प्रीत तुझी कळली

रंजन ·
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
मजला बघ प्रीत तुझी कळली बघतेस जरी मला तू सखये नयनात छबी दिसते दुसरी... चुकवी नजरेस सदा दडुनी कसली करते लपवा छपवी? छळती तुज त्या जुन्या आठवणी जसे भृंग वनामधुनी सुमना फिरती तुझिया अवती भवती झुरते मुखकमल तुझे रमणी कथिले गुज मी तुजला मनचे म्हणुनी झुकला सखये चरणी पडले पुढती किति मौक्तिकही.... अपुल्या पुढती बघता हसली वळुनी सखया झटकन वदली .... 'मजला बघ प्रीत तुझी कळली'

घर

सुवर्णमयी ·
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
घर "या, या ,हे घर तुमचच आहे इथे पाहुण्यांच स्वागतच आहे" अशा पाट्या लावून आता म्हणे जागोजागी घरे आहेत फेंग शुई नि वास्तुशास्त्र पिऊन मोठी घरे उभे आहेत रिमोटकंट्रोलवर चालणारे एक जग त्यामध्ये सज्ज आहे खा अमेरिकन बर्गर फाईन घ्या कधी इटलीयन वाईन जरा चघळा संस्कृतीचे किस्से शोधा आपल्या भाषेचे हिस्से लागला जर आसामचा चहा होईल तयार सेकंदात दहा सीएनएन पहा रवीशंकर ऐका तस हे घर ग्लोबल बर का..... ऐका इथे कशाची उणीव नाही! दारावरच्या भिकाऱ्याला येथे प्रवेश नाही ...कारण त्याच्याकडे हवा तो सिक्रेटकोड नाही!

मनात माझ्या तुझीच गीते लिहून गेलो...

रंजन ·
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
मनात माझ्या तुझीच गीते लिहून गेलो... अता उराशी कसा धरावा किरण तरी मी दिशादिशांचा प्रकाश मोठा बनून गेलो.. तुझ्याविना मी मुकाच येथे थिजून गेलो मनात माझ्या तुझीच गीते लिहून गेलो... मलाच कळते ..नसेच ही वाट ओळखीची ... तरी कशी पावलांस या ओढ लागलेली? पुन्हा पुन्हा मी इथेच येतो तुझ्याच दारी.. असाच चकवा मला तरी का छळून गेला? कशास बांधू उगाच त्या आठवांस आता?

प्रार्थना.

अशोक गोडबोले ·
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
संस्कृत भाषेत या चार ओळी सुचल्या त्या इथे देत आहे.
-- प्रार्थना -- द्वंद्वातीतं त्रिगुणातीतम् प्रतिपाषाणे महेशरूपम् II धृ II नाहं जाने माया भेदम् हरे मुंचमाम् भवजलमीनम् II १ II मतिमंदोऽहं अघपथगामी मुक्तिवरं मे देहि स्वामी II २ II विगतवारिजं मानसविमलम् मुनिजनमानसहंसविहीनम् II ३ II शिवपदारविन्दे मनशरणम् प्रभो प्रभोदय चंचलभृंगम् II ४ II -- अशोक गोडबोले, पनवेल.

पुनश्च ह्या गंगेमधि - भाग ०

जगन्नाथ ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
"ह्या गंगेमधि" ही कविता थोडीफार बुचकळ्यात पाडणारी आहे असा अनुभव आहे. म्हणजे तिचा शेवट जो केला आहे तो पटत नाही. मग कोणकोण "एक सौंदर्यानुभव" म्हणून पुढे चौकशी करूच नये असे म्हणतात. तेही पटत नाही. आळशी असल्यामुळे मी ती सोडूनच दिली होती. पण अनेक वर्षांनी एक वेगळा विचार मनात आला. तो असा की बुद्धाचा स्पष्ट उल्लेख असून आपण "त्या" दृष्टीने कधी वाचलीच नाही. तसे कोणी केलेही असेल, पण मला ते माहीत नाही. जमेल तितपत स्वतःच करायला काय हरकत आहे? म्हणून इथे सुरुवात केली आहे. मर्ढेकरांच्या जीवनाबद्दलही मला विशेष अशी माहिती नाही.

काचेची बरणी आणि २ कप चहा

नीलकांत ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
आयुष्यात जेव्हा एकाच वेळी अनेक गोष्टी कराव्याश्या वाटतात आणि दिवसाचे २४ तासही अपुरे पडतात तेव्हा काचेची बरणी आणि २ कप चहा आठवून पहा. तत्व़ज्ञानाचे प्राध्यापक वर्गावर आले. त्यांनी येताना काही वस्तु बरोबर आणल्या होत्या. तास सुरू झाला आणि सरांनी काही न बोलता मोठी काचेची बरणी टेबलावर ठेवली आणि त्यात ते पिंगपाँगचे बॉल भरु लागले. ते भरून झाल्यावर त्यांनी मुलांना बरणी पुर्ण भरली का म्हणून विचारले. मुले हो म्हणाली. मग सरांनी दगड खड्यांचा बॉक्स घेऊन तो बरणीत रिकामा केला.आणि हळूच ती बरणी हलवली. बरणीत जिथे जिथे मोकळी जागा होती तिथे ते दगड खडे जाऊन बसले.

आयुष्य असेच आहे

रंजन ·
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
आयुष्य असेच आहे विस्तीर्ण पानासमान वाचता न येई कोणा त्यावरील आयुष्यरेषा .... नकाराच्या गावामध्ये होकाराची वाट व्हावी अंधाराच्या रात्रीतून किरणांना जाग यावी .... काय म्हणू आकळेना वाळवीला वाढणार्‍या अडगळ विसरली.. करे बुद्धीवंता इशारा

खिडकीकडून खिडकीकडे

रंजन ·
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
आमचे आपले असेच आहे खिडकीकडून खिडकीकडे.. कधी इकडे कधी तिकडे बेन्चावरून बेन्चावरती माझ्या खिडकीचा फडफडे डोळा कितिदा समोरच्या स्क्रिनवरती मनात हलणारी पिंपळपालवी बसलेली विजेच्या लोळावरती पक्क्या गुंतल्या जुनाट गाठी काळ्या गढूळ डोहाच्या काठी अंधारडोह बसला जसा पाठी प्रकाशदीप जातो बुडीत खाती खिडकीकडून खिडकीकडे जुन्या पारावरून पारावरती झोकांड्या खात चालणे आता बेन्चावरून बेन्चावरती

मराठी आंतरजालीय साहित्यिक!

विसोबा खेचर ·
राम राम मंडळी, मूळ लेखाआधीच एक अवांतर मुद्दा - (ही वाटल्यास प्रस्तावना समजा परंतु या मुद्द्यावरदेखील अवश्य विचार व्हावा, चर्चा व्हावी अशी इच्छा आहे!) मंडळी, इतर संकेतस्थळांच्या बाबतीत मला असा अनुभव आहे की आंतरजालावर चांगल्यापैकी लेखन करणार्‍या मंडळींबदल काही लिहू लागलो की ते वैयक्तिक लेखन समजलं जातं. का? तर संबंधित लेखक त्या संकेतस्थळाचा सभासद आहे म्हणून! संकेतस्थळाचा सभासद जर चांगली साहित्यनिर्मिती करत असेल तर प्रत्येकवेळेला तो एक सभासद आहे म्हणून त्याच्या सहित्याबद्दल स्वतंत्रपणे लिहिण्या-बोलण्याला बंदी का असावी बरं?

शाहीर ते शाहीर !

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
मराठी शाहिरी-मराठी कवितेची पहाट मानली गेली.कारण या शाहिरीने अनेक बंधने झुगारुन दिली.मराठी साहित्यात 'शाहिरी वाड;मयाला एक अनन्यसाधारण महत्त्व आहे.संत कवी आणि पंत कवी यांनी मराठी साहित्याला जे योगदान दिले,तितकेच योगदान शाहिरांचे आहे हेही विसरु नये.वास्तवातील घटनांना,जीवनातील प्रसंगांना मनोरंजनाच्या माध्यमातून तात्कालीन जीवनाचा आलेख शाहिरांनी आपल्या कवनातून मांडला.देव,धर्माच्या नादात माणूस स्वतःकडे पाहण्यापेक्षा अध्यात्मात गुरफटुन गेला होता. अशा वेळी शाहिरांनी इश्वराकडून माणसाकडे पाहण्याची दृष्टी दिली.